Winter Season esakal
आरोग्य

Winter Season : निरोगी राहायचंय? हिवाळ्यात अशी घ्या क्वालिटी झोप

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी रात्री क्वालिटी झोप फार आवश्यक असते. यामुळे व्यक्ती फिजीकली आणि मेंटली फीट राहतो.

सकाळ डिजिटल टीम

Winter Season Health Tips For Quality Sleep : चांगल्या वाईट खाण्या-पिण्याच्या सवयींचा आरोग्यावर थेट परिणाम दिसतो. आरोग्यासाठी फक्त चांगलं खाणं नाही तर चांगली झोप पण आवश्यक आहे. हिवाळा सुरू झाला आहे. त्यात आरोग्याशी निगडीत अनेक समस्या उद्भवतात.

त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. चांगल्या झोपेसाठी रात्री झोपण्यापूर्वी हे पदार्थ खाल्ले तर झोप चांगली लागते आणि दिवसभराचा थकवा निघून शरीर रिलॅक्स होतं.

milk

दूध

दूध आरोग्यासाठी कायमच चांगलं असतं. तज्ज्ञ सांगतात की, हिवाळ्यात झोपण्यापूर्वी दूध प्यायला हवं. त्यात प्रोटीन, कॅल्शियम आणि मिनरल्स सहित अनेक व्हिटॅमिन्स मिळतात. थंडीत गरम दूध प्यायल्याने स्नायूंना आणि शरीराला आराम मिळतो. दूधात हळद मिक्स केल्यानं अधिक फायदे मिळतात.

banana

केळं

फळं आरोग्यासाठी कायमच उपयुक्त ठरतात. लोक सकाळी उठल्यावर केळं आणि ड्रायफ्रूट खातात. पण हेच रात्री झोपण्या आधी खाल्लं तर त्याचा आरोग्याला अधिक फायदा होतो. केळं खाल्ल्याने झोप चांगली येते.

Almonds

बदाम

बदामामुळे शरीरात उष्णता तयार होते. याच्या सेवनाने फार फायदे होतात. रात्री झोपताना थोडे बदाम खाऊन झोपावं. बदामात हेल्दी फॅट्स, अमिनो अ‍ॅसिड, मॅग्नेशियम असे गुणकारी तत्व असतात. यामुळे शांत झोप लागते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT