Black hairy tongue syndrome  Sakal
आरोग्य

Global News : करायला गेली एक अन्...; महिलेची जीभच काळी पडली, केसही उगवले! काय आहे हा आजार?

या महिलेची जीभ काळी झाली आणि त्यावर केसही आले. त्याचप्रमाणे या महिलेची त्वचा ग्रे रंगाची झाली आहे.

वैष्णवी कारंजकर

एका महिलेची जीभ अचानक काळी पडली आणि त्यावर केस उगवल्याची विचित्र घटना नुकतंच घडली आहे. हे पाहून आता डॉक्टरही चक्रावले आहेत. नक्की काय आहे प्रकरण?

ब्रिटीश मेडिकल जर्नलने दिलेल्या अहवालानुसार, या ६० वर्षीय महिलेला रेक्टल कॅन्सर झाला आहे. तिच्यावर जपानमध्ये १४ महिन्याआधी उपचारही सुरू होते. ती किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स कमी व्हावेत म्हणून ती माईनोसायक्लिन घेत होती. याचा उपयोग अगदी तोंड येण्यापासून ते न्यूमोनियापर्यंत अनेक आजारांमध्ये केला जातो.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी सांगितलं की, महिलेला दर दिवशी १०० मिलिग्रॅम माईनोसायक्लिन दिलं होतं. पण नंतर आम्हाला लक्षात आलं की याची रिएक्शन म्हणून या महिलेची जीभ काळी झाली आणि त्यावर केसही आले. त्याचप्रमाणे या महिलेची त्वचा ग्रे रंगाची झाली आहे.

डॉक्टरांनी पहिल्यांदा पाहिलं की महिलेचा चेहरा ग्रे रंगाचा झाला आहे. त्यानंतर जेव्हा महिलेने तोंड उघडून आपली जीभ दाखवली तेव्हा डॉक्टरही गोंधळले. कारण महिलेची जीभ पूर्ण काळी झाली होती आणि त्यावर केस उगवल्यासारखं दिसत होतं. यानंतर या महिलेची औषधं बदलण्यात आली. आता या महिलेची तब्येत सुधारेल अशी आशा आहे, असंही डॉक्टर म्हणाले आहेत.

काय आहे हा आजार?

याला ब्लॅक हेअरी टंग सिंड्रोम असं म्हणतात. या आजारामध्ये असह्य त्रास होतो. अँटिबायोटिक्सच्या साईड इफेक्ट्समुळे हा आजार होतो. तोंडातली अस्वच्छता, कोरडेपणा, धुम्रपान यामुळे हा आजार होऊ शकतो. याबद्दल जामा डर्मटॉलॉजी जर्नलमध्ये एक अभ्यासही प्रकाशित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: शफाली वर्माचे २४ चेंडूत अर्धशतक अन् दोन वर्ल्ड रेकॉर्ड; स्मृती मानधनालाही तिच्याच समोर टाकलं मागे

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी घेणारा अनिल पंडित कोण? लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध...

पुढच्या २१ दिवसांत ३ राशींना धनलाभाची संधी, करिअर अन् व्यवसायात होऊ शकते प्रगती

IND W vs ZIM W, 2nd T20I: शफालीचं वादळी अर्धशतक अन् स्मृतीचंही आक्रमण, भारताने विजयासह मालिकाही टाकली खिशात

Baramati Crime: बारामतीत राणा शिपिंग कंपनीचे प्रमुख राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला; गोळीबाराचा प्रयत्न, हाताला जखम

SCROLL FOR NEXT