women health sakal
आरोग्य

Women Health : स्त्रियांनो, 'PCOD' चा त्रास कसा कराल कमी? या योगासनांची घ्या मदत

योगाच्या माध्यामातून पीसीओडीची समस्या कमी करता येऊ शकते. कारण योगा केल्याने शरीरातील मानसिक,शारीरिक स्थितीवर प्रभाव पडत असतो.

सकाळ डिजिटल टीम

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिला तसेच तरूणींमध्ये PCOD आणि PCOS चं प्रमाण वाढत चाललं आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS), ज्याला पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (PCOD) असेही म्हणतात. हा एक सामान्य हार्मोनल विकार आहे. योगाच्या माध्यामातून पीसीओडीची समस्या कमी करता येऊ शकते. कारण योगा केल्याने शरीरातील मानसिक,शारीरिक स्थितीवर प्रभाव पडत असतो.

चक्रासन

हे पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी योगासनांपैकी एक आहे. नियमित सरावाने पोटाची अतिरिक्त चरबी कमी करता येते. याशिवाय चक्रासन कंबर आणि बाजूची चरबी कमी करण्यास मदत करते. चक्रासन पोटाची चरबी कमी करण्यासाठी इतके शक्तिशाली आहे की तुम्हाला काही दिवसातच परिणाम दिसून येईल.

 भुजंगासन

भुजंगासनास कोब्रा पोझ म्हणून ओळखले जाते. या आसनाच्या मदतीने मणक्याला बळकटी मिळते. त्याचबरोबर शरीराची लवचिकता वाढते. तणाव दूर होण्यास मदत होऊन, शरीराला ऊर्जा मिळते.

हेल्दी फॅट्सचे करा सेवन

PCOD मध्ये वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात हेल्दी फॅट्सचा समावेश असावा. हेल्दी फॅटमध्ये तुम्ही ॲवोकॅडो, ऑलिव्ह ऑईल, नट्स यासारख्या गोष्टी तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट करू शकता. हेल्दी फॅट्सचे सेवन केल्याने शरीरातील चयापचय प्रमाण वाढते आणि वजन वेगाने कमी होते.

प्रेयसीवर मोठ्या प्रमाणात उधळले पैसे, कर्जबाजारी झालेल्या प्रियकरानं कंबोडियात विकली किडनी, 'रॅकेट'मध्ये डाॅक्टरांचाही सहभाग!

Virat Kohli ज्या चेंडूवर यष्टिचीत झाला, तो ball of century पाहिला का? किंग कोहलीने नंतर काय केलं ते पाहा Video Viral

Ayodhya Ram Mandir : रामभक्तांसाठी खास दिवस! ३१ डिसेंबरला अयोध्येत महाधार्मिक सोहळा, कोण आहेत प्रमुख पाहुणे?

Gold Rate Today : देशभरात थंडी वाढत असताना सोनं-चांदीच्या भावात मात्र गरमी! चांदी २.५ लाखांवर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

पुण्यात विद्यार्थिनीने चक्क शिक्षिकेलाच पाठवला 'I Love You' चा मेसेज; ब्लेडने हातावर कोरलं नाव, इमारतीवरून उडी मारण्याचीही दिली धमकी

SCROLL FOR NEXT