Safe and Effective Birth Control Injection for Women: कुटुंब नियोजनाच्या दिशेने एक प्रभावी पाऊल ठरत असलेल्या 'अंतरा' गर्भनिरोधक इंजेक्शनला महिलांकडून उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. तीन महिन्यांसाठी गर्भधारण रोखण्याची क्षमता असलेले हे इंजेक्शन महिलांसाठी सुरक्षित आणि सोयीचा पर्याय बनले आहे. याचा साइड इफेक्ट नसल्याने अनेकांनी याला पसंती दिलेली आहे.
२०२४ मध्ये नागपूर जिल्ह्यातील एकूण १,०६५ महिलांनी 'अंतरा'चा पहिला डोस घेतला, तर २५९ महिलांनी चौथा डोस पूर्ण केला आहे. एप्रिल-मे २०२५ या कालावधीत पहिला डोस १६१, दुसरा डोस ५३, तिसरा डोस ३३ आणि चौथा डोस ४० महिलांनी घेतल्याचे शासकीय आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
'अंतरा' हे मेड्रॉक्सीप्रोजेस्ट्रॉन अॅसिटेट या हार्मोनवर आधारित इंजेक्शन असून ते महिलेला तीन महिन्यांपर्यंत गर्भधारणा टाळण्यास मदत करते. यामुळे दररोज गोळ्या घेण्याचा त्रास टळतो आणि शरीरावर दुष्परिणामही कमी होतात.
हे इंजेक्शन सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत उपलब्ध आहे. महिलांनी जागरूकतेने हा पर्याय निवडल्यास, त्यांच्या आरोग्याची तसेच कुटुंब नियोजनाची अधिक चांगली काळजी घेतली जाऊ शकते.
काही वेळा गर्भनिरोधक गोळ्या परिणामकारक ठरत नाहीत, त्यामुळे ● महिलांना दुसरे पर्याय निवडावे लागतात. मात्र, अंतरा इंजेक्शन हा सुरक्षित व दीर्घकालीन उपाय आहे. प्रत्येक महिलेनं याचा विचार जागरूकतेने करावा.
- डॉ. सरला लाड, आरोग्य विभाग, मनपा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.