Postal Department esakal
आरोग्य

महिलांच्या आरोग्याची काळजी! आता पोस्टातही मिळणार 'सॅनिटरी नॅपकिन'

दिलीपकुमार चिंचकर

सातारा : महिलांच्या (Women) आरोग्याची काळजी आता डाक विभागही घेणार असून, एक सप्टेंबरपासून डाक कार्यालयात पर्यावरणपूरक आणि पुन्हा पुन्हा वापरता येतील असे सॅनिटरी नॅपकिन (Sanitary Napkin) उपलब्ध करून दिले जाणार आहे. हा अनोखा उपक्रम डाक विभाग (Postal Department) पी-पेस फाउंडेशनच्या सहकार्याने राबविणार आहे.

महिलांच्या आरोग्याची काळजी आता डाक विभागही घेणार आहे.

याबाबतची माहिती प्रवर अधीक्षिका अपराजिता म्रिधा यांनी दिली. आरोग्य पाहणीनुसार मासिक पाळीधारक महिलांपैकी फक्त ३६ टक्के महिलाच सॅनिटरी नॅपकिनचा वापर करतात. घरगुती पद्धतीवरच अनेक महिला अवलंबून राहतात. त्यामध्ये स्वच्छतेची कमतरता राहते. अनेक युवतींना, काम करणाऱ्या महिलांना विविध संसर्ग आणि मासिक पाळीच्या स्वच्छतेबाबत संवेदनशील समस्यांना सामोरे जावे लागते. डाक विभागाने आजवर अनेक सामाजिक, राष्टीय उपक्रम राबविले आहेत.

सुकन्या समृद्धी योजना, मातृत्व योजनेंतर्गत सर्व महिला आधार ड्राईव्ह आणि एईपीएस पेमेंटसारख्या योजनांद्वारे महिलांच्या सुरक्षेवर डाक विभागाने चांगले उपक्रम राबविले. आता डाक विभाग महिलांच्या आरोग्यासाठी काम करणार आहे. सॅनिटरी नॅपकिनचा हा उपक्रम सातारा विभागातील कऱ्हाड, वडूज, फलटण, पाचगणी, कोरेगाव, मेढा, पाटण, ढेबेवाडी या डाक कार्यालयांत सुरू करणार आहे. सी-पेस फाउंडेशनने पुन्हा पुन्हा वापरता येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनचा या योजनेत समावेश केला आहे. कमी किमतीत दीड वर्षापर्यंत टिकेल असे नॅपकिन या योजनेतून महिलांना मिळणार आहे. जास्तीतजास्त महिलांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवर अधीक्षिका म्रिधा यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Patna Road Accident : गंगा नदीत स्नानासाठी जाताना काळाचा घाला! ट्रक-ऑटोच्या भीषण धडकेत 7 महिला जागीच ठार; 4 जणांची प्रकृती गंभीर

स्टार प्रवाहसाठी मालिका नव्हे प्रोडक्शन हाउस महत्वाचं; प्राइम टाइमसाठी टॉप ५ मधली मालिका करणार बंद, नेटकरी म्हणतात- आताच तर...

Marbat 2025: सगळं अशुभ,अमंगळ घेऊन जा..गे मारबत! कोण होत्या राणी बाकाबाई भोसले ज्यांच्यामुळे नागपुरात सुरू झाला अनोखा मारबत?

खुशखबर! Oneplus 13 स्मार्टफोनचा दर उतरला; मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट; 24GB रॅमचा मोबाईल किंमत फक्त...

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला टीम इंडियात संधी मिळाली असती, पण कोणाचा 'हट्ट' नडला? इतर संघांपेक्षा वेगळं करण्यासाठी गेले अन्...

SCROLL FOR NEXT