World AIDS Day esakal
आरोग्य

World AIDS Day : लाल रंगाचीच फित का? जाणून घ्या कहाणी

एड्सच्या जनजागृतीसाठी संकेतात्मक लाल फितीचा वापर केला जातो. प्रत्येक आजारासाठी वेगवेगळ्या रंगाच्या फिती वापरल्या जातात.

सकाळ डिजिटल टीम

Why 'Red Ribbon' is Used As a Symbol for AIDS awareness : जागतिकस्तरावर चिंचा वाढवणारा आजार म्हणजे एचआयव्ही एड्स आहे. हा विषाणू शरीरात वाढत आहे याचा लोकांना बऱ्याचदा पत्ताच नसतो. त्यामुळे याचा संसर्ग पसरण्याची शक्यता वाढते. म्हणूनच याची जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.

एड्सच्या जनजागृतीसाठी संकेतात्मक लाल फितीचा वापर केला जातो. प्रत्येक आजारासाठी वेगवेगळ्या रंगाच्या फिती वापरल्या जातात. पण तुम्हाला माहित आहे का की, एड्स साठी लाल रंगाचीच फित का असते? जाणून घ्या कहाणी.

कोणी केली निर्मिती?

कला व्यावसायिकांनी 1988 मध्ये व्हिज्युअल एड्स नावाच्या गटाची स्थापना केली होती. ते न्यूयॉर्कच्या ईस्ट व्हिलेजमधील गॅलरीत एकत्र येत असत. एड्सचा कला समुदायावर कसा परिणाम होत आहे हे ओळखून कलाकार, कला संस्था आणि कला प्रेक्षकांना एड्सवर थेट कृती करण्यासाठी प्रेरीत करण्याचा ते प्रयत्न करत होते. त्यांनी जाहिरातीसाठी हे व्हिज्युअल चिन्ह तयार केले होते.

कशी झाली निर्मिती?

आखाती युद्धात सेवा देणाऱ्या अमेरिकन सैनिकांचा सन्मान करणाऱ्या पिवळ्या फितींपासून ही कल्पना प्रेरित झाली होती. त्यांनी फक्त एचआयव्ही ग्रस्त लोकांसोबतच्या एकजुटीचेच नव्हे तर एड्स-संबंधित आजाराने मृत्यू झालेल्यांचे स्मरण करण्यासाठी 'लाल रिबन' तयार केली.

लालच रंग का?

UNAIDS च्या अधिकृत वेबसाइटनुसार, प्रकल्पाच्या संस्थापकांनी नमूद केले आहे की लाल रंग "रक्ताशी संबंध आणि उत्कटतेची कल्पना म्हणून निवडला गेला होता - यात केवळ रागच नाही तर व्हॅलेंटाईनसारखे प्रेम व्यक्त होते." अशा प्रकारे हा प्रकल्प रेड रिबन प्रकल्प म्हणून ओळखला गेला.

आजही, लाल रिबन एचआयव्हीबद्दल जनजागृती करण्यासाठी एक प्रभावी शक्ती आहे. इतर धर्मादाय संस्थांना जागरुकता वाढवण्यासाठी चिन्हे तयार करण्यासाठी आणि त्यांचा वापर करण्यासाठी प्रेरणा देण्यात ते महत्त्वपूर्ण ठरले आहे. गुलाबी स्तन कर्करोग जागरूकता रिबन सारखे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Record : ख्रिस गेलचा १७५ धावांचा विक्रम उद्ध्वस्त, Lhuan-Dre Pretorius ने रचला इतिहास; २८चेंडूंत १३८ धावा

बालीत सुट्टी एन्जॉय करणं पडलं महागात! नुसरत भरुचाच्या भीषण अपघात, मुंबईत होणार सर्जरी

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Ratnagiri News : देवरूखच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस मोबाईल मेडिकल युनिट बंद; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Weather: ऑक्टोबर हीट'चा मुंबईला चटका, तापमानाचा पारा चाळिशीजवळ; पाहा IMDचा अंदाज

SCROLL FOR NEXT