World Asthma Day 2025 sakal
आरोग्य

World Asthma Day 2025: का व कधी साजरा केला जातो जागतिक दमा दिन? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व अन् यावर्षीची थीम

History, Significance And Theme Of World Asthma Day: जागतिक दमा दिनानिमित्त या रोगाची माहिती, इतिहास आणि या वर्षीची थीम जाणून घ्या.

Anushka Tapshalkar

Why We Celebrate World Asthma Day: अनेक गंभीर आणि दीर्घकालीन आजारांपैकी एक आजार म्हणजे दमा. मधुमेह, उच्च रक्तदाब सारखीच या आजाराची योग्य ती काळजी घ्यावी लागते. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि जीवनशैलीतील बदल यामुळे दम्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, दमा या आजाराबद्दल जनजागृती आणि उपचारांची सहज उपलब्धता यासाठी 'जागतिक दमा दिन' हा एक महत्त्वाचा टप्पा ठरतो.

कधी साजरा केला जातो जागतिक दमा दिन?

दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिन साजरा केला जातो. यंदा हा दिवस ६ मे रोजी साजरा केला जाईल. त्यानिमित्ताने जाऊन घेऊया या दिवसाचे महत्त्व, इतिहास आणि यावर्षीची थीम.

का साजरा करतो ‘जागतिक दमा दिन’?

दमा हा आजार आहे जो कोणालाही आणि कधीही होऊ शकतो, मग ती व्यक्ती कोणत्याही वयोगटातील असो. विशेषतः लहान मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक असून, तर महिलांमध्ये, खासकरून रजोनिवृत्ती (Menopause) झाल्यावर, दमा होण्याचा धोका वाढतो.

जागतिक दमा दिन हा संपूर्ण जगात दम्याबाबत जनजागृती करण्यासाठी, लोकांमध्ये या आजाराच्या उपचारांविषयी माहिती पोहोचवण्यासाठी, आणि दमा झालेल्या व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात दम्याचा परिणाम कमी करण्यास मदत करण्यासाठी साजरा केला जातो.

जागतिक दमा दिनाचे महत्त्व

सध्या जगभरात दम्याचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. जागतिक दमा दिन फक्त या आजाराचे गांभीर्य पटवून देण्यासाठी नसून, दम्याने त्रस्त असलेल्या लोकांना हा आजार योग्यरीत्या कसा नियंत्रित करता येईल आणि आरोग्य कसे टिकवता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठीदेखील महत्त्वाचा असतो.

या दिवशी विविध स्वयंसेवी संस्था (NGO), डॉक्टर, रुग्णालये आणि आरोग्यविषयक संस्था एकत्र येऊन लोकांमध्ये जनजागृती करतात. दम्याची लक्षणे, उपचार आणि रोजच्या जीवनात घ्यायची काळजी याविषयी सोप्या भाषेत माहिती दिली जाते, जेणेकरून अधिक लोक जागरूक होतील आणि वेळेत उपचार घेऊ शकतील.

यंदाची थीम

दरवर्षी ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमा (GINA) ही संस्था एक ठराविक थीम ठरवते. त्याचप्रमाणे, आजही अनेकांना, विशेषतः ग्रामीण आणि दूरच्या भागांतील दम्याच्या रुग्णांना इनहेलरसारखे गरजेचे उपचार सहजपणे मिळत नाहीत, त्यासाठी "Make Inhaled Treatments Accessible for ALL" म्हणजेच "इनहेलर सारखे उपचार सर्वांसाठी सहज उपलब्ध व्हावेत" ही थीम ठरवण्यात आली आहे.

यामुळे देशातील प्रत्येक दमाग्रस्त व्यक्तीपर्यंत आवश्यक औषधे आणि इनहेलर पोचणार आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAE Golden Visa confusion: 23 लाखांत मिळतोय लाइफटाइम गोल्डन व्हिसा? युएई सरकारने दिलं स्पष्टीकरण

Goa Crime: पुणेकर पर्यटकाची गोव्यात दादागीरी, गेट बंद केल्याच्या वादातून थेट कारखाली चिरडलं! सुरक्षा रक्षक गंभीर जखमी

ICC Test Rankings: एकाच सामन्यात ४३० धावा करणाऱ्या शुभमन गिलची गरुडझेप; रुटला मागे टाकत संघसहकाऱ्यानं पटकावला अव्वल क्रमांक

Latest Maharashtra News Live Updates: विदर्भात पावसाचा जोर कायम, पुरामुळे बंद झाले 'हे' मार्ग

Mars Rock Auction : मंगळावरून आलेल्या सर्वात मोठ्या उल्कापिंडाचा लिलाव होणार; किंमत तब्बल ३४ कोटी रुपयांपर्यंत, आश्चर्यकारक फोटो पाहा..

SCROLL FOR NEXT