World Asthma Day 2024 esakal
आरोग्य

World Asthma Day 2024 : अस्थमा अटॅक येण्याआधी शरीर देतं हे 5 संकेत, वेळीच करा हे काम, धोका होईल कमी

अस्थमाच्या आजारात कोणती खबरदारी घ्यावी याबाबत सविस्तर जाणून घेऊया

सकाळ डिजिटल टीम

World Asthma Day 2024 : दरवर्षी ७ मे ला 'जागतिक अस्थमा दिन' साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे श्वास आणि फुफ्फुसांच्या आजारांबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, वर्ष २०१९ मध्ये २६३ मिलीयन लोक अस्थमाने प्रभावित झाले होते. तर जवळपास साडेचार लाख लोकांचा यामुळे मृत्यू झाला होता. अशा स्थितीमध्ये आज आपण जागतिक अस्थमा दिनाच्या निमित्ताने अस्थमाच्या आजारात कोणती खबरदारी घ्यावी? याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

अस्थमा म्हणजे वायुमार्गात सूज येणे. त्यामुळे फुफ्फुसांद्वारे हवा बाहेर येण्यास मदत होते. या आजारावेळी श्वास फुलणे, घाबरल्यासारखे वाटणे, हृदयात घबराट वाटणे यांसारख्या समस्या उद्भवतात. (Health)

World Asthma Day

अस्थमा काय असतो आणि अस्थमा अटॅक का येतो?

दमा हा एक दीर्घकालीन श्वसन रोग आहे. यामुळे फुफ्फुसातील वायुमार्गांना सूज येऊ शकते, ज्यामुळे हवा आत आणि बाहेर जाणे कठीण होऊ शकते. जेव्हा ही लक्षणे वाढतात तेव्हा दम्याचा झटका येतो, ज्यामुळे श्वास घेणे खूप कठीण होते.

अटॅक येताच लगेच ही कामं करा

Step १ - सरळ बसा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा. झोपू नका.

Step २ - दर 30 ते 60 सेकंदाला रिलीव्हर किंवा रेस्क्यू इनहेलरचा एक पफ घ्या, कमाल 10 पफपर्यंत.

Step ३ - 10 पफ नंतर लक्षणे खराब झाल्यास किंवा सुधारत नसल्यास, अपत्कालीन वैद्यकीय मदत घ्या.

Step 4 - मदत येण्यासाठी 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागल्यास, स्टेप 2 पुन्हा करा. (Asthma)

अस्थमा अटॅकची लक्षण

खोकला, गरगरणे आणि छातीत घट्टपणा जाणवणे ही दम्याची लक्षणे आहेत. कधीकधी लक्षणे देखील खराब होऊ शकतात. काही वेळा काही लक्षण ही हाताबाहेरही जाऊ शकतात, तर काही वेळी लक्षण ही लक्षात येण्यासारखीच नसते. तेव्हा अचानक अस्थमा अटॅक आल्यास वरील स्टेप्स नक्की फॉलो कराव्या.

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT