World Brain Tumor Day 2024 esakal
आरोग्य

World Brain Tumor Day 2024 : किरणोत्सर्गामुळे वाढली ब्रेन ट्युमरची जोखीम

World Brain Tumor Day 2024 : ब्रेन ट्यूमर देशातील दुर्धर आजाराचे दहावे प्रमुख कारण आहे. किरणोत्सर्गाचा सहवास आणि कौटुंबिक इतिहास असलेल्यांमध्ये ही जोखीम वाढते.

सकाळ वृत्तसेवा

World Brain Tumor Day 2024 : ब्रेन ट्यूमर देशातील दुर्धर आजाराचे दहावे प्रमुख कारण आहे. किरणोत्सर्गाचा सहवास आणि कौटुंबिक इतिहास असलेल्यांमध्ये ही जोखीम वाढते. सरासरी लोकसंख्येच्या १ टक्के लोकांना आयुष्यात ब्रेन ट्यूमरच्या संकटाचा सामना करावा लागतो. मात्र, अलीकडे ही जोखीम वाढत आहे, अशी माहिती मेंदुरोग शल्यचिकित्सक डॉ. राहुल झामड यांनी दिली.

जागतिक ब्रेन ट्यूमर दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात डॉ. झामड म्हणाले, ब्रेन ट्यूमरमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दरवर्षी वाढत आहे; मात्र या आजाराबाबत समाजात जागरूकता नाही.

आयोनायझिंग रेडिएशनच्या संपर्कात येणे आणि मेंदूच्या कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास असणे, ही ब्रेन ट्यूमर विकसित होण्यासाठी मोठी धोक्याची घंटा असते. वेळेवर हस्तक्षेप आणि चांगले उपचार केले तर सरासरी जीवनमान वाढवून या रुग्णांचे पुनर्वसन करणे सहज शक्य आहे.

ब्रेन ट्यूमर असलेल्यांचे लवकर निदान व्हावे यासाठी ट्यूमर क्लिनिक उपराजधानीत चालविले जाते. या क्लिनिकमधून गेल्या २ महिन्यांत ३२ वर्षीय महिलेच्या मेंदूतील ६ बाय ७ सेमी आकाराचा ट्यूमर क्रॅनियोटॉमीने दूर केला.

जबलपूरमधील ६५ वर्षीय ज्येष्ठासह ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीचे अचूक निदान करून त्यांची भविष्यातील अपंगत्वातून सुटका करण्यात आली. याखेरीज ५८ वर्षीय पुरुषाच्या मेंदूतील ट्रान्स नासल ट्रान्सफेनोइडल एन्डोस्कोपिकद्वारे सेलर मास पूर्णपणे काढून त्याची भविष्यातील अंधत्वातून सुटका करण्यात आली, असे डॉ. झामड यांनी सांगितले.

ब्रेन ट्यूमरचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये त्याचे प्रमाण चिंताजनक आहे. मोबाईलचा अतिवापर मेंदूसाठी धोकादायक आहे. ब्रेन ट्यूमर विकसित होण्याचे वय नाही. ३ ते १५ वयोगटात किंवा वयाच्या पन्नाशीपूर्वी आणि पन्नाशीनंतरही विकसित होतो.

- डॉ. राहुल झामड, मेंदूरोग शल्यचिकित्सक, नागपूर

ही आहेत लक्षणे

  • सतत डोकेदुखी

  • झटके येणे

  • शारीरिक असंतुलन

  • डोळ्यांसमोर अंधारी येणे

  • भोवळ येणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT