Cancer In Women Esakal
आरोग्य

World Cancer Day 2023 : प्रामुख्याने स्त्रियांमध्ये होणारे कॅन्सरचे प्रकार कोणते ?

अनेकदा महिला कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे कॅन्सरच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात.

सकाळ डिजिटल टीम

Cancer In Women: आज वर्ल्ड कॅन्सर डे आहे.कॅन्सरविषयी जनजागृती करण्यासाठी वर्ल्ड कॅन्सर दिवस साजरा केला जातो. जगात होणाऱ्या प्रत्येकी 6 मृत्यूपैकी किमान 1 मृत्यू हा कॅन्सर अर्थात कर्करोग या आजाराने होतो. याच कारणामुळे जगभर कॅन्सर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. 

कर्करोग हा जीवघेणा आजार आहे हे आपल्याला माहिती आहे.अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्येच कॅन्सरचं निदान झालं नाही, तर रुग्णाचा जीव वाचवणं अवघड असतं.अनेकदा महिला कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे कॅन्सरच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. भारतात महिलांना होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण सध्या वाढताना दिसून येत आहे. आजच्या लेखात आपण प्रामुख्याने स्त्रियांमध्ये होणारे कॅन्सरचे प्रकार कोणते आहे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

1) स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये होणारा सर्वात सामान्य कर्करोग आहे. यावर योग्य वेळी उपचार न केल्यास मृत्यूही होऊ शकतो.

2) गर्भाशय मुखाचा कर्करोग ह्यूमन पेपिलोमा या विषाणूच्या संक्रमणाने हा कर्करोग होतो.

3) कमी वयात तसेच जास्त पुरूषांशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रियांना हा कर्करोग होण्याची शक्यता असते.

4) अंडाशयाचा कर्करोग हा बहुतांशवेळा चाळिशीनंतर वा रजोनिवृत्तीनंतर होतो. 

5) वल्वर (योनीमार्गातील) कर्करोग - महिलांच्या गुप्तांगाच्या बाहेरील भागात वल्वर कर्करोग होतो.हे प्रामुख्याने मूत्रमार्ग आणि योनीच्या पृष्ठभागावर स्थित आहे. त्याला वेस्टिब्यूल देखील म्हणतात.

6) युरिनरी कॅन्सर वारंवार लघवीला होणे, लघवीला साफ न होणे किंवा मूत्राशयाच्या कार्यात बिघाड निर्माण होणे ही कॅन्सरची लक्षणे असू शकतात. 

7) तोंडाचा कर्करोग म्हणजे तोंडातील ऊतींची असामान्य वाढ जी कर्करोगात बदलते.

 8) फुफ्फुसांचा कॅन्सर या कॅन्सरचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. यात नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर आणि स्मॉल सेल लंग कॅन्सरचा समावेश होतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT