World Health Day 2024 esakal
आरोग्य

World Health Day 2024 : कोल्हापूरची वैद्यकीय सेवा जीवनदायिनी

उपचारासाठी आरोग्य विमा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संशोधन आणि समुपदेशन व निवासी सुविधा अशा पंचसूत्रीसोबत रुग्णांचा उपचार कालावधी सुखकर करण्याचा यशस्वी प्रयत्न कोल्हापुरातील खासगी वैद्यकीय सेवेत होत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

World Health Day 2024 : अनाहूतपणे येणारे गंभीर आजारपण, जखम असो अथवा प्रसूती त्यासाठी उपचारासाठी दवाखान्यात जावे लागते. यात वाढता उपचार खर्च, नातेवाइकांची धावपळ व आजारातून पूर्ण बरे होण्यासाठी लागणारा कालावधी अशा अनेक चिंतांनी आजारपण नको म्हणण्याची वेळ येते. असे असले तरी कधी ना कधी बहुतेकांना रुग्णालयाची पायरी चढावी लागते.

अशा विविधअंगी चिंता, समस्या, गैरसोयी कमी करण्याचे विविध पर्याय खासगी वैद्यकीय सेवेत आले आहेत. उपचारासाठी आरोग्य विमा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संशोधन आणि समुपदेशन व निवासी सुविधा अशा पंचसूत्रीसोबत रुग्णांचा उपचार कालावधी सुखकर करण्याचा यशस्वी प्रयत्न कोल्हापुरातील खासगी वैद्यकीय सेवेत होत आहेत.

त्यामुळे कोल्हापूरसह अवती-भोवतीच्या जिल्ह्यांतील रुग्ण उपचार घेण्यासाठी कोल्हापूरच्या खासगी व शासकीय रुग्णालयांना प्राधान्य देत आहेत.

पंधरा वर्षांपूर्वी हृदयविकार, कर्करोग, मूत्रपिंडाचे विकार, मेंदूविकार आदी गंभीर आजारी रुग्ण किंवा अपघातातील गंभीर जखमींवर उपचारासाठी कोल्हापुरात मोजक्या रुग्णालयांत उपचार होत होते. अनेकजण त्यातून बरे होत. मात्र अतिगंभीर रुग्णांना मिरज, पुणे, मुंबई, बंगळूर, बेळगाव आदी शहरांत जावे लागत होते.

परिणामी नातेवाइकांची धावपळ, पाच-दहा लाखांचा खर्च होऊनही रुग्णाला जखमीला अपवाद वगळता जीवदान मिळत नव्हते. पंधरा वर्षांत मात्र कोल्हापूरच्या वैद्यकीय सेवेत रुग्णालयांची संख्या वाढली. कमालीची अाधुनिकता आली. विविध शाखांचे डॉक्टर्स उपलब्ध झाले. कोल्हापुरात जवळपास १२०० हून अधिक रुग्णालये आहेत. यातील ५३ रुग्णालये मल्टिस्पेशालिटी आहेत. यात सात रुग्णालये सुपरस्पेशालिटी दर्जाची आहेत.

एकाच वेळी रुग्णांच्या चाचण्या होतात. यात रक्त लघवीपासून सिटी स्कॅन, एमआरआय पर्यंतच्या चाचण्या होतात. पुढे उपचारासाठी जनरल वॉर्ड, शस्त्रक्रिया, आयसीयू असे विभाग आहेत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरपासून ते दुर्बिणीतून शस्त्रक्रिया होतात, त्यासाठी मॉड्युलर ओटीचाही वापर होतो. हृदयविकारात विनाछेद हृदयशस्त्रक्रिया, ओपन हार्ट सर्जरी सध्या दहा रुग्णालयांत होते.

कॅन्सर रुग्णांसाठी दुर्बिणीतून शस्त्रक्रिया, केमोथेरपी, मनोबल वाढीसासाठी समुपदेशन, रुग्णासोबत नातेवाइकांना राहण्याची सोय तर बालरुग्णालयात खेळणी, प्ले बॉक्स, आयसीयू इनक्युबिलेटर अशा सुविधा आहेत. मेंदू विकारातील सात रुग्णालयांत उपचार होतात व अवघड शस्त्रक्रियाही होतात.

सलग २४ तास मेंदूवर शस्त्रक्रिया करून रुग्णाला जीवदान देणारे मेंदूविकारतज्ज्ञ येथे आहेत. मूत्रपिंडाचे विकार, पोटविकार, स्त्रीरोग विषयातील विशेष अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची रुग्णालये लोकप्रिय आहेत. रुग्णांचा वेळ, श्रम व पैशाची बचत होण्याचा विविध पर्याय येथे उपलब्ध आहेत.

विविध रुग्णालयांच्या इमारती व आतील पायाभूत व वैद्यकीय उपचार सुविधा अालिशान व तंत्रशुद्ध आहेत. वातानुकूलित यंत्रणा आहेत. त्यामुळे आल्हादायक वातावरणात उपचार होतात. विविध रुग्णालयांत आलिशान सुविधा आहेत. उपचार खर्चही कमीत कमी २५ हजारांपासून काही लाखांपर्यंतचा उपचार खर्च येतो.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचाराची सुविधा ५२ रुग्णालयांत आहे. याशिवाय मोठ्या खर्चाच्या शस्त्रक्रिया मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अार्थिक मदत दिली जाते. याशिवाय १६ आघाडीच्या विमा कंपन्यांकडून आरोग्य विमा योजना चालविली जाते. यात रुग्ण उपचाराला गेल्यापासून तो डिस्चार्ज होऊन घरी जाईपर्यंतचा खर्च विमा कंपनीकडून रुग्णालयाला दिला जातो.

बहुतेक मोठ्या रुग्णालयांत माहिती-तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. दोन ठिकाणी रोबोटद्वारे उपचार करण्याचा प्रयोग यशस्वी झाला तर टेस्ट ट्यूब बेबीपासून ते स्टेम सेल्सपर्यंत व जनुकीय संक्रमणापासून ते नैराश्य दूर करण्यापर्यंतच्या व जवळपास २४ विषयांत कोल्हापुरातील वैद्यकीय तज्‍ज्ञांनी केलेल्या संशोधनपर प्रबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविले गेले आहेत.

अशा संशोधनासाठी जवळपास १२ रिसर्च सेंटर आहेत. माहिती-तंत्रज्ञानाच्या अधारे रुग्णाच्या प्रकृतीची माहिती संकलन करून त्याचे विश्लेषण केले जाते. त्यामुळे वैद्यकीय संशोधनातही कोल्हापूरची आघाडी भविष्यातील उपचारसेवा बळकट करणारी ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg tourists drowned : मोठी बातमी! सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत मोठी अपडेट समोर! दि. बा. पाटलांचे नाव देण्यावर अखेर शिक्कामोर्तब, उद्घाटन कधी?

Nilesh Ghaiwal: "तानाजी सावंतला मध्ये का घेतोस? मी घरी येतो नाहीतर.." गुंड निलेश घायवळचा धमकीवजा फोन कॉल

Dextromethorphan Cough Syrup: राजस्थानमध्ये हे कफ सिरप ठरतंय धोकादायक! डेक्सट्रोमेथॉर्फनबद्दल जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Drishyam 3 : आता येतोय दृश्यम 3 ! अजय देवगण 'या' तारखेला करणार सिनेमाची घोषणा

SCROLL FOR NEXT