Heart Attack Symptoms
Heart Attack Symptoms Sakal
आरोग्य

World Heart Day 2023: हार्ट अटॅक येण्याच्या १ महिना आधीपासूनच शरीर देत असतं इशारा; लक्षणं ओळखा, सावध व्हा...

वैष्णवी कारंजकर

हल्ली हृदयविकाराचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. परिस्थिती अशी आहे की रोज कोणा ना कोणाला हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्या येतात. अशा परिस्थितीत हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात काही हालचाल होते की नाही हे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. झटका येण्याच्या अनेक दिवसांपूर्वीपासून दिसणारी लक्षणे ओळखता आली तर हा धोका टाळता येऊ शकतो.

शरीराचे कोणतेही विकार अचानक उद्भवत नाहीत. त्यांची लक्षणे बऱ्याच काळापासून दिसत असतात. पण बऱ्याचदा या लक्षणांची तीव्रता कमी असल्याने त्याकडे दुर्लक्ष होतं. किंवा अंगावर काढलं जातं. हृदयविकाराच्या बाबतीतही तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की झटका येण्याच्या पूर्वी कोणती लक्षणे दिसतात, शरीर कोणते संकेत देतं? या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखातून करणार आहे.

याबद्दल गुरुग्राम इथल्या नारायण सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलचे सल्लागार डॉ. सौरभ चोप्रा यांनी माहिती दिली आहे. ही माहिती इंडिया टीव्हीने प्रसिद्ध केली आहे. डॉक्टरांच्या मते, हृदयविकाराचा झटका येतो, तेव्हा लोकांना त्याची माहिती नसते, लक्षणे ओळखता येत नाही. पण काही असे संकेत आहेत, जे एक महिना आधीच येऊ लागतात. पण ते लक्षात येणं महत्त्वाचं आहे. ही लक्षणे समजून घेऊन, वेळीच सावध झाल्याने हृदयविकाराचा झटका टाळता येतो.

काय आहेत ही लक्षणे?

  • तुम्हाला झोपेचा त्रास होतो.

  • खूप थकवा जाणवतो.

  • श्वास घेण्यास त्रास होतो.

  • अशक्तपणा सुरू होतो आणि जास्त चिकट घाम येतो.

  • चक्कर येणे किंवा उलट्या होणे.

  • रात्री झोपतानाही हातात अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास होतो.

जर तुम्हालाही अशी चिन्हे दिसत असतील तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा आणि स्वतःची तपासणी करा. कारण योग्य वेळी चाचणी करून तुम्ही हा हृदयाशी संबंधित आजार ओळखू शकता आणि भविष्यात होण्यापासून रोखू शकता.

हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून तुम्हाला कारणीभूत असलेल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. जसे की जास्त तेल आणि ट्रायग्लिसराइड असलेले पदार्थ खाणे टाळा. हे रक्तवाहिन्यांना चिकटून राहून हृदयविकाराचा झटका येतो. याशिवाय दररोज 30 मिनिटे फिरायला जा आणि थोडा व्यायाम करा. निरोगी आहार घ्या आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.

टीप - ही माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे. प्रत्येक पाऊल आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने उचलावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT