World Heart Day heart disease doctor cpr tratment health heart attack
World Heart Day heart disease doctor cpr tratment health heart attack sakal
आरोग्य

World Heart Day : हृदयरोगाबाबत वेळीच दक्षता हवी!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आशिष घरातून ऑफिसचे काम करत होता. त्याचे कॉल सुरू होते. त्याचे ६४ वर्षांचे वडील त्याच वेळी चार वर्षांच्या नातीला टाळ्या वाजवून खेळवत होते. त्या टाळ्यांचा आवाज कॉलवर असलेल्या आशिषला त्रासदायक वाटत होता. अचानक टाळ्यांचा आवाज थांबला. नंतर काहीच आवाज नाही. ती नीरव शांतताही आशिषला नकोशी झाली. त्याने मुलगी आणि वडिलांच्या खोलीत डोकावले तर... वडील बसल्या जागी कोसळले होते.

आशिषने तातडीने डॉक्टरांना बोलविले. पण, हृदयक्रिया अचानक बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याला वैद्यकीय परिभाषेत ‘सडन कार्डियाक अरेस्ट’ (एससीए) असे म्हणतात. अशा घटना सातत्याने वाढत असल्याचे निरीक्षण उद्या (ता. २९) होणाऱ्या जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने हृदयरोग तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

कोणाला धोका असतो?

  • हृदयविकाराच्या तीव्र झटक्यातून बचावलेला रुग्ण

  • हृदयाची गती वाढलेला रुग्ण

  • हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर हृदयाची गती कमी झालेला रुग्ण

  • तुमच्या कुटुंबात यापूर्वी कोणाचा अकस्मात मृत्यू झाला असले तर धोका वाढतो

  • चाळीस वर्षांनंतर धोका वाढतो

‘एससीए’ म्हणजे काय?

हृदयाच्या विद्युतीय क्रियेत बिघाड झाल्याने हृदयाचे ठोके अनियमित होतात. त्यातून हृदयाचे कार्य अचानक थांबते. त्यामुळे मेंदूचा रक्तपुरवठा बंद होऊन रुग्ण बेशुद्ध होतो.

तुम्ही काय करू शकता?

तुमच्या समोर एखादा माणूस नियमित काम करताना अचानक कोसळल्यास त्याला तातडीने ‘सीपीआर’ द्या. त्याच वेळी कार्डियाक रुग्णवाहिका किंवा अद्ययावत रुग्णवाहिकेला मदतीसाठी बोलवा. रुग्णाला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत त्याच्या शरीरातील रक्ताभिसरण क्रिया ‘सीपीआर’मुळे होते. त्यातून प्रत्येक अवयवांना प्राणवायू मिळतो, अशी माहिती डॉ. भाटे यांनी दिली.

कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन’चे (सीपीआर) प्रशिक्षण या वेळी महत्त्वाचे ठरते. रुग्णाच्या जवळच्या व्यक्ती प्रशिक्षित असल्यास रुग्णाचे प्राण वाचण्याची शक्यता वाढते. अर्थात, ‘सीपीआर’ देत रुग्णाला अत्यल्प वेळेत अद्ययावत सुविधांनी सुसज्ज कॅथलॅबपर्यंत पोचविणे आवश्यक असते. तरच, यातील रुग्णांचे प्राण वाचतील.

- डॉ. सुधीर भाटे, हृदयरोग तज्ज्ञ

सात्त्विक आहार, व्यसनाधीनतेपासून दूर राहणे, तसेच नियमित व्यायाम आणि नैसर्गिक जीवनशैली ही हृदयरोगापासून दूर राहण्याची चतुःसूत्री आहे. सध्या शहरी भागांत हृदयरोगाचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचे दिसते. अशा रुग्णांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध आहेत.

- डॉ. सत्यजित सूर्यवंशी, हृदयरोग तज्ज्ञ, संजीवनी व्हायटललाइफ मेडिपॉइंट हॉस्पिटल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT