World Hepatitis Day 2024 Sakal
आरोग्य

World Hepatitis Day 2024: हिपॅटायटीसला दूर ठेवण्यासाठी आजपासूनच 'या' आसनाचा सुरू करा सराव

World Hepatitis Day 2024: दरवर्षी 28 जुलै रोजी जगभरात ' जागतिक हिपॅटायटीस दिवस' साजरा केला जातो. हा आजार दूषित पाणी आणि खाद्यपदार्थ खाल्ल्यने होतो. या आजारापासून दूर राहायचे असेल तर पुढील आसनाचा नियमितपणे सराव करावा.

Puja Bonkile

World Hepatitis Day 2024: दरवर्षी 28 जुलै रोजी जगभरात ' जागतिक हिपॅटायटीस दिवस' साजरा केला जातो. याच दिवशीहे हिपॅटीयटीस बी व्हायरसचा शोध लावणारे नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ बारूक ब्लकबर्ग यांचा वाढदिवस आहे. बारूच यांनी कोवळ व्हायरचा शोध लावला नाही तर त्याच्या उपचारासाठी लस देखील शोधली. त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. 2008 मध्ये पहिल्यांदा जागतिक हिपॅटायटीस दिवस साजरा करण्यात आला होता. या आजाराचे लक्षण कोणते आणि हा आजार दूर ठेवण्यासाठी कोणता योगा करावा हे जाणून घेऊया.

लक्षण कोणती

हिपॅटायटिस हा यकृतामध्ये होणारा गंभीर आजार आहे. या आजाराचे मुख्य लक्षण म्हणजे कावीळ आहे. यामध्ये पोटाच्या उजव्या बाजूला वेदना होतात. अनेक वेळा त्याची लक्षणे इतर आजारांशीही जुळतात ज्यामुळे लोकांना समजण्यास उशीर होतो.

जर तुम्ही या आजारावर लवकर उपचार केला नाही तर ते जीवघेणा ठरू शकते. सुरुवातीला योगासने करूनही तुम्ही या आजाराची लक्षणे कमी करू शकता.

पवनमुक्तासन

पवनमुक्तासन हा संस्कृत शब्द 'पवन' पासून तयार झाला आहे. पवन म्हणजे वारा, 'मुक्ता' म्हणजे आराम आणि 'आसन' म्हणजे योग मुद्रा यावरून आलेला हा शब्द आहे. पवनमुक्तासनाला इंग्रजीत गॅस रिलीज योग आसन म्हणतात.

कसे करावे

पवनमुक्तासन करण्यासाठी सर्वात पहिले शांत आणि सरळ ठिकाणी झोपावे.

झोपतांना दीर्घ श्वास घ्यावा.

श्वास सोडताना गुडघे छातीकडे आणा आणि हातांनी तुमच्या मांड्या पोटाकडे दाबा.

पुन्हा दीर्घ श्वास घ्यावे.

श्वास सोडताना डोके जमिनीवरून उचला. नंतर आपल्या हनुवटीने गुडघ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

दीर्घ श्वास घेऊन या आसनात राहण्याचा प्रयत्न करा.

नंतर पुर्वस्थितीत यावे.

असे २ ते ३ वेळा करावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT