World Hepatitis Day 2024 esakal
आरोग्य

World Hepatitis Day 2024 : हिपॅटायटीसपासून बचाव करायचांय? मग, तुमच्या आहारात 'या' खाद्यपदार्थांचा करा समावेश

World Hepatitis Day 2024 : दरवर्षी २८ जुलै हा दिवस ‘जागतिक हिपॅटायटीस दिन’ म्हणून साजरा केला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

World Hepatitis Day 2024 : हिपॅटायटीस हा यकृताशी संबंधित एक गंभीर आजार आहे. जगभरातील लाखो रूग्ण या आजाराला बळी पडतात. या आजाराबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या आजारावरील उपचारांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने दरवर्षी २८ जुलै हा दिवस ‘जागतिक हिपॅटायटीस दिन’ म्हणून साजरा केला जातो.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) जगभरातील अंदाजे ३३४ दशलक्ष लोक हिपॅटायटीस या आजारामुळे प्रभावित आहेत. या आजारामुळे यकृत कमकुवत होते. यकृत कमकुवत झाले की, त्याचा परिणाम पचनसंस्थेवरही होतो.

तज्ज्ञांच्या मते, या आजाराची लागण झालेल्या व्यक्तींनी खाण्यापिण्याच्या सवयींबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. उपचारांसोबतच तुम्ही आहाराची काय काळजी घ्यायची? आणि आहारात कोणत्या खाद्यपदार्थांचा समावेश करायचा? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

धान्ये

गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी, नाचणी इत्यादी प्रकारच्या धान्यांचा समावेश आहारात अवश्य करा. कारण, या धान्यांमध्ये पोषकघटकांचे विपुल प्रमाण आढळते. या संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश केल्याने शरीराला प्रथिनांचा योग्य पुरवठा होऊ शकेल. त्यामुळए, शरीरातील स्नायू मजबूत होतील आणि स्नायूंची क्षमता टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकेल.

फळे आणि हिरव्या पालेभाज्या

ताजी फळे आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्वे, कॅल्शिअम आणि इतर पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळते. त्यामुळे, ताज्या फळांचा आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात अवश्य समावेश करा. खास करून फायबर, फोलेट, व्हिटॅमिन ए, सी, बी 6 आणि पोटॅशिअमने समृद्ध असलेली फळे आणि हिरव्या पालेभाज्या खाण्याचा प्रयत्न करा.

टोमॅटो, दूध, शिमला मिरची, पालक, ब्रोकोली, भोपळा, स्ट्रॉबेरी, काळे मनुके, केळी, खजूर आणि दही इत्यादी खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा.

प्रथिने आहेत महत्वाची

हिपॅटायटीसच्या रूग्णांनी आहारात प्रथिनांचा समावेश करणे अतिशय महत्वाचे आहे. जर तुम्हाला सिरोसिसची समस्या असेल तर तुम्ही प्रथिनांचे विपुल प्रमाण असलेल्या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. यासाठी तुम्ही दूध, दही आणि चीज यांसारख्या दुग्धजन्य खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

'मला रक्ताच्या उलट्या…' प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोटामुळे सिनेसृष्टीतून ब्रेक, म्हणाला...'काळी जादू अन्..'

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

SCROLL FOR NEXT