World Lung Cancer Day 2025 | Date, History, Significance sakal
आरोग्य

World Lung Cancer Day 2025: कधी साजरा केला जातो वर्ल्ड लंग कॅन्सर डे? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व एकाच क्लिकवर

History and significance of World Lung Cancer Day in Marathi: जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन 2025 बद्दल तारीख, इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या एका क्लिकवर.

Anushka Tapshalkar

थोडक्यात:

  1. कर्करोग हा जगातील गंभीर आजारांपैकी एक असून त्यातील फुफ्फुसांचा कर्करोग सर्वात सामान्य आणि जीवघेणा आहे.

  2. जगातील कर्करोगामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी सुमारे 20% मृत्यू फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होतात.

  3. फुफ्फुसांचा कर्करोग बहुतेक वेळा उशिरा निदान होतो, जेव्हा तो प्रगत टप्प्यात पोहोचलेला असतो.

History, Significance of World Lung Cancer Day: जगातील अनेक गंभीर आजारांपैकी एक आजार म्हणजे कर्करोग. या कर्करोगाच्या सर्वात सामान्य आणि जीवघेण्या कर्करोगांपैकी म्हणजे फुफ्फुसांचा कर्करोग. जगातील जवळपास कर्करोगामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी २०% मृत्यू फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होतात. फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान अनेकदा खूप उशिरा होते, जेव्हा तो पुढच्या टप्प्यात पोहोचलेला असतो.

जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन

या गंभीर समस्येबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी १ ऑगस्ट रोजी जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील लोक एकत्र येऊन फुफ्फुसाच्या कर्करोगाबद्दल जागरुकता वाढवतात, तसेच त्वरित निदान आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दल माहिती देतात.

जागतिक फुफ्फुस दिनाचा इतिहास

दरवर्षी १ ऑगस्ट रोजी जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन साजरा केला जातो. अनेकदा कमी ओळखला जाणारा आजार असल्यामुळे या दिवसाची सुरुवात लोकांना अधिक माहिती देण्यासाठी आणि त्याकडे लक्ष वेधण्यासाठी झाली.

पहिला जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन २०१२ साली साजरा करण्यात आला. हा दिवस साजरा करताना आंतरराष्ट्रिय श्वसन समाज संच(Forum of International Respiratory Societies - FIRS) आणि इतर गटांनी एकत्र येऊन जनजागृती केली होती.

जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन साजरा करण्याचा उद्देश आणि महत्त्व

या दिवसाचा मुख्य उद्देश खालीलप्रमाणे आहे:

गैरसमज दूर करणे: फुफ्फुसाच्या कर्करोग फक्त धूम्रपान करणाऱ्यांच होतो असा एक मोठा गैरसमज आहे. असे अनेक गैरसमज दूर करणे.

लवकर निदानाचे महत्त्व: कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचार करणे सोपे होते आणि रुग्णाच्या जगण्याची शक्यता वाढते, हे लोकांना समजावून सांगणे.

प्रतिबंध आणि धोक्यांवर चर्चा: फुफ्फुसाचा कर्करोग टाळण्यासाठी काय उपाय करावेत आणि त्याचे धोके काय आहेत, यावर समाजात मुक्तसंवाद घडवून आणणे.

FAQs

  1. जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन कधी साजरा केला जातो? (When is World Lung Cancer Day observed?)
    जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन दरवर्षी १ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

  2. जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे? (What is the purpose of observing World Lung Cancer Day?)
    या दिवसाचा उद्देश फुफ्फुसाच्या कर्करोगाबद्दल जागरूकता वाढवणे, गैरसमज दूर करणे, लवकर निदानाचे महत्त्व समजावणे आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दल माहिती देणे हा आहे.

  3. फुफ्फुसाच्या कर्करोगाबाबत कोणते मोठे गैरसमज आहेत? (What are the common misconceptions about lung cancer?)
    सर्वात मोठा गैरसमज म्हणजे फुफ्फुसाचा कर्करोग फक्त धूम्रपान करणाऱ्यांनाच होतो. प्रत्यक्षात धूम्रपान न करणाऱ्यांनाही हा आजार होऊ शकतो.

  4. फुफ्फुसाचा कर्करोग टाळण्यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय करता येऊ शकतात? (What preventive measures can help reduce the risk of lung cancer?)
    धूम्रपान टाळणे, प्रदूषणापासून बचाव करणे, आरोग्यदायी आहार घेणे, नियमित आरोग्य तपासण्या करणे आणि जोखमीचे घटक ओळखून त्यापासून दूर राहणे हे महत्त्वाचे प्रतिबंधात्मक उपाय आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Sports Minister: मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाहीच; आता क्रीडामंत्रिपद सांभाळणार

Vice President Election: उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी होणाऱ्या निवडणुकीत कोण-कोण करणार मतदान? यादी झाली तयार!

Modi Cabinet Decisions: मोदी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले मोठे निर्णय; अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती!

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

सोलापूरकरांनो, रविवारी ‘हा’ मार्ग राहणार वाहतुकीसाठी बंद! वाहनांसाठी ४ पर्यायी मार्ग; पोलिस आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT