World Malaria Day  sakal
आरोग्य

World Malaria Day : मलेरियावर 'हे' पाच घरगुती उपाय असतात फायदेशीर, जाणून घ्या

मलेरियाविषयी जनजागृती करण्यासाठी २००७ पासून हा दिवस साजरा करण्याचे ठरविण्यात आले.

सकाळ डिजिटल टीम

दरवर्षी २५ एप्रिलाला मलेरिया दिवस हा जागतिक स्तरावर साजरा केला जातो. मलेरियाविषयी जनजागृती करण्यासाठी २००७ पासून हा दिवस साजरा करण्याचे ठरविण्यात आले.

मलेरिया या रोगाविषयी जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावी, या आजारावर मात करण्यासाठी उपाय योजना कोणत्या, लक्षणे कोणती? या संदर्भात लोकांना कळावे म्हणून मलेरिया दिवसाचे खास महत्त्व आहे.

मलेरिया म्हटलं की गंभीर आजार. मलेरियावर वेळीच औषध उपचार करणे गरजेचे आहे. कधी कधी घरगुती उपायही फायदेशीर ठरतात. आज आपण काही घरगुती उपायाविषयी जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

१. मलेरिया झाल्यास आल्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. आल्याचा छोटासा तुकडा पाण्यात उकळून त्यात मध टाकावे, यामुळे तुम्हाला मलेरियापासून फायदा मिळणार.

२. हळद हे नैसर्गिक दृष्ट्या आजार असो वा आणखी काही बेस्ट मेडिसीन म्हणून काम करते. हळदीमध्ये असणारे कर्क्युमिन हे मलेरियावर प्रभावीपणे काम करते. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात हळद घालून पिलात, तर त्याचा फायदा तुम्हाला दिसणार.

३. कलौंजीमध्ये अँटीऑक्सिडंट गुण असतात जे मलेरीयापासून दूर ठेवण्यास मदत करतात. दररोज सकाळी काहीही खाण्यापूर्वी कलौंजीला पाण्यात मिक्स करून प्यावे याचा फायदा तुम्हाला दिसून येणार.

४. मलेरियाविरुद्ध सर्वात मोठा रामबाण उपाय आहे ते म्हणजे मेथी. मेथी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. मेथीचे दाणेही खूप उपायकारक असतात. यासाठी रात्री पाण्यात मेथीचे दाणे भिजवून ठेवा आणि सकाळी उपाशी पोटी प्या.

५. मलेरियासाठी आणखी एक उपाय जास्त फायदेशीर ठरू शकतो तो म्हणजे अँटिऑक्सिडंट. दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटीव्हायरल गुणधर्म जास्त असतात त्यामुळे दालचिनी खाणे चांगले असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चीनने पाठ फिरवली, तेव्हा भारताने वाचवले प्राण; आफ्रिकेत भारतीय औषधांचा डंका आणि 'आरोग्यदूत' प्रतिमा!

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

ऑस्ट्रेलियात प्रवीण तरडेंची हरवलेली पैशांची बॅग ! सई ताम्हणकरने केलेली अशी मदत "आपली इंडस्ट्री मदत.."

आफ्रिकेच्या सुपीक जमिनीत भारतीयांची कमाल; जगाचे अन्न संकट मिटवणारी 'महासंधी'

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

SCROLL FOR NEXT