World Oral Health Day 2023 esakal
आरोग्य

World Oral Health Day 2023 : 'या' पाच कारणांनी येतो तोंडाचा वास, जाणून घ्या एका क्लिकवर

जाणून घ्या ही पाच कारणे ज्यामुळे कदाचित तुमच्या तोंडाचा वास येत असेल

साक्षी राऊत

World Oral Health Day 2023 : अनेकांच्या तोंडातून वास येणे ही एक सामान्य समस्या झाली आहे. मात्र हे लक्षण एखाद्या मोठ्या आजाराचंही असू शकतं. आज वर्ल्ड ओरल हेल्थ डे आहे. तेव्हा या निमित्ताने वेळीच जाणून घ्या ही पाच कारणे ज्यामुळे कदाचित तुमच्या तोंडाचा वास येत असेल.

वर्ल्ड ओरल हेल्थ डे दरवर्षी 20 मार्च रोजी साजरा केला जातो. मुखाच्या आरोग्याच्या समस्येबद्दल लोकांना जागरूक करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. लोकांनी दात, जीभ किंवा तोंडाच्या इतर भागांमधील समस्यांबद्दल गंभीर असले पाहिजे. कधी-कधी या छोट्या-छोट्या समस्याही मोठ्या आजारांचे कारण बनतात. तोंडातून दुर्गंधी येणे हे तोंडाच्या आरोग्यासह आजारी असण्याचे लक्षण असू शकते. कधीकधी हा रोग गंभीर असू शकतो. कोणत्या कारणांमुळे तोंडाला दुर्गंधी येऊ शकते हे जाणून घेऊयात.

तोंडाचा वास येण्याची ही 5 कारणं असू शकतात

1. लसूण, कांद्याचे सेवन

लसूण आणि कांद्याचा वास खूप वाईट असतो. दूर उभ्या असलेल्या माणसालाही लसूण किंवा कांदा खाल्ल्याचे ओळखता येते. जर तुम्ही नियमित कांदा, लसूण खात असाल तर श्वासात दुर्गंधी येऊ शकते.

2. मद्यपान, धूम्रपान

दारू आणि धूम्रपान करणाऱ्यांच्या तोंडातून दुर्गंधी येते. दारूचा वास लांबून येतो. त्याचप्रमाणे धुम्रपान करणाऱ्यांनाही दुरूनच ओळखले जाते. (Health)

3. तोंड कोरडे पडणे

सर्वसाधारणपणे, सर्व लोकांच्या तोंडात लाळ तयार होते. लाळ तोंडातील बॅक्टेरिया साफ करण्यास मदत करते. पण ज्या लोकांच्या तोंडात योग्य लाळ नाही, अशा लोकांच्या तोंडातून दुर्गंधी येऊ शकते.

4. औषधांची रिअॅक्शन

तोंडात, नाकात किंवा घशातील काही आजार, औषधाची रिअॅक्शन किंवा दोन्हीमुळे दुर्गंधी येऊ शकते. (Oral Health)

5. पोट दुखणे

कधीकधी पोटदुखी आणि गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग व्यतिरिक्त इतर आरोग्य कारणांमुळे श्वासाची दुर्गंधी येऊ शकते. तोंडातून जास्त वास येत असेल तर डॉक्टरांना दाखवावे.

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT