आरोग्य

World soil day : तुम्हालाही माती खावीशी वाटतेय का ?

जागतिक मृदा दिन का साजरा केला जातो

सकाळ डिजिटल टीम

तरुणपणात सर्रास कामात चूक झाली की कशाला माती खालीस अस ऐकवलं जातं. त्याचा शब्दशः अर्थ घेऊन अनेक लोक खरच माती खातात. त्यांना ते व्यसन जडलेल असत. माती तोच व्यक्ती जास्त खातो ज्याच्या शिरीरात कॅल्शियमची कमतरता असते. त्यामुळे अनेक लहान मुलेही माती खातात. त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. how stop soil eating habbit

आज जागतिक मृदा दिन आहे. हा दिवस का साजरा केला जातो. त्यामागील उद्दिष्ठ काय आहे, हे पाहुयात. मातीचा ऱ्हास होणे ही पर्यावरणासाठी एक मोठा धोका आहे. जागतिक स्तरावर ही एक मोठी समस्या मानली जाते. म्हणून 5 डिसेंबर हा दिवस माती संबंध समस्या, त्यातली आव्हाने, मातीचे संवर्धन इत्यादी गोष्टीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.

युनायटेड नेशन्स अनुसार, यावर्षीची जागतिक मृदा दिनाची थीम आहे ‘सॉईल: वेअर फुड बिगीन’ म्हणजेच मातीची एक अशी गोष्ट आहे जिथे अन्न मिळायला सुरुवात होते. माती व्यवस्थापनातील वाढती आव्हाने सोडवण्यासाठी आणि मातीबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो.

आता पाहुयात तूम्हाला माती खावीशी वाटते त्यामागिल कारणे काय आहेत. काही मुलांना तुम्ही गुपचूप माती, भिंतीची पापुद्रे, भिंतीचा रंग चाटणं किंवा खडू खाताना अनेकदा पाहिलं असेल. ही सवय म्हणजे मुलांना कित्येक मानसिक आणि शारीरिक गंभीर आजारांची लागण होऊ शकते, याचे संकेत आहेत. माती खाणे केवळ लहान मुलांसाठीच नव्हे तर तरूण, वृद्ध सर्वांच्याच आरोग्यासाठी धोकादायक आहे.

व्हिटॅमिन आणि मिनरल्सची कमतरता किंवा अन्य मानसिक समस्यांमुळे माती खावीशी वाटते. झिंक आणि लोह यांची कमतरता असणे.एखाद्या गोष्टीची चव आवडणे. मेंदूला दुखापत झाल्यानं माती खाण्याची सवय लागू शकते. आहारातील पोषक घटकांची कमतरता असणे ही कारणे माती खाण्याच्या सवयीची असू शकतात.

माती खाणे आवडत असले तरी त्याचे गंभीर परिणाम कालांतराने बद्धकोष्ठता, यकृत आणि मूत्रपिंड निकामी होणे, मुतखडा होणे असे आजार होतात. बहुतांश वेळा मुलांच्या पोटात मातीसोबत छोटे दगड किंवा न पचणाऱ्या गोष्टी देखील जातात. ज्यामुळे मुलांच्या आतड्यांच्या कार्यामध्ये बिघाड होतो. मातीतील जिवाणूंमुळे मुलांना गंभीर आजारांचा संसर्ग होण्याची भीती असते. काही गंभीर संसर्गामुळे तूमचे यकृत आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका असतो.

लहान मुलांच्या माती खाण्याला कसे सोडवाल

आयुर्वेदात चांगली सोनकाव मिळते. ती 15 ग्रॅम घ्या आणि त्यात दीड चमचा तूप हे मिश्रण लोखंडी तव्यावर परतून घ्यावे. परतल्यावर हे मिश्रण ठिसूळ बनते. याच्या गोळ्या करून त्या गोळया मुलांना सकाळी सायंकाळी एकेक अशा तीन आठवडे रोज द्याव्यात. यामूळे मुलांची माती खाण्याची सवय सुटेल. तरूण वयात असणाऱ्या तूमची माती खाण्याची सवय इच्छाशक्तीने सुटू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

Pune Youth Murder in College Campus : पुण्यात खळबळ!, सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा तरूणाची कोयत्याने वार करून हत्या

Sheikh Hasina: शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; भारत आता त्यांना परत बांगलादेशात पाठवणार का? जाणून घ्या नियम...

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Kolhapur News: गोकुळच्या लिंगनूर कार्यक्रमात ‘लाडकी बहीण’ वरुन रंगले कलगीतुरे

SCROLL FOR NEXT