World Vitiligo Day 2025 sakal
आरोग्य

World Vitiligo Day 2025: शरीरावरील पांढऱ्या डागांकडे आजार म्हणूनच बघा; तज्ज्ञांनी दिला सल्ला

Causes of White Patches on Skin According to Dermatologists: शरीरावरील पांढरे डाग सौंदर्याचा दोष नसून वैद्यकीय निदान आवश्यक असलेला त्वचा विकार आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.

सकाळ वृत्तसेवा

How to Treat White Spots on Skin Medically: आपल्या त्वचेचा रंग कायम तोच राहात नाही. हा रंग दररोज नव्याने तयार होत असतो. पहिला रंग निघूनही जात असतो. रंग तयार करणाऱ्या पेशींना ‘पिगमेंट सेल्स’ किंवा ‘मेलॅनोसाईट’ (रंगपेशी) म्हणतात. या पेशी शरीरातील काही अंतर्गत कारणांमुळे नष्ट झाल्या तर त्वचेचा रंग तयार होण्यात अडथळे येतात.

त्वचेच्या ज्या भागात रंग तयार होऊ शकत नाही तिथे पांढरा डाग म्हणजे ‘कोड’ पडतो. हा आजार संसर्गजन्य मुळीच नाही. यावर पेशी रोपण ही प्रक्रिया महत्त्वाचे ठरते, अशी माहिती वैद्यक तज्ज्ञांनी दिली.

पांढरे डागावर पेशीरोपणातून पर्याय उपलब्ध आहेत. रुग्णाच्याच शरीरावरील त्वचेचा थोडासा तुकडा काढून घेतला जातो. त्यावर प्रक्रिया करून त्यातील रंगपेशी वेगळ्या काढल्या जातात. या पेशींमध्ये काही विशिष्ट घटक मिसळून त्याचे द्रावण तयार केले जाते आणि ते डाग आलेल्या त्वचेत सोडले जाते. पेशीरोपण शरीराच्या कोणत्याही भागात करता येते. डागांमध्ये रंगपेशी सोडल्यानंतर त्या आपले रंग तयार करण्याचे काम करू लागतात, आणि डागाला मूळ त्वचेसारखा रंग येऊ लागतो, अशी माहिती डॉ. अनुपम टाकळकर आणि डॉ. योगेश लक्कास यांनी दिली.

पांढरे डाग अर्तात कोड (विटीलिगो) हा त्वचेवरील एक असंसर्गजन्य आजार आहे. या आजाराबाबत समाजात आजही गैरसमज पसरले आहेत. आई-वडिलांना हा आजार असेल तर केवळ ५ टक्के रुग्णांमध्ये अनुवंशिकता दिसून येते. उर्वरित ९० टक्के रुग्णांमध्ये आनुवंशिक आढळून येत नाहीत. हा आजार कोणत्याही वयोगटात होऊ शकतो, असेही डॉ. टाकळकर म्हणाले.

मासे खाल्ल्यावर, दूध पिल्याने कोड होतो’, ‘पांढऱ्या गोष्टी खाल्ल्याने पांढरे डाग होतात’ अशा अंधश्रद्धा आजही प्रचलित आहेत. परंतु यांचा पांढरा डाग या आजाराशी काहीही संबंध नाही. पचन, मानसिक तणाव, प्रतिकारशक्तीतील गोंधळ या गोष्टींशी संबंधित आहे. हा असंसर्गजन्य आजार असून यावर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. समाजाने गैरसमज झुगारून समजूतदारपणाने या आजाराकडे बघावे.

- डॉ. अनुपम टाकळकर, पांढरे डाग रोग तज्ज्ञ

प्रभावी उपचारामध्ये तोंडावाटे घ्यावयाच्या औषधी आहेत. तसेच त्वचेवर लावण्यासाठी टॉपिकल मलम आहे. याशिवाय पुवा अशी फोटोथेरपी आहे. नॅरोबॅंड युव्हीबी थेरपी, एक्साईमर लेझरद्वारेदेखील उपचार शक्य आहेत. मिनीग्राफ्टिंग आणि सर्जिकल पर्याय उपलब्ध आहेत.

- डॉ. योगेश लक्कास, पांढरे डाग तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सलग आठव्या दिवशी शेअर बाजार घसरला; सेन्सेक्स 100 अंकांनी खाली, कोणत्या शेअर्समध्ये विक्री?

Eknath Shinde: राज्यात पूरस्थितीचे संकट मोठे, शेतकऱ्यांना मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही; एकनाथ शिंदेंची ग्वाही

Latest Marathi News Live Update: नालासोपारा पूर्वेमधील कपड्यांच्या दुकानाला लागली आग

TCS Layoffs: 'टीसीएस'मध्ये खरंच किती कर्मचाऱ्यांची कपात झाली? 12000 की 60000?

Ravindra Mangave : कारभारातील नाराजीमुळे अध्यक्ष ललित गांधींचा राजीनामा; रवींद्र माणगावे प्रभारी अध्यक्ष

SCROLL FOR NEXT