Home Remedies for Yellow and Crooked Teeth sakal
आरोग्य

Teeth Whitening at Home: पिवळसर, वाकडे-तिकडे दात आहेत? 'हा' घरगुती उपाय देईल परफेक्ट स्माईल

Home Tips to Whiten Teeth Naturally and Improve Dental Appearance: पिवळसर किंवा वाकडे-तिकडे दातांवर घरगुती उपाय करून मिळवा परफेक्ट आणि आत्मविश्वासपूर्ण स्माईल.

Anushka Tapshalkar

Home Remedy for Crooked and Stained Teeth: "फर्स्ट इंप्रेशन इज द लास्ट इंप्रेशन" ही म्हण आपण नेहमी ऐकतो, आणि अनेकदा हे पहिलं इंप्रेशन तुमच्या स्माईलमुळे तयार होतं. मात्र, केवळ हसूच नाही तर त्या हसण्यामध्ये दिसणारे दातही तितकेच महत्त्वाचे असतात. म्हणूनच, जेव्हा दात पिवळसर, वाकडे किंवा डाग पडलेले असतात, तेव्हा तुमचं इंप्रेशन खराब होण्याची शक्यता वाढते.

मजबूत, स्वच्छ आणि योग्य आकारातील दात तुमच्या स्माईलला देखणं बनवतात. पण जर दात पिवळसर, छोटे, डाग असलेले, किंवा वाकडे-तिकडे असतील, तर ते तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकतात.

दात पिवळे का पडतात?

दातांवर असणारा इनेमल हा एक प्रकारचा बाहेरचा थर असतो जो दातांचं संरक्षण करतो. या थरात अगदी बारीक छिद्रं असतात. आपण जे खातो किंवा पितो त्यातील रंगद्रव्य या छिद्रांमध्ये अडकतात, आणि त्यामुळे दातांचा रंग हळूहळू बदलू लागतो. त्यामुळे दात पिवळे, जीर्ण किंवा कधी कधी तपकिरी देखील दिसू शकतात.

वय वाढल्यावर हा इनेमलचा थर नैसर्गिकरित्या पातळ होतो आणि थोडा पारदर्शक बनतो. त्यामुळे आतल्या बाजूचा पिवळसर भाग जास्त दिसू लागतो, आणि यामुळे संपूर्ण दात पिवळसर वाटतात. पण वेळेतच योग्य उपाय केल्यास हे टाळता येते.

हायड्रोजन पेरॉक्साइड = स्वच्छ दात

डेंटिस्टच्या मते, हायड्रोजन पेरॉक्साइड हे एक सौम्य ब्लीचिंग एजंट आहे जे दातांवरील पिवळसर थर काढण्यास मदत करते.

3% हायड्रोजन पेरॉक्साइड पाण्यात मिसळून तुम्ही माउथवॉशप्रमाणे याचा वापर करू शकता. काही लोक बेकिंग सोडा व हायड्रोजन पेरॉक्साइड एकत्र करून ब्रश करतात. मात्र कोणताही उपाय करताना दंतविशेषज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

वाकड्या अन् छोट्या दातांना कसे दुरुस्त करायचे?

जर तुमचे दात वाकडे, छोटे किंवा आकाराने असमतोल असतील, तर त्यावर आधुनिक उपचार उपलब्ध आहेत. वाकड्या दातांसाठी Invisalign (Retainers) किंवा Braces हे प्रभावी पर्याय ठरतात. Invisalign ही पारदर्शक, काढता येणारी प्लास्टिकची अलाईनर असून ती दिवसातून 20–22 तास घालावी लागते आणि ती हळूहळू दात सरळ करते.

दुसरीकडे, जर दात छोटे, तुटलेले, जीर्ण किंवा डाग पडलेले असतील, तर त्यांच्यावर Veneers हे उपाय उपयुक्त ठरतात. हे एक पातळ कव्हरिंग असते जे दातांवर चिकटवले जाते आणि दातांना स्वच्छ, समप्रमाणात आणि आकर्षक रूप देते, ज्यामुळे तुमचं हसू अधिक देखणं दिसतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT