आरोग्य

Yoga Diet Chart : योगा झाल्यानंतर 'या' हेल्दी पेयांचे करावे सेवन

Yoga Diet Chart : योगा करणे फायदेशीर असते. तसेच योगा झाल्यानंतर कोणत्या पदार्थांचे सेवन करावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

निरोगी आणि तंदूरूस्त राहण्यासाठी योगा करणे फायदेशीर असते. योगा करताना शरिरातून घाम बाहेर पडतो. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवू शकते. विशेषत: उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. याचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. यासाठी योगानंतर कोणत्या पेयांचे सेवन करावे हे जाणून घेऊया.

पोषक पेय प्यायल्याने फक्त तहान शमवत नाही, तर शरीरातील पाण्याची पातळी आणि स्नायूंन मजबूत ठेवण्यास मदत करते.

  • नारळ पाणी

नारळपाणी प्यायल्याने नैसर्गिकरित्या फ्रेश वाटते. तसेच शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारख्या तुमच्या शरीराला आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स पुरवते. योगानंतर येणारे क्रॅम्पस टाळण्यास मदत करते.

  • लिंबू पाणी

लिंबू पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे पचनसंस्था सुरळित कार्य करते. योगा झाल्यानंतर या पेयाचे सेवन करू शकता.

  • भाज्यांचा रस

योगानंतर ताज्या भाज्यांचा रस घेणे फायदेशीर असते. यामध्ये तुम्ही काकडी, पालक, गाजर यासारख्या भाज्यांचा समावेश करू शकता. यामुळे शरीराला ऊर्जी मिळते. योगानंतर तुमच्या शरीराचे ऊर्जावान करण्यासाठी भाज्यांचा रस प्यावा.

  • गवती चहा

योगानंतर गवती चहा पिऊ शकता. यामुळे शरीर हायड्रेट राहते. तसेच पचन सुरळित राहते.

  • कोरफड रस

कोरफड रस आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असते. कोरफड रस पचनास समर्थन देते, तुमची प्रतिकारशक्ती वाढवते आणि जळजळ पातळी कमी करते. योगानंतर कोरफड रसाचे सेवन करू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tandulwadi Accident : इरफान बनला 'देवदूत'! चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत मारली उडी अन् चौघांचा वाचवला जीव; डोळ्यांदेखत गाडी 200 फुटांवरूनच...

Karad Accident: सुटीचा आनंद ठरला दुर्दैवी! गणपतीपुळ्याच्या प्रवासात तरुण अभियंत्याचा मृत्यू, कार ३०० फूट खड्ड्यात, तीन मित्र अन् मध्यरात्री काय घडलं..

FDA Decision: रुग्णांना दिलासा! रुग्णालयातीलच औषध दुकानातून खरेदीची सक्ती नाही; FDAचा मोठा निर्णय

म्युच्युअल फंड : फ्लेक्सी कॅप फंड : संपत्तीनिर्मितीचा उत्तम मार्ग

US-Iran Deal : जगासाठी दिलासा! अमेरिका-इराण तणाव १०७ दिवसांनी संपला, 'होर्मुझ' पुन्हा खुली होणार, ट्रम्प यांची शांती कराराची घोषणा

SCROLL FOR NEXT