Yoga For headache esakal
आरोग्य

Yoga For headache : सततच्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग, दररोज करा ‘ही’ योगासने, लवकर मिळेल आराम

Yoga For headache : योगाच्या मदतीमुळे तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळू शकतो.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga For headache : आजकालचे धावपळीचे जीवन, कामाचा ताण, बिघडलेला आहार आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांमध्ये डोकेदुखीचा ही समावेश आहे. ही जरी सामान्य समस्या असली तरी, त्यापासून आराम मिळवण्यासाठी लोक विविध प्रकारचे उपचार घेतात.

अगदी घरगुती उपचारांपासून ते औषधांपर्यंत लोक याव उपचार घेतात. परंतु, ज्यांना वारंवार डोकेदुखीचा त्रास होतो, त्यांनी सतत औषधोपचार घेणे हे आरोग्यासाठी फार काही चांगले नाही. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही योगाची मदत घेऊ शकतो.

योगाच्या मदतीमुळे तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळू शकतो. आज आम्ही तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी प्रभावी असणाऱ्या योगासनांबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात या योगासनांबद्दल.

सेतूबंधासन

सेतूबंधासन या योगासनाला इंग्रजीत ब्रिज पोझ असे ही म्हणतात. हे योगासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. या आसनात आपले संपूर्ण शरीर ताणले जाते आणि रक्ताभिसरणाची प्रक्रिया देखील सुधारते. डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी हे योगासन अतिशय प्रभावी मानले जाते.

हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पाठीवर झोपा. त्यानंतर, तुमचे दोन्ही पाय जमिनीला स्पर्श करतील अशा प्रकारे पायांचे गुडघे वाकवा. आता हातांच्या मदतीने तुमचे शरीर वर उचला. या स्थितीमध्ये दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण शरीरात ताण जाणवेल. आता हळूहळू पूर्वस्थितीमध्ये या. या आसनामुळे पाठदुखीची समस्या देखील कमी होते.

बालासन

बालासन हे योगासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. या योगासनाला ‘चाईल्ड पोझ’ म्हणून ही ओळखले जाते. मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी फायदेशीर असणारे हे योगासन करायला अतिशय सोपे आहे.

बालासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर दोन्ही गुडघ्यांवर बसा. आता तुमच्या मांड्या ताणून घ्या आणि दोन्ही हात पुढे जमिनीला समांतर स्थितीमध्ये ठेवा. तसेच, तुमचे डोके जमिनीला टेकवा. या स्थितीमध्ये तुमचे पोट गुडघ्यांना स्पर्श करेल अशा स्थितीमध्ये ठेवा.

या स्थितीमध्ये तुम्हाला संपूर्ण शरीरात ताण जाणवेल. त्यानंतर, सामान्य स्थितीमध्ये या. हे योगासन आपले शरीर आणि मन स्थिर आणि शांत ठेवण्यास मदत करते. या आसनाचा नियमितपणे सराव केल्याने मेंदूतील रक्तप्रवाह सुधारतो आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT