Yoga For Stamina esakal
आरोग्य

Yoga For Stamina : 'या' योगासनांमुळे वाढेल तुमच्या शरीराचा स्टॅमिना, दम लागणार नाही आणि थकवा ही जाणवणार नाही

Yoga For Stamina : जर आपल्या शरीरात योग्य स्टॅमिना असेल, तर आपले शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga For Stamina : जर आपल्या शरीरात योग्य स्टॅमिना असेल, तर आपले शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. एवढचं नव्हे तर शारिरीक आणि मानसिक ऊर्जेचे वर्णन करण्यासाठी हा स्टॅमिना शब्द खास करून वापरला जातो. शरीरात भरपूर स्टॅमिना असेल तर, आपण दीर्घकाळापर्यंत काम करू शकतो.

मात्र, आजकाल अनेकांच्या शरीरात स्टॅमिना कमी जाणवतो. त्यामुळे, शरीर लवकर थकते आणि दम लागतो. शिवाय, श्वास घेण्यास ही अडचणी येतात. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही नियमितपणे व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे फायद्याचे आहे. यासोबतच पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.

जर तुम्हाला शरीराचा स्टॅमिना वाढवायचा असेल, तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही आरोग्यादायी बदल करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही काही योगासनांची मदत घेऊ शकता. या योगासनांचा नियमितपणे सराव केल्याने तुमच्या शरीराची ताकद वाढते आणि स्टॅमिना ही वाढतो. ज्यामुळे, थकवा जाणवत नाही आणि दम लागत नाही. कोणती आहेत ही योगासने? चला तर मग जाणून घेऊयात. (yoga for stamina)

धनुरासन

धनुरासन हे योगासन आपल्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या योगासनाचा सराव केल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. या योगासनामुळे पचनसंस्था निरोगी राहते आणि कंबर, छातीच्या समस्यांपासून आराम मिळतो. शिवाय, स्टॅमिना देखील सुधारतो.

हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पोटावर झोपा. आता दोन्ही पायांचे घोटे तुमच्या दोन्ही हातांनी पकडण्याचा प्रयत्न करा. आता दोन्ही हातांनी पायांची बोटे पकडून दीर्घ श्वास घ्या. त्यानंतर, तुमचे पाय वरच्या दिशेने खेचा. आता तुम्हाला शरीरात ताण जाणवेल. काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर सामान्य स्थितीमध्ये परत या. (Dhanurasana)

उष्ट्रासन

या योगासनाचा सराव केल्याने आपल्या शरीराचा स्टॅमिना वाढण्यास मदत होते. यासोबतच आपले शरीर लवचिक होते. यासोबतच थकवा दूर होतो आणि डोळ्यांची दृष्टी सुधारते. इतकेच नव्हे तर पाठदुखीपासून आराम मिळतो आणि मानसिक आरोग्य देखील चांगले राहते.

मात्र, हे योगासन करताना योग अभ्यासकाची मदत घ्या किंवा योगा तज्ज्ञाच्या देखरेखीखाली हे योगासन करा. या योगासनाचा सराव करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर गुडघ्यावर बसा. त्यानंतर, श्वास घेताना पाठीच्या मणक्याच्या खालचा भाग हा पुढच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. या दरम्यान, तुमच्या नाभीवर पूर्ण दाब जाणवायला हवा. त्यानंतर, पाठीमागे वाकताना तुमची पाठ वाकवा आणि मान सैल सोडा. त्यानंतर, ३० ते ६० सेकंद या स्थितीमध्ये रहा. त्यानंतर, पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या. (Ushtrasana)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT