Yoga For Sleep Disk
Yoga For Sleep Disk esakal
आरोग्य

Yoga For Sleep Disk : स्लिप डिस्कच्या समस्येमुळे त्रस्त आहात? मग, ‘या’ योगासनांचा दररोज करा सराव

Monika Lonkar –Kumbhar

Yoga For Sleep Disk : कंबर आणि पाठदुखीची समस्या ही सामान्य असली तरी कधीकधी ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते. तासनतास चुकीच्या आसनांमध्ये बसणे, चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे स्लिप डिस्कची तक्रार आजकाल वाढली आहे. खास करून तरूणाईमध्ये ही समस्या वाढत चालली आहे. स्लिप डिस्क ही मणक्याच्या आरोग्याशी निर्माण होणारी एक स्थिती आहे. जी सामान्यत: हाडांची झीज आणि दुखापतीमुळे होते.

स्लिप डिस्कची समस्या दूर करण्यासाठी औषधोपचार घेतले जाते, वेगवेगळे व्यायाम प्रकार केले जातात. परंतु, या सगळ्यात तुम्ही योगाची देखील मदत घेऊ शकता. स्लिप डिस्कच्या बाबतीत शेवटचा उपचार हा ऑपरेशन मानला जातो.

परंतु, ही समस्या वेळीच ओळखून त्यावर योग्य उपचार करता येतात. यासाठी योगा हा एक प्रभावी उपचार आहे. स्लिप डिस्कमुळे होणाऱ्या असह्य वेदना कमी करण्यासाठी काही योगासनांचा सराव करणे फायदेशीर ठरू शकते. कोणती आहेत ही योगासने? चला तर मग जाणून घेऊयात.

उष्ट्रासन

पाठदुखीच्या समस्या दूर करण्यासाठी उष्ट्रासनाचा सराव करणे फायदेशीर आहे. या आसनामध्ये शरीराची स्थिती ही उंटासारखी असते. या योगासनाचा सराव करताना शरीर मागच्या बाजूने झुकवले जाते. या दाबामुळे मणक्याच्या समस्या दूर होतात. स्लिप डिस्कची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही या योगासनाचा दररोज सराव करू शकतात.

शवासन

शवासन हे योगासन करायला अतिशय सोपे असते. हे योगासन नियमितपणे केल्याने पाठदुखीच्या समस्या दूर होतात. तसेच, आरोग्याला अनेक फायदे होतात. विशेष म्हणजे हे आसन कोणत्याही योगाभ्यासानंतर शेवटचे केले जाते. हे एक सोपे योगासन आहे. जे सरावाने व्यवस्थित करता येते.

या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने शरीर आणि अंतर्गत ऊर्जा सुधारते. स्लिप डिस्कमुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही शवासनाचा नियमितपणे सराव करू शकता. जर तुम्ही हे योगासन पहिल्यांदाच करत असाल तर, योगातज्ज्ञाची मदत घेऊ शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT