yoga tips news
yoga tips news  esakal
आरोग्य

Yoga Tips : पोटाची चरबी घटवण्यास फायदेशीर आहे चक्की चलनासन

सकाळ डिजिटल टीम

पुणे : आजही शहराच्या तुलनेत खेड्यातील स्त्रीया अधिक फिट आहेत. याला कारणीभूत आहे खेड्यातील राहणीमान, जेवण आणि शेतीची, गुराढोरांची कामे. खेड्यात आजही प्रत्येक काम घरातच केले जावे यावर भर दिला जातो. दळण दळण्यासाठी जात्याचा वापर केला जातो. तर, पाणी भरण्यासाठी विहीरीचा मोट ओढला जातो. या कामांमूळेच, तेथीन स्त्रीया अधिक तंदुरूस्त आहेत. आज आपण अशाच एका योगासनाबद्दल जाणून घेऊयात...

या योगाला चक्कीचलनासन योग असे म्हणतात. हे नाव संस्कृतमधून आले असून चक्कीचा अर्थ घाम तर चलना म्हणजे चालवणे असा होतो. हे आसन करणे म्हणजे आपल्या समोर जाते आहे असे समजणे आणि ते हाताने फिरवणे. याला 'Churning the Mill Yoga Pose' असेही म्हणतात. हे आसन अनेक समस्यांपासून बचाव करते.

कसे करावे हे आसन

- हे आसन करण्यासाठी दोन्ही पाय पुढे ठेऊन चटईवर बसा.

- दोन्ही पाय एकमेकांपासून लांब पसरा.

- दोन्ही हातांची बोटे गुंफून हात जोडा.

- श्वास घेताना, तुमच्या शरीराचा वरचा भाग पुढे आणा. पाय झाकून हाताने मोठे वर्तुळ बनवा.

- पुढे वाकताना श्वास घ्या आणि मागे येताना श्वास सोडा.

- 10 वेळा सरळ दिशा तर उलट दिशेने 10 वेळा हात गोल फिरवा.

या आसनाचे फायदे

पोटाची चरबी लवकर कमी करण्यासाठी, तसेच स्त्रियांच्या गर्भाशयाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी उपयुक्त असे आसन आहे. हे नियमित केल्याने मासिक पाळीमध्ये होणारी पोटदुखी थांबते. हात, पाय दुखणे थांबते. तसेच मणक्यातील हाडे लवचिक होऊन कंबरदुखी थांबते. वय लपवण्यातही हे आसन फायदेशीर ठरते. तुम्हाला झोप लागत नसेल तर त्यातही हे आसन फायदेशीर आहे. चक्कीचलनासन योगामुळे मन शांत आणि स्टेबल राहण्यास मदत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

Cannes 2024: हात फ्रॅक्चर तरीही कान्समध्ये दिसला ऐश्वर्याचा जलवा; लेक आराध्याचं 'या' कारणामुळे होतंय कौतुक

Neelam Gorhe : जातीय तेढीमुळे आत्महत्या वाढतात;नीलम गोऱ्हे,कृषी क्षेत्रातील चांगल्या गोष्टींकडेही लक्ष द्या

SCROLL FOR NEXT