Yoga Tips: Sakal
आरोग्य

Yoga Tips: युफोनिक योग मानसिक आरोग्य दूर ठेवण्यास करतो मदत, जाणून घ्या सरावाची पद्धत

Euphonic Yoga Benefits: मानसिक आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर युफोनिक योग करू शकता.

Puja Bonkile

धावपळीच्या आणि व्यस्त जीवनात नैराश्याची समस्या उद्भवू शकते. यामुळे स्वत:साठी वेळ काढणे गरजेचे असते. ज्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य निरोगी राहील. नैराश्यामुळे शरीराशी संबंधित अनेक समस्याही उद्भवू शकतात.

यामुळे नियमितपणे योग करावा. योग तज्ज्ञांच्या मते योग उच्च रक्तदाब, तणाव आणि स्मरणशक्ती तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. योगाभ्यास करून नैराश्य आणि तणाव कमी करता येतो. त्याचप्रमाणे शारीरिक समस्याही कमी करता येतात. युफोनिक योगाचे फायदे कोणते आणि त्याचा सराव करण्याची योग्य पद्धत कोणती हे जाणून घेऊया.

युफोनिक योग म्हणजे काय?

शरीरात सात चक्रे असतात. सात चक्र सात नोटांशी संबंधित आहेत. जसे की सा, रे, ग, म, पा, ध, नी. सात चक्रांशी संबंधित सात नोट्स एकत्रितपणे एक आनंददायी योग तयार करतात. हा योग शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य आणि योगाचा संगम आहे. नृत्य आणि संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी ते प्रभावी ठरू शकतात.

युफोनिक योगाचा सराव करण्याचे फायदे

नृत्य आणि संगीतामुळे शरीरात एंडोर्फिन हार्मोन्स तयार होऊन आपल्याला आनंद वाटतो. यामुळे तणाव आणि नैराश्य कमी होतो.

युफोनिक योग विशेषत: तणाव कमी करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या योगाचा प्रभाव जवळपास चौपट वाढतो.

योगादरम्यान युफोनिक नृत्य केले जाते. यामुळे स्नायूंमध्ये लवचिकता आणण्यासाठी तसेच ताकद वाढवण्यास मदत करते.

या योगामुळे शरीराला अधिक ऊर्जा मिळते आणि अनेक शारीरिक समस्या दूर होतात.

युफोनिक योग देखील लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रभावी आहे.

उच्च रक्तदाब, ताणतणाव आणि स्मरणशक्ती वाढण्यासोबतच हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची दांडी, IIM जम्मूने ५०० रुपये दंडाची पाठवली नोटीस

Coastal Road Accident: BMW फ्लायओव्हरवरून खाली कशी कोसळली? धक्कादायक घटनेचा CCTV व्हायरल

UPI Transaction Fee : ऑनलाइन व्यवहारांना लागणार ब्रेक? केंद्र सरकारच्या निर्णयामुळं शेतकऱ्यांना बसणार लाखो रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड, UPI शुल्क बदलामुळं वाढली चिंता

SMRITI MANDHANA: सुजी बेट्सला मागे टाकलं अन् स्मृती मंधानाने रचला इतिहास! महिला T20I मध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली

Vastu Benefits of Shankh: घरात शंख ठेवण्याचे 'हे' आहेत फायदे; वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या शंखाचा योग्य प्रकार अन् दिशा!

SCROLL FOR NEXT