Yoga Tips:  Sakal
आरोग्य

Yoga Tips: थायरॉईडच्या औषधापासून मुक्ती हवी असेल तर 'या' योगासनांचा नियमित करा सराव, मिळेल आराम

Yoga Tips: थायरॉईडची समस्या असेल तर योगसनांची मदत घेऊन कमी करू शकता.

Puja Bonkile

तणावामुळे हायपोथायरॉईडीझमची समस्या होऊ शकते. जेव्हा थायरॉईडची पातळी वाढते तेव्हा आरोग्याशी संबंधित अनेक समस्या वाढू शकतात. थायरॉईड ही गळ्यामध्ये असलेली एक लहान ग्रंथी आहे, जी अनेक आवश्यक हार्मोन्स स्राव करते. हे हार्मोन्स चयापचय, शरीराचे तापमान आणि वाढीसाठी आवश्यक असतात. दोन्ही प्रकरणांमध्ये, थायरॉईडची पातळी वाढणे किंवा कमी करणे शरीराला हानी पोहोचवू शकते. थायरॉईड पातळी संतुलित करण्यासाठी योगासनांचा नियमितपणे सराव करू शकता.

योगा करणे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. योगामुळे शरीरातील उर्जा संतुलित राहते आणि लवचिकता वाढते. अनेक गंभीर आरोग्य समस्यांवर योगा प्रभावी मानली जातात. थायरॉईडची पातळी नियंत्रित करण्यासाठी आणि आरोग्य समस्या कमी करण्यासाठी पुढील योग करणे फायदेशीर ठरते.

सेतुबंधासन

या आसनाला ब्रिज पोज देखील म्हणतात. पाठ आणि पाठीचा कणा मजबूत करण्यासाठी हा योग करणे फायदेशीर आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की सेतुबंधासनाचा सराव केल्याने थायरॉईडची लक्षणे कमी होऊ शकतात.

कसे करावे?

हा योग करण्यासाठी सर्वात आधी पाठीवर झोपा आणि तुमचे पाय खांद्याच्या रुंदीवर थोडे वेगळे ठेवा आणि तुमचे गुडघे वाकवा. आता तळवे उघडताना हात जमिनीवर सरळ ठेवा आणि श्वास घेताना कमरेचा भाग वर उचला. श्वास सोडा आणि पुर्वस्थितीत परत या.

कोब्रा पोझ

थायरॉईडच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कोब्रा पोझचा सराव करू शकता. हा योग घसा आणि थायरॉईडला उत्तेजित करण्यासाठी उपयुक्त मानले जाते.

कसे करावे?

कोब्रा पोझचा सराव करण्यासाठी सर्वात आधी जमिनीवर झोपा आणि तुमचे तळवे खांद्याच्या रुंदीच्या अंतरावर जमिनीवर ठेवा. आता श्वास घेताना, छाती जमिनीवरून उचला आणि वर पाहावे. आता शरीर परत जमिनीवर आणा.

मांजरासन

थायरॉईडच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनी मांजरासनचा सराव करावा. घशात रक्तप्रवाह सुरू ठेवण्यासाठी याचा फायदा होतो.

कसा करावे?

हा योग करण्यासाठी सर्वात आधी मनगट आणि गुडघ्यांच्या मदतीने प्राण्यासारखी मुद्रा करा. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. हा योग दररोज 10 मिनिटे करावा.

टिप: वरील योग करण्यापुर्वी आरोग्यतज्ज्ञांचा नक्की सल्ला घ्यावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT