Yoga Tips: Sakal
आरोग्य

Yoga Tips: चमकदार अन् निरोगी त्वचेसाठी करा 'हे' योग, जाणून घ्या पद्धत

Yoga Tips: योगा केल्याने आरोग्यासह त्वचेला देखील फायदा मिळतो.

पुजा बोनकिले

yoga tips how to get healthy skin

आजच्या खराब जीवनशैली आणि वाढत्या प्रदूषणामुळे त्वचेची चमक कमी होऊ लागते. अनेक वेळा वयाच्या आधी त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. जीवनशैली आणि आहार हे देखील मुरुम येणे किंवा निस्तेज त्वचेचे कारण असू शकते. नियमितपणे योग केल्यास त्वचा निरोगी होते. यामुळे चेहऱ्याची चमकही कायम राहते.

योगा केल्याने शारीरिक अशुद्धी काढून रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करतात. यामुळे चेहऱ्याचा रंग आणि चमक सुधारते. जी चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी आणि त्वचा निरोगी बनवण्यासाठी फायदेशीर ठरते.

  • हलासन

हलासनाचा सराव करण्यासाठी आधी पाठीवर झोपावे. श्वास घेताना, पाय वरच्या दिशेने उचलून डोक्याच्या मागे घ्या. अंगठ्याने जमिनीला स्पर्श करून हात जमिनीवर सरळ ठेवा आणि कंबर जमिनीला घट्ट ठेवा. काही वेळ या स्थितीत रहा आणि नंतर श्वास सोडा आणि सामान्य स्थितीत या.

  • भुजंगासन

हा योग सर्वात आधी जमिनीवर झोपा आणि दोन्ही तळवे जमिनीवर खांद्याच्या रुंदीच्या अंतरावर ठेवा. तुम्हाला शरीराचा खालचा भाग जमिनीवर ठेवून श्वास घ्यावा लागेल आणि त्याचवेळी छाती जमिनीवरून उचलून छताकडे पहावे लागेल. शेवटी, श्वास सोडताना, शरीर परत जमिनीवर आणा.

  • त्रिकोनासन

त्रिकोनासन करताना दोन्ही पायांमध्ये जागा करून सरळ उभे रहा. नंतर दीर्घ श्वास घ्या आणि उजवीकडे वाकवा. यावेळी, आपले डोळे समोरच्या दिशेने ठेवा. या अवस्थेत उजव्या हाताच्या बोटांनी उजव्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. नंतर हळूहळू पूर्वीच्या स्थितीत या. हे आसन डाव्या बाजूनेही करा. दररोज 25-30 सेट करण्याची सवय लावा. यामुळे त्वचेवर सकारात्मक फरक दिसतो.

  • उत्तानासन

उत्तानासन करण्यासाठी सरळ उभे राहा. नंतर कमरेच्या वरच्या भागात श्वास घेताना पायाच्या बोटांना स्पर्श करावा. काही वेळ या स्थितीत राहिल्यानंतर, श्वास सोडा आणि सामान्य स्थितीत या. हा योग करताना लक्षात ठेवा की तुमचे गुडघे वाकलेले नसावेत.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांवर काही ठिकाणी वाहतूक मंदावली, नागरिकांची तारांबळ

हॅप्पी दिवाळी! दिपिका-रणवीरने लेक 'दुआ'सोबत पहिल्यांदाच शेअर केला फोटो....

शेवटच्या ओव्हरमध्ये ४ धावा अन् सामना टाय... BAN vs WI सामन्यात ड्रामा; थरारक सुपर ओव्हरमध्ये लागला निकाल

Deglur ZP Elections : ग्रामीण भागात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची धामधूम; शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बगल

PESA Candidates Disqualification : पेसा भरतीतील २३ उमेदवारांचे भवितव्य धोक्यात; दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता कशी करणार?

SCROLL FOR NEXT