Yoga Tips sakal
आरोग्य

Yoga Tips: पाठीचे स्नायू लवचिक करण्यासाठी 'या' तीन आसनांचा करा सराव

Puja Bonkile

Yoga Tips For Back Pain: अनेक लोकांना पोटावरच्या वाढलेल्या चरबीची समस्या असते. पण काही लोकांच्या शरीरावर अतिरिक्त चरबी असते,ज्यामुळे आवडते कपडे घालू शकत नाही.
हात, पाय किंवा पोटाची चरबी सहज कमी करता येते पण पाठीची चरबी कमी करण्यासाठी जास्त वेळ लागतो, कारण पाठीची अतिरिक्त चरबी कमी करणे अधिक कठीण असते. अशा परिस्थितीत जर तुमच्या पाठीवर चरबी असेल तर ती कमी करण्यासाठी तुम्ही पुढील योगासनांचा सराव करू शकता.

धनुरासन

या आसनाचा सराव करण्यासाठी पोटावर झोपा आणि गुडघे टेकवा. तळव्याने घोट्याला धरून, दोन्ही पाय आणि हात शक्य तितक्या उंच करा. आपले डोळे वरच्या दिशेने ठेवून काही वेळ या स्थितीत रहा. मग जुन्या स्थितीत परत या. यामुळे पाठीचे स्नायू लवचिक होतात.

पादहस्तासन

पादहस्तासनाचा सराव पाठीची चरबी कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे. हे आसन करण्यासाठी दोन्ही पाय सरळ उभे करा. आता हात शरीराच्या बाजूने सरळ ठेवून आतमध्ये श्वास घ्या. हात डोक्याच्या वर घ्या आणि शरीराला वर खेचा. आता श्वास सोडताना पाठीचा कणा सरळ ठेवा. या दरम्यान गुडघे आणि हात सरळ रेषेत ठेवून पुढे वाकणे. मग आपले हात जमिनीवर ठेवा आणि त्यांना आपल्या टाचांनी धरा.

भुजंगासन

पोटावर सरळ झोपा आणि पायांमध्ये काही अंतर ठेवा. आता हात छातीजवळ घ्या आणि तळवे खाली ठेवा. दीर्घ श्वास घेऊन नाभी वर करा आणि आकाशाकडे पहा. काही वेळ या आसनात राहिल्यानंतर पुन्हा पुन:स्थितीत या.

टीप:  वरील आसनांचा सराव करताना प्रशिक्षकांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT