Yoga Tips Sakal
आरोग्य

Yoga Tips: खुप भूक लागत असेल तर करू नका दूर्लक्ष, 'या' आसनांचा सराव करून मिळवा नियंत्रण

Yoga Tips: भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी लोक अनेक पद्धतींचा वापर करतात. काही लोक स्वतःला अधिक व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतात तर काही लोक दिवसभर झोपतात जेणेकरून त्यांना भूक लागू नये. पण याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

Puja Bonkile

Yoga Tips: उन्हाळ्यात दिवस खुप मोठा असतो. यामुळे अनेक लोकांना जास्त भूक लागते. जास्त भूक लागल्याने वजन वाढण्याचाही धोका असतो. भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी लोक अनेक पद्धतींचा वापर करतात. काही लोक स्वतःला अधिक व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतात तर काही लोक दिवसभर झोपतात जेणेकरून त्यांना भूक लागू नये. पण याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. काही योगासने भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत. त्याचा सराव केल्यास भूकवर नियंत्रण ठेवता येईल.

हलासन

हलासनाचा सराव केल्याने वाढते वजन आणि भूक नियंत्रित राहते. हलासनाचा सराव करण्यासाठी चटईवर तुमच्या पाठीवर झोपा आणि हळूहळू तुमचे दोन्ही पाय तुमच्या डोक्याच्या मागे वर करा आणि जमिनीला स्पर्श करा. जर तुम्ही तुमच्या पायांनी फरशीला स्पर्श करू शकत नसाल, तर त्यांना कमाल मर्यादेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा आणि काही सेकंद या स्थितीत रहा. या आसनामुळे पोटाची चरबी कमी होते आणि भूकही कमी होते.

वीरभद्रासन

हे आसन केल्याने तुम्ही तुमची भूक नियंत्रित करू शकता. विरभद्रासन करण्यासाठी सर्वात आधी जमिनीवर सरळ उभे राहून डावा पाय पुढे घेऊन गुडघा वाकवा. यादरम्यान उजव्या पायाचा घोटा बाहेर ठेऊन हात वरच्या दिशेने बाजूला करा. 30 सेकंद या स्थितीत रहा.

अधोमुख श्वानासन

भूक कमी करण्यासाठी अधो मुख श्वानासनाचा नियमित सराव केला जाऊ शकतो. हे आसन करण्यासाठी पोटावर झोपा आणि हात आणि पाय जमिनीवर ठेवून नितंब वर करा. आता डोके खाली ठेवून जमिनीच्या दिशेने टाच दाबा. 30 सेकंद या स्थितीत रहा, नंतर सामान्य स्थितीत परत या.

टीप: वरील योगासनांचा सराव करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT