Yoga Tips esakal
आरोग्य

Yoga Tips : थकवा अन् अशक्तपणामुळे त्रस्त आहात? मग, 'या' योगासनांचा दररोज करा सराव, जाणून घ्या पद्धत

Yoga Tips : दिवसभरातील थकवा अन् अशक्तपणा दूर करण्यासाठी योगा फायदेशीर आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga Tips : सध्याचे धकाधकीचे जीवन, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी अन् व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. यामध्ये शारिरीक अन् मानसिक समस्यांचा ही समावेश आढळून येतो. अनेकांना या स्थितीमध्ये थकवा आणि अशक्तपणा मोठ्या प्रमाणात जाणवतो. जर तुम्ही विश्रांती घेतली नाही तर हा थकवा आणि अशक्तपणा अधिक प्रमाणात जाणवतो.

हा थकवा अन् अशक्तपणा दूर करण्यासाठी तुम्ही योग्य आहार आणि शारिरीक हालचाल ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही योगाची मदत घेऊ शकता. योगामध्ये विविध प्रकारच्या आसनांचा समावेश असतो. या आसनांपैकी काही आसने तुम्ही नियमित केली, तर तुमचा थकवा आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत होईल. कोणती आहेत ही योगासने? चला तर मग जाणून घेऊयात.

ताडासन

ताडासन हे योगासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. सर्व वयोगटातील व्यक्ती या योगासनाचा नियमित सराव करू शकतात. हे योगासन करायला अतिशय सोपे आहे. या आसनामध्ये संपूर्ण शरीर ताणले जाते. हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर सरळ उभे राहा.

त्यानंतर, तुमच्या दोन्ही पायांमध्ये काही अंतर ठेवा. आता, दीर्घ श्वास घेऊन दोन्ही हात वर करा आणि तुमच्या पायांच्या टाचा उंचावून बोटांवर उभे राहा. या स्थितीमध्ये तुम्हाला संपूर्ण शरीरात ताण जाणवेल. आता काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर पुन्हा सामान्य स्थितीमध्ये परत या.

बालासन

दिवसभरातील थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी बालासन हे योगासन अतिशय फायदेशीर आहे. या आसनाचा नियमित सराव केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीराला भरपूर ऊर्जा मिळते अन् तणाव कमी होतो. बालासन हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर जमिनीवर गुडघे टेकवून बसा.

आता दोन्ही हातांचे पंजे सरळ ठेवून तुमचे डोके खाली जमिनीवर टेकवा. या स्थितीमध्ये तुमचे नितंब दोन्ही पायांच्या टाचांना स्पर्श करेल, या स्थितीमध्ये असायला हवेत. आता दीर्घ श्वास घ्या, तुम्हाला संपूर्ण शरीरात ताण जाणवेल. काही काळ या स्थितीमध्ये राहिल्यानंतर श्वास सोडा आणि पुन्हा सामान्य स्थितीमध्ये परत या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi UAE Visit: तेल, LNG-LPG आणि ५ अब्ज डॉलर गुंतवणूक अन्... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळालं?

Monsoon : मॉन्सून २६ मे पर्यंत केरळात दाखल होण्याचे संकेत

ITI Admission : ‘आयटीआय’च्या प्रवेशासाठी २१ मे पासून अर्ज प्रक्रिया होणार सुरू; राज्यात दीड लाखांहून अधिक जागा

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

Who is Akash Maharaj Singh? ऋतुराज संजू, उर्विल यांना बाद करून खिशातून काढला कागद... काय लिहिलंय माहित्येय? Video Viral

SCROLL FOR NEXT