Zika Virus: Sakal
आरोग्य

Zika Virus: पुण्यात आढळले झिकाचे ३ रूग्ण, जाणून घ्या हा व्हायरस आला तरी कुठून?

Zika Virus: पण हा झिका व्हायरल आला कुठून आणि याची लक्षण कोणती आहेत हे सोप्या भाष्यात समजून घेऊया.

Puja Bonkile

Zika Virus: पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजारांचा प्रादुर्भाव वाढतो . पण अशातच एका नव्या व्हायरसने देखील सर्वांना चिंतेत टाकले आहे. या व्हायरसचे नाव 'झिका' आहे. पुण्यात या व्हायरचे तीन रूग्ण आढळले आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. पण हा झिका व्हायरल आला कुठून आणि याची लक्षण कोणती आहेत हे सोप्या भाष्यात समजून घेऊया.

झिका आला कुठून

पुण्यातील ४६ वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या १५ वर्षीय मुलीला झिका व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. झिका हा आफ्रिका, आग्नेय आशिया अमेरिका या ठिकाणी आढळतो. पण या लोकांनी प्रवास केला नसून त्यांना या व्हायरसची लागण कशी झाली हा प्रश्न निर्माण होतो.

झिका व्हायरस एडिस इजिप्ती डासांपासून होतो. रूग्णांच्या लैंगिक संबंधातूनही या व्हायरसची लागण होते. यापुर्वी पुण्यात जेव्हा कोणत्याही व्हायरलचे रूग्ण आढळले तेव्हा त्यांनी कोठे ना कोठे प्रवास केला होता किंवा संपर्कात आले होते. या व्हायरसचे मुळ सापडले नाही तर हा इतरांनाही होऊ शकतो आणि त्याचे रूग्ण वाढू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे.

लक्षणे कोणती आहेत?

झिकाचे व्हायरसचे लक्षणे डेंग्यूसारखी आहेत. यामध्ये ताप, अंगावर पुरळ येणे,सांधे किंवा डोकेदुखी, थकवा जाणवणे यासारखी लक्षणे दिसतात.

झिका नेमकं काय आहे?

झिका हा फ्लॅविव्हायरस वंशातील विषाणू आहे. युगांडामधील झिका जंगलातून हा विषाणू सर्वात पहिले १९४७ मध्ये वेगळा करण्यात आला होता. त्यावरून त्याला 'झिका' हे नाव पडले आहे.

१९५० च्या दशकापासून आफ्रेकेतून आशियापर्यंतच्या विषुववृतीय पट्ट्यात विषाणूनचा प्रभाव आढळून येतो. २००७ ते २००६ पर्यंत हा विषाणू पुर्वेकडे, प्रशांत महासागर ओलांडून अमेरिकेपर्यंत पसरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT