praniti shinde andolan 
history-of-union-budget

कॉंग्रेस कार्याध्यक्षांचा कार्यारंभ : प्रणिती शिंदे यांचे इंधनदरावाढी विरुध्द ठाण्यात आंदोलन 

अरविंद मोटे

सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या कार्यध्याक्षपदाची सूत्रे आमदार प्रणिती शिंदे यांनी 12 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे ऐतिहासिक आझाद मैदानावर घेतल्यानंतर आता कामाला सुरुवात केली असून त्या संपूर्ण महाराष्ट्रात महिला प्रदेश महिला कॉंग्रेसतर्फे इंधनदरावाढीप्रश्‍नी रान उठवत आहेत. इंधनविरुध्द ठाणे येथे सुरू असलेल्या आंदोलनापासून त्यांनी आपला कार्यारंभ केला आहे. 

महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या विरोधात वाढत्या महागाई विरोधात राज्यव्यापी पदयात्रांचे आयोजन केले असून त्याचाच एक भाग म्हणून 18 रोजी महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस व ठाणे जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, महिला प्रदेश अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर आणि वाढत्या महागाईच्या विरोधात ठाणे जिल्हा मध्यवर्ती कॉंग्रेस कार्यालय येथून हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. 

यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून महागाई प्रचंड वाढत असून पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या दर सतत वाढवत असून यामुळे महिलांना कसरत करावी लागत आहे. सततचे दरवाढ पाहून असेच म्हणावे लागेल की "पेट्रोल डिझेल, आगे बढो एलपीजी आपके साथ है'.महिलांवर अत्याचार वाढले, घरगुती हिंसाचार वाढले असून, महिलांवर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध करत "मोदी सरकार चले जाव' असेही त्या म्हणाल्या. 

यावेळी ठाणे कॉंग्रेस महिला अध्यक्षा शिल्पा सोनवणे, ठाणे शहर अध्यक्ष विक्रम चव्हाण, ठाणे शहर जिल्हा महिला कॉंग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या हल्लाबोल मोर्चामध्ये सहभागी झाले होते. 

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

Trump-Putin alaska meeting: ट्रम्प-पुतिन भेट अमेरिका सोडून अलास्कामध्येच का? गुप्त भेटीच्या केंद्रस्थानी भारत

Nicholas Saldanha Died: महाराष्ट्राचे दिग्गज क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड, पुण्यात घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT