Horoscope and Astrology Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 19 नोव्हेंबर 2021

पंचांग - शुक्रवार : कार्तिक शुद्ध १५, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय सायं. ५.५९, चंद्रास्त स. ७.१९, सूर्योदय ६.४४, सूर्यास्त ५.५५, कार्तिकस्वामी दर्शन दुपारी २.२८ प., पौर्णिमा समाप्ती दुपारी २.२८, गुरुनानक जयंती, भारतीय सौर कार्तिक २८ शके १९४३.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शुक्रवार : कार्तिक शुद्ध १५, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय सायं. ५.५९, चंद्रास्त स. ७.१९, सूर्योदय ६.४४, सूर्यास्त ५.५५, कार्तिकस्वामी दर्शन दुपारी २.२८ प., पौर्णिमा समाप्ती दुपारी २.२८, गुरुनानक जयंती, भारतीय सौर कार्तिक २८ शके १९४३.

दिनविशेष -

२००३ - पुण्यातील आंतरविद्यापीठ खगोलविज्ञान आणि खगोल भौतिकी केंद्राच्या (आयुका) शैक्षणिक विभागाचे अधिष्ठाता डॉ. टी. पद्मनाभन यांना वैज्ञानिक संशोधनासाठी जी. डी. बिर्ला पुरस्कार जाहीर. डॉ. पद्मनाभन यांनी सैद्धांतिक भौतिकी आणि विश्‍वरचनाशास्त्राच्या विविध क्षेत्रांमध्ये व्यापक काम केले आहे. विश्‍वात आकाशगंगांसारख्या घटकांची निर्मिती समजून घेण्यातही त्यांचे काम मोठे आहे.

२०१५ - अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतीय वंशाच्या अमेरिकी राजकीय नेत्या स्वाती दांडेकर यांची आशियाई विकास बॅंकेच्या (एडीबी) कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली.

दिनमान -

मेष : काहींना दुपारनंतर अचानक धनलाभ संभवतो. कामाचा ताण व दगदग वाढेल.

वृषभ : वरिष्ठांबरोबर मतभेद संभवतात. थोरामोठ्यांकडून अपेक्षा नको.

मिथुन : अपेक्षित पत्रव्यवहार होतील. अनेकांशी सुसंवाद साधाल.

कर्क : सार्वजनिक क्षेत्रामध्ये प्रतिष्ठा लाभेल. व्यवसाय वाढणार आहे.

सिंह : व्यवसायात नवे हितसंबंध निर्माण करू शकाल. कामे दुपारनंतर करावीत.

कन्या : भागीदारी व्यवसायात अडचणी जाणवतील. महत्त्वाची कामे दुपारनंतर करावीत.

तूळ : वैवाहिक जीवनात मतभेद जाणवतील. खर्च वाढणार आहेत.

वृश्‍चिक : खर्च कमी होतील. वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात.

धनू : बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना सुयश लाभेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

मकर : गुंतवणुकीची व प्रॉपर्टीची कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत.

कुंभ : नोकरीत उत्तम स्थिती राहील. विरोधकांवर मात कराल.

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात उत्तम सुयश लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एकला चलो रे! काँग्रेसची बंगालमध्ये २९४ पैकी २८४ जागांवर उमेदवारांची घोषणा, यादी आली समोर

इराणवर अण्वस्त्र हल्ला झाल्यास भारतावर परिणाम होईल का? कोणत्या देशांना सर्वाधिक धोका?

Baramati SDM Transfer: बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची बदली; मिरजचे उत्तम दिघे तात्काळ कार्यभार स्वीकारणार

Raigad Pali Road Hazard: पालीतील हटाळेश्वर चौकात प्रचंड खड्डा; भाविक-स्थानिकांचा नगरपंचायतीवर संताप, अपघातांचा धोका वाढला

Gautala Ghat accident news: गौताळा घाटात ऊसतोड मजुरांचा टेम्पो दरीत कोसळला; १३ जखमी, ७ जणांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT