Horoscope and Astrology Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 20 नोव्हेंबर 2021

पंचांग - शनिवार : कार्तिक कृष्ण १, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय सायंकाळी ६.४०, चंद्रास्त सकाळी ७.१९, सूर्योदय ६.४५, सूर्यास्त ५.५५, अमृत अहोरात्र, भारतीय सौर कार्तिक २९ शके १९४३.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शनिवार : कार्तिक कृष्ण १, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय सायंकाळी ६.४०, चंद्रास्त सकाळी ७.१९, सूर्योदय ६.४५, सूर्यास्त ५.५५, अमृत अहोरात्र, भारतीय सौर कार्तिक २९ शके १९४३.

दिनविशेष -

१९९७ - अमेरिकेच्या कोलंबिया अवकाशयानातून भारतीय अंतराळवीर कल्पना चावला मोहिमेवर रवाना झाली. पहिली भारतीय महिला अंतराळवीर बनण्याचा मान त्यांनी पटकाविला.

२००९ - ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ४३ वे शतक झळकावून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तीस हजार धावांचा टप्पा पार केला.

२०१४ - ४५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेते रजनीकांत यांचा शताब्दी पुरस्काराने गौरव करण्यात आला.

२०१५ - अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतीय वंशाच्या अमेरिकी राजकीय नेत्या स्वाती दांडेकर यांची आशियाई विकास बॅंकेच्या (एडीबी) कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली.

२०१६ - भारताच्या पी. व्ही. सिंधूने चायना सुपर सीरिज स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. तिचे हे पहिलेच सुपर सीरिज मालिकेतील विजेतेपद आहे. तिने निर्णायक लढतीत चीनच्या सुन यी हिचा २१-११, १७-२१, २१-११ असा पराभव केला.

दिनमान -

मेष : नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. व्यवसायात नवीन प्रयोग करू शकाल.

वृषभ : थोरामोठ्यांच्या सहकार्याची फार अपेक्षा करू नका. उत्साह, उमेद वाढेल.

मिथुन : कौटुंबिक जीवनात, नोकरी, व्यवसायात जबाबदारी वाढणार आहे.

कर्क : आर्थिक लाभ होतील. तुमचे निर्णय, अंदाज अचूक ठरणार आहेत.

सिंह : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. व्यवसायात वाढ होवू शकेल.

कन्या : नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता.

तूळ : कलेच्या क्षेत्रातील व्यक्तींना चांगली संधी. विरोधकावर मात कराल.

वृश्‍चिक : प्रवासाचे योग येतील. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभणार आहे.

धनु : तुमचा स्वभाव आक्रमक बनणार आहे. बोलण्यामध्ये कटूता टाळावी.

मकर : अंदाज अचूक येतील. आगामी नियोजनास दिवस चांगला आहे.

कुंभ : कामात यश लाभणार आहे. सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल.

मीन : तुमचा दबदबा वाढेल. तुमच्या कर्तृत्वाला संधी मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT