पंचांग -
मंगळवार : कार्तिक कृष्ण ४, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय रात्री ९.०५, चंद्रास्त सकाळी ९.५८, अंगारक चतुर्थी, भारतीय सौर मार्गशीर्ष ३ शके १९४३.
दिनविशेष -
१९९९ : नागपूरचे प्रसिद्ध संस्कृत महाकवी, ज्येष्ठ संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कार्याबद्दल ‘अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार’ प्रदान.
२००४ : उद्योगमहर्षी शेठ वालचंद हिराचंद दोशी यांच्यावरील टपाल तिकिटाचे नवी दिल्ली येथे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते प्रकाशन.
२०१४ : नॉर्वेच्या युवा मॅग्नस कार्लसनने सलग दुसऱ्या वर्षी बुद्धिबळ जगज्जेतेपद पटकावले. त्याने भारताचा आव्हानवीर विश्वनाथन आनंद याचा ६.५-४.५ अशा दोन गुणांच्या फरकाने पराभव केला.
२०१५ : द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने भारत आणि मलेशिया या देशांनी सायबर सुरक्षा, सांस्कृतिक देवाण-घेवाणीसह योजना आणि अंमलबजावणी अशा तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली.
दिनमान -
मेष : अनेकांशी सुसंवाद साधाल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : नोकर, कर्मचारी यांचे सहकार्य लाभणार आहे. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.
मिथुन : आरोग्य चांगले राहणार आहे. व्यवसायात, नोकरीत, अडचणी जाणवतील.
कर्क : पूजा, देवधर्म याकडे अधिक लक्ष लागेल. वाहने चालवताना खबरदारी घ्यावी.
सिंह : अकारण खर्च कमी होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
कन्या : व्यवसायात थोड्या फार अडचणी जाणवतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
तूळ : व्यवसायामध्ये प्रगती होईल. कामाला थोडा विलंब लागणार आहे.
वृश्चिक : प्रवासात दक्षता घ्या. वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे.
धनू : वरिष्ठांशी मतभेदाची शक्यता आहे. वाहने चालवताना काळजी घ्या.
मकर : खर्च वाढणार आहेत. विवाहेच्छूंचे विवाह जमण्याची शक्यता आहे.
कुंभ : व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
मीन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.