दुखापतींपासून काळजी घ्या
मेष : सप्ताहात अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात दुखापतींचा काळ ठरू शकतो. गर्दीच्या ठिकाणी वाहने सांभाळा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी विशेष दखल घ्यावी. बाकी सप्ताहाचा शेवट अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी, शिक्षण किंवा विवाह या त्रिघटकांतून उत्तम घडामोडी ठरणारा ठरेल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार वैयक्तिक सुवार्तांचा.
वाहतुकीत सांभाळा, वाद नकोत
वृषभ : ता. १२ व १३ डिसेंबर हे अमावस्येचे प्रभावक्षेत्र मृग नक्षत्राच्या व्यक्तींना अपवादात्मक स्वरूपाची फळे देऊ शकते. श्वानदंशापासून सावध. वाहतुकीत सांभाळा. पोलिसांशी हुज्जती नको. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १५ व १६ हे दिवस वादग्रस्त प्रकरणांतून मार्ग काढतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह मातृ-पितृ चिंतेचा.
प्रसन्न वातावरणाचा कालखंड
मिथुन : ता. १२ व १३ हे अमावस्येचे प्रभावक्षेत्र पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सार्वजनिक जीवनातून कटकटीचे. बाकी आजचा रविवार वैयक्तिक छंद वा उपक्रमांतून उत्तमच. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील भाग्यसूचक घटनांतून प्रसन्न ठेवणारा सप्ताह. ता. १४ व १५ हे दिवस एकूणच आपल्या राशीस ‘गीत गाता चल’ अशा वातावरणात ठेवतील.
सरकारी कामामध्ये यश
कर्क : अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात प्रिय व्यक्तींचे रुसवे-फुगवे जपाच. नवपरिणितांनी सांभाळावे. बाकी सप्ताहातील गुरु-शुक्राची प्रतियुती स्वतंत्र व्यावसायिकांना सप्ताहारंभी छान प्रतिसाद देईल. पुनर्वसु आणि पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट सरकारी कामांतून यश देणारा. थोरामोठ्यांकडून लाभ. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्या अन्नपाण्यातील संसर्गाची.
परदेशगमनातले अडथळे दूर होतील
सिंह : गुरु-शुक्र प्रतियुती तरुणांना उत्तम नोकरीच्या संधी देईल. ता. १४ व १५ हे दिवस मोठी भाग्यबीजे पेरतील. काहींचे परदेशगमनातील अडथळे दूर होतील. मघा नक्षत्राची व्यक्ती सुवार्तांतून सतत फ्लॅशन्यूजमध्ये राहील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात राग आवरावा किंवा क्रिया-प्रतिक्रियांतून दक्षता बाळगावी. बाकी नोकरीत छानच वातावरण राहील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना पित्तप्रकोपातून त्रास.
वेदनायुक्त व्याधींचा त्रास
कन्या : सप्ताहात सार्वजनिक जीवनातून गैरसमज टाळावेत. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी भावंडांशी जपून वागावे. बाकी उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार शारीरिक वेदनायुक्त व्याधींचा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ ते १६ हे दिवस घरात मोठे प्रसन्न राहतील. पती वा पत्नीचा भाग्योदय. नोकरीत प्रशंसा होईल. ओळखीतून विवाहप्रस्ताव.
चोरी-नुकसानीपासून सावध राहा
तूळ : आजचा रविवार सप्ताहाचे बजेटच घोषित करेल. गुरु-शुक्र प्रतियुतीचे फिल्ड कला, छंद व इतर बौद्धिक उपक्रम यशस्वी करेल. मात्र ता. १२ व १३ या अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी चोरी, नुकसानीपासून सावध राहावे. वैवाहिक जीवनातील रुसवे-फुगवे सांभाळा. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ व १५ हे दिवस ‘गीत गाता चल’ या स्वरूपाचे. प्रसन्न गाठीभेटी.
आर्थिक कोंडी दूर होईल
वृश्चिक : कोणताही आग्रह किंवा अट्टहास टाळा. अमावस्येचे प्रभावक्षेत्र ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी दखल घेण्यासारखेच आहे. बाकी ता. १४ ते १५ हे दिवस एकूणच छान. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक आर्थिक कोंडी जाईल. एखादी ग्रासलेली गुप्तचिंता जाईल. तरुणांना कॅम्पसमधून नोकरी. परदेशी शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल.
प्रगतीचा मार्ग गवसेल
धनु : सप्ताह गुरु-शुक्र प्रतियुतीच्या पार्श्वभूमीवर तरुणांच्या बाबतीत एक प्रगतीचा फास्ट ट्रॅक ठेवेल. आजचा रविवार याचीच प्रचिती देईल. राशीचा बुध अमावस्येनंतर उत्तमच प्रभाव टाकेल. बुद्धिचातुर्यातून मोठे लाभ होतील. मूळ नक्षत्रास ता. १४ व १५ हे दिवस मुलाखतींतून साध्य करणारे. वैवाहिक जीवनातून सुवार्ता. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी संधी.
गाठीभेटी भाग्यबीजे पेरणाऱ्या
मकर : सप्ताहात ता. १२ डिसेंबरची मंगळवारची अमावस्या विशिष्ट शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर बोलू शकते. बाकी सप्ताहाचा शेवट शुभ ग्रहांच्या लॉबीतून बोलेल. सप्ताह श्रवण नक्षत्राच्या तरुणांना शैक्षणिक संधी देईल. आजचा रविवार गाठीभेटींतून भाग्यबीजे पेरणारा. ता. १४ चा गुरुवार विशिष्ट देवदर्शने करणारा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी प्रचितीचा अनुभव येईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार पुत्रोत्कर्षाचा.
कलाकारांचा भाग्योदय होईल
कुंभ : सप्ताहात गुरु-शुक्र प्रतियुतीचे फिल्ड उत्तम कार्य बजावेल. कलाकाराचे मोठे भाग्योदय. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्येचा मंगळवार नोकरीत क्रिया-प्रतिक्रियांतून जपण्याचा. बाकी शततारका नक्षत्राच्या व्यक्ती ता. १४ व १५ या दिवसांत मोठ्या सुवार्तांतून फ्लॅशन्यूजमध्ये राहतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्या विचित्र जागरणाची.
मनासारख्या घटना घडतील
मीन : रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्येचे प्रभावक्षेत्र विचित्र खर्चाचे. घरातील कामगारवर्गाशी वाद नकोत. बाकी सप्ताह गुरु-शुक्र प्रतियुतीच्या पार्श्वभूमीवर होतकरू तरुणांचे प्रश्न सोडवेल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींची गुप्तचिंता जाईल. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ व ता. १५ डिसेंबर हे दिवस मनासारख्या घटना घडवतील. विशिष्ट करारमदार होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.