weekly horoscope 10th March 2024 to 16th March 2024 Sakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य : (१० मार्च २०२४ ते १६ मार्च २०२४)

सध्या कलियुगातील माणूस खऱ्या वास्तवात न जगता कल्पनेच्या विश्वातच जगत असतो. काळ ही एक कल्पनाच आहे. त्यामुळंच हा काळ कल्पनेला जवळ करत किंवा कवटाळत युगानुयुगं वाटचाल करत असतो.

श्रीराम भट

थोरामोठ्यांच्या ओळखीचा लाभ

मेष : सप्ताहात गुरुभ्रमणाची उत्तम साथ राहील. तरुणांना ता. १३ ते १५ हे दिवस नोकरी, शिक्षण, विवाह या त्रिघटकांतून फलदायी होतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना थोरामोठ्यांच्या ओळखींतून लाभ. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना परिचयोत्तर विवाहाचे योग. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना रविवार संध्याकाळी कलहजन्य. गर्दीच्या ठिकाणी सांभाळा.

आई-वडिलांशी वाद नकोत

वृषभ : आजच्या अमावस्येचं प्रभावक्षेत्र मृग नक्षत्राच्या व्यक्तींना पथ्यं पाळायला लावणारं. आई-वडिलांशी वाद नकोत. बाकी रोहिणी नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात उत्सव-समारंभातून मिरवतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती पर्यटनस्थळी चैन, चंगळ आणि मौजमजा करेल. ता. १५ चा शुक्रवार तरुणांमधील प्रेमस्पंदनं जागवेल. शनिवार एकूणच आपल्या राशीस सूर्योदयी बेरंग करू शकतो. वाहनं सांभाळा.

व्याधींचा वेदनादायी त्रास

मिथुन : बुध आणि शुक्रांची भ्रमणं आणि साथीला गुरुभ्रमण सार्वजनिक जीवनातून उत्तम साथ देईल. ता. १२ ते १४ हे दिवस अतिशय महत्त्वाच्या गाठीभेटी घडवणारे. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींचे विशिष्ट मार्केटिंग यशस्वी होईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींच्या नोकरीच्या मुलाखती होतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना आजची अमावस्या शारीरिक वेदनायुक्त व्याधीची ठरू शकते.

नोकरीच्या मुलाखतींमध्ये यश

कर्क : आजचा अमावस्येच्या प्रभावात सुरू होणारा सप्ताह आजूबाजूचं मानसिक पर्यावरण बिघडवू शकतो. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी शांत राहावे. कामापुरतं बोलावं. बाकी सप्ताह नोकरीत विशिष्ट भाग्यसूचक घटना घडवेल. ता. १४ व १५ हे दिवस पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या मुलाखती यशस्वी करणारे. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार मोठ्या दैवी प्रचितीचा.

जुन्या गुंतवणुकीतून लाभ

सिंह : आजच्या अमावस्येचं एक पॅकेज राहील. स्त्री-वर्गाशी जपून. नवपरिणितांनी थट्टा-मस्करी टाळावी. ता. १३ ते १५ गुरुभ्रमणाच्या माध्यमातून प्रत्येक वन डे जिंकून देतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्ती भव्य यशातून फ्लॅश न्यूज देतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकींतून लाभ. ओळखी-मध्यस्थींतून नोकरी. शनिवारी सूर्योदयी कलह टाळा.

गुप्तचिंता दूर होईल

कन्या : आजची अमावस्या घरातील भावनिक पर्यावरण बिघडवू शकते. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी भान ठेवून वागावं. घरातील लहान मुलांची मानसिकता जपा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ चा गुरुवार विशिष्ट ग्रासलेली गुप्तचिंता घालवणारा. उत्तरा नक्षत्रास ता. १४ व १५ हे दिवस शुभ ग्रहांच्या उत्तम स्पंदनांचे. सज्जन माणसं भेटतील. नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील.

बदली योग्य ठिकाणी होईल

तूळ : आजची अमावस्या विशाखा नक्षत्राच्या वृद्धांनी जपण्याची. प्रिय व्यक्तींशी वाद नको. गर्भवतींनी पथ्यं पाळावीत. बाकी ता. १३ ते १५ हे दिवस छान प्रवाही राहतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट कला वा छंद माध्यमातून चांगलाच हुरूप येईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींची न्यायालयीन कामं होतील. नोकरीत योग्य ठिकाणी बदली. शनिवारी सूर्योदयी दुखापतींपासून जपा.

उपक्रमांमध्ये मोठं यश

वृश्चिक : आजच्या अमावस्येचं एक पॅकेज राहील. आजूबाजूचे मानसिक पर्यावरण सांभाळाच. बाकी उद्याचा सोमवार अनुराधा नक्षत्रास वैयक्तिक उपक्रमांतून मोठं यश देणारा. वास्तुविषयक खरेदीतील अडसर जातील. ता. १४ व १५ हे दिवस तरुणांना विवाहविषयक हालचालींचे. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार जल्लोषाचा. शनिवारी सूर्योदयी यंत्रं, वाहनं सांभाळा.

तरुणांना चांगला कालखंड

धनु : सप्ताह शुभ ग्रहांच्या साथसंगतीचाच. तरुणांच्या उपक्रमांना वाव देणारा. ता. १३ ते १५ हे दिवस शिक्षण, नोकरी आणि विवाह यांतून तरुणांना भाग्यसूचक. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींची नोकरीत उत्तम मार्गक्रमणा होईल. पूर्वाषाढा नक्षत्रास शुक्रवार घरगुती सुवार्तांचा. पती वा पत्नीचा भाग्योदय. अमावस्या उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना वेदनायुक्त.

भेटवस्तूंमधून सुखद धक्का

मकर : धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींवर आजच्या अमावस्येचा रोख राहू शकतो. दुखापतींपासून जपा. घरात वृद्धांची काळजी घ्या. बाकी सप्ताह श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींचा नोकरीतील ताण घालवणारा. ता. १४ चा गुरुवार सकाळपासून सुवार्तांची साखळी ठेवेल. उत्तराषाढा नक्षत्राचा शुक्रवार नोकरीच्या मुलाखती यशस्वी करेल. काहींना आदर-सत्कारांतून भेटवस्तूंचा सुखद धक्का.

प्रिय व्यक्ती भेटतील

कुंभ : आजचा रविवार अमावस्येच्या माध्यमातून प्रदूषणाचा. प्रवासात विचित्र माणसं भेटतील. बाकी सप्ताहातील शुक्रभ्रमणाच्या सुगंधित झुळका ता. १४ व १५ या दिवसांत प्रसन्न ठेवतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहविषयक गाठीभेटींतून सुगंधित होईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार आनंदाश्रूंनी भिजवणारा. प्रिय व्यक्ती भेटतील. मौल्यवान खरेदी. शनिवारी रस्त्यावर जपा.

सरकारी कामांमध्ये यश

मीन : आजचं अमावस्येचं प्रभावक्षेत्र पर्यटनस्थळी बेरंग करू शकतं. तरुणांनी सांभाळावं. बाकी सप्ताह व्यावसायिकांना उत्तम साथ देईल. ता. १३ ते १५ हे दिवस उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामांतून यश देणारे. ओळखी-मध्यस्थींतून लाभ होतील. शुक्रवार वास्तुविषयक व्यवहार होतील. बँकेचे गृहकर्ज मिळेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शनिवार विचित्र जागरण करवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT