weekly horoscope 12th february 2023 to 18th february 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य (१२ फेब्रुवारी २०२३ ते १८ फेब्रुवारी २०२३)

उदय आणि अस्त, अर्थातच दिवस आणि रात्र यांतून चालणारा हा विश्‍वप्रपंच मोठा अजब आहे! ब्रह्मा, विष्णू आणि महेश या विश्‍वधारणेतील एक प्रकारच्या अवस्थाच सांगितल्या आहेत.

श्रीराम भट saptrang@esakal.com

शत्रुपीडेचा कालखंड, कुसंगत टाळा

मेष : सप्ताहात तरुणांनी कुसंगत जपावी. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहाच्या शेवटी संमोहनं टाळावी. सरकारी नियम पाळावे. बाकी सप्ताह कलाकारांना उत्तमच. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट प्रसिद्धीयोगाचा. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह गुप्तशत्रुपीडा. आजचा रविवार घरात शांत राहण्याचा.

मित्रमंडळींकडून लाभ

वृषभ : कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना रवी-शनी युतीची पार्श्‍वभूमी विचित्र मानवी उपद्रवांची. घरात भाऊबंदकीतून त्रास. व्यवसायात कामगार पीडा. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात मित्रमंडळींकडून लाभ. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील विशिष्ट घडामोडी प्रसन्न ठेवतील. ता. १४ व १५ हे दिवस मोठे शुभसंबंधित.

आरोग्याच्या तक्रारींपासून जपा

मिथुन : पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह संमिश्र स्वरूपाचा. आरोग्यविषयक गुप्तचिंता भेडसावतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी आजचा रविवार अन्न-पाण्यातील संसर्गापासून जपावा. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १५ चा बुधवार विचित्र खर्चाचा. काहींना वाहनपीडा. प्रवास सांभाळा. शुक्रवार पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना वैयक्तिक सुवार्तांचा.

शैक्षणिक प्र सुटतील

कर्क : सप्ताह ग्रहयोगांतून ओढाताणीचा. विचित्र खर्चांची पार्श्‍वभूमी राहील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना एखादी स्त्रीचिंता लागून राहील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यातील ता. १४ व १५ हे दिवस शैक्षणिक प्रश्‍न सोडवतील, नोकरीच्या मुलाखती फलदायी होतील. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार बेरंगाचा. व्यावसायिक खरेदी-विक्रीत जपा, स्त्रीशी गैरसमज टाळा.

स्पर्धात्मक पातळीवर यश

सिंह : रवी-शनी युतियोगाच्या पार्श्‍वभूमीवर बेरंगाचे प्रसंग येतील. संशयास्पद आर्थिक व्यवहार छायाग्रस्त करतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना एखादी जुनाट व्याधी उद्‍भवू शकते, पथ्यं पाळा, प्रवासात जपा. पूर्वा नक्षत्रास ता. १४ व १५ हे दिवस सरकारी कामांचे. विशिष्ट वसुली. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश.

सरकारी नियमांचं भान राखा

कन्या : सप्ताहात कोणताही उतावीळपणा टाळा. सप्ताहात सरकारी नियमांचं भान ठेवा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी अन्न-पाण्यातील संसर्गापासून जपावं. बाकी ता. १४ व १५ हे दिवस शुभग्रहांच्या कनेक्‍टिव्हिटीचेच. पती वा पत्नीची चिंता जाईल. वास्तुविषयक व्यवहार. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना स्त्रीकडून लाभ. शनिवार सुवार्तांचाच.

बेभानपणाला आवर घाला

तूळ : एकूणच सप्ताह ग्रहयोगांतून उच्चदाबाचाच. तरुणांनी बेभानपणा टाळावा. आई-वडिलांची मनं जपा. बाकी विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमणातून उत्तम विवाह प्रस्ताव येईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील रवी-शनी युतियोगाची पार्श्‍वभूमी कुसंगतीतून दगाफटक्‍याची. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार विचित्र गुप्तचिंतेचा.

नोकरीत सन्मान होईल

वृश्‍चिक : सप्ताह रवी-शनी युतियोगाच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक जीवनातून प्रदूषणाचा, वागण्या-बोलण्यातून होणारे गैरसमज टाळा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना गावगुंडांकडून त्रास. सप्ताहात नवपरिणितांनी घरात सावधानता राखावी. बाकी सप्ताहात ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होईल. नोकरीत सन्मान होईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना तीर्थाटनाचा योग.

उधार-उसनवारी टाळा

धनू : सप्ताहात जुगारसदृश व्यवहार टाळावेत. सप्ताहात उधार-उसनवारीपासून जपा. आजचा रविवार भुरट्या चोरीपासून जपण्याचाच. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट उत्सव-समारंभातून बेरंगाचा. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ व १५ हे दिवस वैयक्तिक जल्लोषाचे. उत्तराषाढा व्यक्तींच्या आयुष्यात प्रसिद्धीयोग.

होतकरू तरुणांना लाभाचा कालखंड

मकर : सप्ताहातील ग्रहयोग आर्थिक व्यवहारांतून साशंकता निर्माण करणारे. काहींना कर्ज प्रकरणातून त्रास होऊ शकतो. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ व १५ हे दिवस शुभग्रहाच्या पाठबळाचे. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात आरोग्यविषयक पथ्यं पाळावीत. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचा सप्ताहात कला, छंद उपक्रमांतून मोठा भाग्योदय.

साडेसातीच्या झळा जाणवतील

कुंभ : सप्ताहातील ग्रहमान साडेसातीच्या सावल्या रुंदावणारं वाटतं; परंतु घाबरू नका. शुभग्रहांचा अंडरकरंट राहीलच. शततारका नक्षत्राच्या व्यक्ती विवेक आणि चातुर्याने लाभ उठवतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती शुक्रभ्रमणाचा पूर्ण लाभ उठवतील. ता. १४ व १५ हे दिवस मोठे अजब राहतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह वेदनायुक्त.

नोकरीतील सावट जाईल

मीन : सप्ताहात रवी-शनी युतियोगाचं एक फिल्ड राहील. सप्ताहात वादग्रस्त मुद्द्यांना हात घालू नका, सरकारी नियमांचं पालन करा. घरातील भावनिक प्रसंग जपून हाताळा. बाकी उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुभ्रमणाची कनेक्‍टिव्हिटी राहील. ता. १४ व १५ हे दिवस तरुणांना छानच, नोकरीतील एखादं सावट जाईल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना पर्यटनाचे योग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT