weekly horoscope 14th may 2023 to 20th may 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य : (१४ मे २०२३ ते २० मे २०२३)

पंचमहाभूतं आणि त्यांच्या देवता यांना भगवद्‌गीतेत देववृंद म्हटलं आहे आणि हा देववृंद आपला पंचतन्मात्रक (शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध) भावस्पर्श जपत या विश्‍वाचा रसपरिपोष करत असतो.

श्रीराम भट

वादविवाद टाळा, मौन योग्य

मेष : अमावास्येकडे झुकणारा सप्ताह वक्री बुधाच्या आणि राशीतील हर्षलच्या पार्श्वभूमीवर विचित्र शत्रुत्वाच्या झळा पोहोचवू शकतो. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावास्येचं प्रभावक्षेत्र जपावं. बाकी अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह अमावास्येच्या पार्श्वभूमीवरही गुरुकृपा करणारा. मात्र, शनिवारी वादविवाद टाळा, मौनात रहाणं योग्य.

यशाचा जल्लोष करता येईल

वृषभ : सप्ताहाचा आरंभ कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट यशातून जल्लोष करणारा, गुंतवणुकीतून लाभ. बाकी अमावास्येचं प्रभावक्षेत्र घरगुती मानसिक पर्यावरण बिघडवू शकतं. नवपरिणितांनी गैरसमज टाळावेत. घरातील द्वाड लहान मुलांना सांभाळा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी भाजणं, कापणं यापासून सांभाळावं. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींची बुधवारची संध्याकाळ देवदर्शनाची.

फसवणुकीपासून काळजी घ्या

मिथुन : राशीचं शुक्रभ्रमण आणि गुरुभ्रमणाची साथसंगत सप्ताहाचा आरंभ नोकरी-व्यावसायिक पार्श्‍वभूमीवरील घडामोडींतून प्रसन्न ठेवेल. आर्द्रा नक्षत्रास परिस्थितीचा लाभ होईल. तरुणांना विवाहयोग. ता. १६ ते १८ हे दिवस सर्व प्रकारांतून शुभसंबंधित राहतील. पुनर्वसू नक्षत्रास ओळखीच्या माध्यमातून मोठे लाभ. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या फसवणुकीची.

आजारांचा त्रास, अस्वस्थता वाटेल

कर्क : अमावास्येचा सप्ताह आजूबाजूचं मानसिक पर्यावरण बिघडवणाराच. काहींना हा सप्ताह नोकरीत ताणतणावांचा. ता. १९ व २० हे दिवस पुष्य नक्षत्रास गाठीभेटींतून अस्वस्थ ठेवतील. काहींना भातृचिंता शक्य. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येचं प्रभावक्षेत्र चिंताजनक. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना वेदनायुक्त व्याधीतून त्रास.

मुलाखतींमध्ये यश लाभेल

सिंह : सप्ताह शुभग्रहांच्या ताब्यातीलच राहील. ता. १७ व १८ हे दिवस भव्यदिव्य यश नोंदवतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा सूर गवसेल. नोकरीत वरिष्ठांचा अनुग्रह. व्यावसायिक पतप्रतिष्ठा लाभेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येचं प्रभावक्षेत्र संमिश्र राहील. वृद्धांनी प्रवासात जपावं. बाकी तरुणांना मुलाखतीतून यश.

तोल जाऊ देऊ नका

कन्या : अमावास्येकडे झुकणारा सप्ताह सांभाळण्याचाच. दुखापतीपासून जपा, तोल जाऊ देऊ नका. बाकी शुक्रभ्रमणाची स्पंदनं उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती खेचून घेतीलच. सप्ताहाची सुरुवात कलाकारांना उत्तेजन देणारी. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या खर्च, नुकसानीची. यंत्र, वाहन आणि उपकरणं बिघडतील.

वादग्रस्त येणं वसूल होईल

तूळ : शुभग्रहांची स्पंदनं खेचून घेणार आहात. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १७ व १८ हे दिवस मोठी भाग्यबीजं पेरतील. तरुणांना विवाहयोग. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना नव्या व्यावसायिक पर्यायांतून मोठे लाभ, वादग्रस्त येणं येईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या बेरंगाची, शनिवार नुकसानीचा.

खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील

वृश्‍चिक : अमावास्येचं प्रभावक्षेत्र वैचारिक गोंधळातून सतावणारं. ज्येष्ठा नक्षत्रास नोकरीतील विशिष्ट घडामोडींतून अस्वस्थ करणारं ग्रहमान. क्रिया-प्रतिक्रिया सांभाळाच. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती ता. १५ ते १७ हे दिवस मोठे खरेदी-विक्रीचे व्यवहार करतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार गाठीभेटींतून वादविवादाचा.

नोकरीत वरिष्ठाचं सहकार्य

धनू : सप्ताहाचा आरंभ मोठ्या जलोषाचा राहील. तरुणांना मोठं प्रेरकच ग्रहमान राहील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १५ ते १७ हे दिवस चढत्या क्रमाने शुभसंबंधित, नोकरीत वरिष्ठांकडून उत्तम प्रतिसाद राहील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम प्रतिसाद राहील, उत्तम नोकरीचा लाभ. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार पोटदुखीचा.

शैक्षणिक चिंता संपतील

मकर : अमावास्येकडे झुकणारा सप्ताह आजूबाजूचं वातावरण बिघडवत नेऊ शकतो. घरातील यंत्रं, उपकरणं जपून हाताळा. खरेदी-विक्रीत जपा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १६ ते १८ हे दिवस शैक्षणिक चिंता घालवणारे. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींची वास्तुचिंता जाईल. धनिष्ठा नक्षत्रास अमावस्या स्त्री कडून विरोधाची शक्यता

प्रवासात सांभाळा

कुंभ : शुक्रभ्रमणाच्या कला अमावास्येच्या प्रभावक्षेत्रातही फुलतील. ता. १७ चा चंद्र-गुरूचा पिधानयोग शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमणाच्या पार्श्वभूमीवर जीवन ध्येयपथावर मार्गस्थ करेल. अर्थातच साडेसातीतही पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात प्रवासात किंवा अपरिचित व्यक्तींशी सांभाळून राहावं.

अधिक बोलणं नको

मीन : सप्ताहातील शुभग्रहांची कनेक्टिव्हिटी शांतपणे खेचून घ्या. अर्थातच, सीर्फ आम खाओ. घरी वा दारी फक्त हसत रहा. जास्त बोलणं उचित नाही. ता. १५ ते १७ हे दिवस सुसंगत राहतील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी घाईगर्दीचा प्रवास टाळावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवणार, उमेदवारही केला जाहीर; उद्या अर्ज भरणार

Mumbai News: ११३ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा! पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन दुवा लवकरच आकारास येणार

आखाती युद्धाचा कांद्याला मोठा फटका; निर्यात ४५ टक्के घसरली, दर कोसळल्याने शेतकरी संकटात

Mumbai Weather Update : मुंबईसाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे, कसं असेल तापमान? हवामान विभागाने दिली माहिती

म्हाडा ३० हजार घरे उभारणार, राज्य सरकारकडे १०० एकर जागेसाठी पाठपुरावा सुरू

SCROLL FOR NEXT