weekly horoscope 15th january 2023 to 21st january 2023
weekly horoscope 15th january 2023 to 21st january 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य (१५ जानेवारी २०२३ ते २१ जानेवारी २०२३)

श्रीराम भट saptrang@esakal.com

नोकरीत बढती व उत्तम वातावरण

मेष : सप्ताहारंभ शुभ ग्रहांच्या साथसंगतीचाच. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी, व्यावसायिक उत्तम बदल जाणवतील. ता. १९ व २० हे दिवस अतिशय गतिमान राहतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २० चा शुक्रवार नोकरीत बढती देईल. न्यायालयीन प्रकरणातून मुक्त व्हाल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी लाभ.

आरोग्यविषयक चिंता दूर होतील

वृषभ : मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताह मोठा आश्‍वासक राहील. ता. १९ चा गुरुवार भाग्य घेऊन येणारा. रोहिणी नक्षत्रास ता. १८ चा बुधवार प्रवासात जपण्याचा. बाकी सप्ताहात पुत्रचिंता जाईल, आरोग्यचिंता जाईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात कायदेशीर बाबी जपाव्यात.

विवाहयोगाचा कालखंड

मिथुन : सप्ताहात बुध मार्गी होत आहे, शनीचं राश्‍यांतर होत आहे. बुद्धिजीवी मंडळींचं एक नवीन पर्व सुरू होईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १९ व २० हे दिवस शुभ घटनांतून फ्लॅशन्यूजमध्ये ठेवतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ चा बुधवार संमिश्र स्वरूपाचा. सामाजिक जीवन सांभाळा. तरुणांना नोकरीत लाभ. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग.

स्पर्धांमध्ये तरुणांना यश

कर्क : सप्ताहात आश्‍लेषा व्यक्ती मोठ्या ताकदवान होतील. गृहस्वास्थ्याचं एक पर्व सुरू होईल. ता. १८ ते २० हे दिवस चढत्या क्रमाने शुभ. तरुणांना स्पर्धात्मक यश. ता. १९ चा गुरुवार गुरुकृपेचा. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट गुंतवणुकीतून लॉटरी. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती नवस फेडतील.

अट्टहास व भावनांचा उद्रेक टाळा

सिंह : सप्ताहात शनीच्या राश्‍यांतरातून ग्रहांची व्यूहरचना बदलेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी कोणताही अट्टहास टाळावा. सप्ताहाच्या शेवटी भावनोद्रेक टाळावेत. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी आजची मकर संक्रांत मौजमजेचीच. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुभ ग्रहांची पार्श्‍वभूमी राहील. पती-पत्नीची चिंता जाईल.

वास्तुविषयक व्यवहार होतील

कन्या : सप्ताहाची सुरुवात धनलाभाचीच. विशिष्ट व्यावसायिक करार-मदार भविष्याची निश्‍चिंती करतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमणाचं पर्व राहीलच. ता. १९ व २० हे दिवस घरगुती उत्सव-समारंभाचे. घरात कार्यं ठरतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात वैवाहिक जीवनातील सुवार्ता धन्य करतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात गुरुवार महत्त्वाच्या गाठीभेटींचा. वास्तुविषयक व्यवहार होतील.

व्यावसायिक क्षेत्रात लाभ

तूळ : सप्ताहात शनीच्या राश्‍यांतराच्या पार्श्‍वभूमीवर अतिशय सुंदर ग्रहमान राहील. सप्ताहात ता. १८ ते २० हे दिवस विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक उठाठेवींतून लाभ देतील. वैवाहिक जीवनात आनंद साजरा कराल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट कला व छंद माध्यमातून मोठ्या प्रकाशात आणणारा.

रेंगाळलेली येणी वसूल होतील

वृश्‍चिक : सप्ताहातील शुक्र-शनी यांचा सहयोग मोठी अद्वितीय फळं देईल. सप्ताहात रेंगाळलेली येणी येतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना एखादा सरकारी गॉडफादर भेटेल. अनुराधा नक्षत्रास ता. १८ ते २० हे दिवस आर्थिक व्यवहारातून अतिशय सुसंगत. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट विशिष्ट महत्त्वाकांक्षा पूर्ण करेल.

झेप घेण्यासाठी ऊर्जा मिळेल

धनू : सप्ताहात शनीच्या राश्‍यांतरातून जीवनातील एक उत्तम टप्पा सुरू होत आहे. किंबहुना, वर्षाचं एक सुंदर बजेटच घोषित होईल. तरुणांनो आळस झटका, मार्गस्थ व्हा. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना झेप घेण्यासाठी व्हिसा मिळेल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना जीवनाचं तत्त्व कळेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्ती वैभवसंपन्न होतील.

अनुकूल परिस्थिती राहील

मकर : आपल्या राशीतील शनीचं वास्तव्य सप्ताहात बदलेल, साडेसातीची पाच वर्षं पूर्ण होतील. अनुभवसंपन्न झाला आहात, आता झेप घ्या. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना जीवनाची नवीन चव गवसेल. सप्ताहात मानसिक, शारीरिक आणि आर्थिक या त्रिस्तरांवर अनुकूल परिस्थिती राहील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात अतिशय शैलीदार फलंदाजी करतील.

व्यावसायिकांचं बस्तान बसेल

कुंभ : सप्ताहात आपल्या राशीत शनीचं आगमन होत आहे. घाबरू नका, हा शनी आपणास चातुर्य देणार आहे. सतत अवधान ठेवा आणि सत्संगात रहा. सप्ताहात शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ ते २० हे दिवस शनीच्या पक्षातील ग्रहांकडून साथच देतील. जनसंपर्कातून लाभ. स्वतंत्र व्यावसायिकांचं बस्तान बसेल. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान.

शनीचं राश्‍यांतर अनुकूल

मीन : मकर संक्रांतीचा सप्ताहारंभ अतिशय गोडच राहील. शुभ ग्रहांची पलटण दिमतीला राहीलच. राशीत गुरू असताना शनीचं राश्‍यांतर शुभसूचकच राहील. आगामी काळात आपली अतिशय संयमी वाटचाल होणार आहे. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी- व्यावसायिक पार्श्‍वभूमीवर लाभ देणाराच सप्ताह आहे. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींचे वास्तुविषयक व्यवहार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT