कलागुणांना प्रसिद्धी मिळेल
मेष : आजचा रविवार अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींच्या वैयक्तिक कलागुणांना प्रसिद्धी देणारा, मित्रमंडळींकडून लाभ देणारा, तरुणांना विवाहविषयक गाठीभेटींतून यश! ता. १७ व १८ हे पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र बुद्धिजीवींना छानच. ता. २१ची संकष्टी आपल्या राशीस व्यावसायिक वसुलीची. भावा-बहिणीचे प्रश्न सुटतील.
ओळखी, मध्यस्थीतून लाभ
वृषभ : कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १६ ते १८ हे दिवस नोकरी-व्यावसायिक वेगवान शुभ घडामोडींचे. ओळखी-मध्यस्थीतून लाभ. ता. २१ची संकष्टी रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे धनलाभ देईल. मात्र, ता. १९चा बुधवार सूर्योदयी कलहाचा. प्रवासात जपा. रविवारी मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी स्त्रीहट्ट सांभाळा.
नोकरीत प्रशंसा व सुवार्ता मिळतील
मिथुन : पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र अतिशय पोषक राहील. महत्त्वाची कामं उरका. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह मुलाखतींतून यश देणारा. काहींची नोकरीत मोठी प्रशंसा. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८चा मंगळवार विचित्र गाठीभेटींचा. भावाबहिणींशी वाद नको. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना संकष्टीचा शुक्रवार मोठ्या सुवार्तांचा. जल्लोष!
प्रकृतीची काळजी घ्या
कर्क : राशीतील पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र संमिश्र स्वरूपाचंच. कायदेशीर प्रश्न जपून हाताळा. पौर्णिमेजवळचं मंगळाचं राश्यांतर प्रकृती सांभाळण्याचं. ता. १९ चा बुधवार आश्लेषा नक्षत्रास घरात स्त्रीशी वादाचा. नवपरिणितांनी सासू सांभाळावी! बाकी आजचा रविवार पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना शुभलक्षणीच. शुक्रवार धनलाभाचा.
आर्थिक कोंडी फुटेल
सिंह : सप्ताहातील पौर्णिमा शुभ ग्रहांची ताकद वाढवेलच. व्यावसायिक आर्थिक कोंडी फुटेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींचा शेअर चांगलाच वधारेल. कलाकारांचं एक अधिराज्य सुरू होईल. ता. २० व ता. २१ हे दिवस तरुणांच्या उमलण्याचे. मुलाखती द्याच. सप्ताहात मघा नक्षत्राच्या व्यक्ती आपलं चांगलंच कौतुक करून घेतील.
व्यावसायिक आडाखे यशस्वी होतील
कन्या : आजचा रविवार शुभ ग्रहांच्या भन्नाट कनेक्टिव्हिटीचा. व्यावसायिक आडाखे यशस्वी होतील. उत्तम वसुली कराल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींची पुत्रचिंता जाईल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १९चा बुधवार सूर्योदयी बेरंगाचा. बाकी ता. २१चा शुक्रवार तरुणांना नोकरी देणारा. पती वा पत्नीची चिंता जाईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना गॉडफादर लाभेल. दैवी चमत्कार घडेल.
गाठीभेटी यशस्वी होतील
तूळ : आजचा रविवार मोठा शुभलक्षणी. नियोजित गाठीभेटी यशस्वी होतील. विशिष्ट व्यावसायिक शुभारंभ होईल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ऑनलाइन क्लिक होणाराच सप्ताह. नोकरीचं आश्वासन मिळेल. ता. २० व २१ हे दिवस बॅटिंग फिल्डचे. बाकी बुधवारी सूर्योदयी वाद नकोत. स्त्रीशी मौन पाळा.
व्यावसायिक छान उलाढालींचा काळ
वृश्चिक : सप्ताहातील पौर्णिमेचं फिल्ड संमिश्र स्वरूपाचं, आई-वडिलांची काळजी घ्या. बाकी आजचा रविवार व्यावसायिक छान उलाढालींचा. मोठी वसुली. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात घरातील तरुणांच्या उत्कर्षातून मोठी धन्यता. नवपरिणितांचे भाग्योदय होतील. ता. २० व २१ हे दिवस आपल्या राशीस मोठी भाग्यलक्षणं दाखवतील.
तरुणांना उत्तम कालखंड
धनू : पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात अर्थातच चंद्रबळाचा शुभग्रह लाभ करून देतील. ता. १६ ते १८ हे दिवस तरुणांना छानच. आज राशीत पदार्पण करणारा मंगळ एक छान पर्व सुरू करेल. ध्येयावरच लक्ष केंद्रित करा. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठा झगमगाटी राहील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारची संकष्टी पूर्वसुकृत फळास आणणारी.
व्यावसायिकांना उत्तम पर्याय मिळतील
मकर : पौर्णिमेचं फिल्ड घेऊन अवतरणारा सप्ताह शुभग्रहांना वाव देईलच! मात्र श्रद्धावंतांना आणि सज्जनांनाच! सप्ताह तरुणांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश देणारा. स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे उत्तम पर्याय उपलब्ध होतील. सप्ताहाचा शेवट उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकींतून लाभाचा. श्रवण नक्षत्रास ता. १९चा बुधवार कलहाचा. मात्र शुक्रवार मोठ्या दैवी चमत्काराचा.
दैवी प्रचितीचा अनुभव येईल
कुंभ : राशीतील गुरूचं अधिपत्य असताना पौर्णिमेचं फिल्ड सकारात्मकच राहील, त्यातून वक्री शुक्रभ्रमण तरुणांना चांगलीच इम्युनिटी देईल. आजचा रविवार अशीच भाग्यलक्षणं दाखवणारा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती मॅन ऑफ दि मॅच होतील. शुक्रवारची संकष्टी शततारका व्यक्तींना मोठ्या सुवार्तांतून धन्य करणारी. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी प्रचिती येईल.
तरुणांच्या उपक्रमांना यश
मीन : पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र उत्तमच राहील. तरुणांचे उपक्रम यशस्वी होतील. मात्र, व्यावसायिकांनी संशयास्पद व्यवहार टाळावेत. जुगार टाळा. बाकी नोकरदारांना सप्ताहात अतिशय अनुकूल वातावरण राहील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती कौतुक करून घेतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २१ची संकष्टी संकट दूर करणारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.