Weekly Horoscope
Weekly Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य (१७ एप्रिल २०२२ ते २३ एप्रिल २०२२)

श्रीराम भट saptrang@esakal.com

प्रसिद्धी मिळेल, नोकरीही शक्य

मेष : सप्ताहातील राशीतील बुध-हर्षल सहयोग तरुणांच्या संदर्भातून संमिश्र स्वरूपाची फळं देईल. शारीरिक मस्ती नको. वाहनं सांभाळा. बाकी सप्ताह भरणी नक्षत्रास प्रसिद्धियोगाचा. ओळखी-मध्यस्थीतून नोकरीचा लाभ. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २१ चा गुरुवार दैवी चमत्काराचा. कृत्तिका नक्षत्राच्या मंडळींना उद्याचा सोमवार मातृपितृचिंतेचा.

स्त्रीवर्गाकडून लाभ होईल

वृषभ : सप्ताहात वेंधळेपणा जपा. सप्ताह प्रवासात बेरंग करणारा. बाकी सप्ताहात मृग नक्षत्राच्या व्यक्तींना स्त्रीवर्गाकडून लाभ. ता. २० व २१ हे दिवस अतिशय प्रवाही. गाठीभेटी यशस्वी होतील. मोठ्या उत्सव-समारंभातून उपस्थिती. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना प्रसिद्धीचे योग. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींचा कौतुक समारंभ.

गुप्तचिंता जाईल, सुवार्ता मिळतील

मिथुन : आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह नोकरीतील घडामोडींतून उत्तमच राहील. मुलाखती यशस्वी होतील. सप्ताहाचा शेवट मोठ्या वैयक्तिक सुवार्तांचा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २१ चा गुरुवार गुप्तचिंता घालवेल. मात्र, सप्ताहात प्रलोभनं टाळा. अपरिचित व्यक्ती सांभाळा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना पर्यटनाचे योग.

व्यवसायात उत्तम घडामोडी

कर्क : ग्रहांचं फिल्ड व्यावसायिक उत्तम घडामोडींचं. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १९ व २० हे दिवस उत्तम प्राप्तीचे. मात्र बेकायदा व्यवहार टाळा. नोकरीत वरिष्ठांशी गैरसमज टाळा. उद्याचा सोमवार गर्दीत जपा. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींचे भावंडांशी मतभेद होतील. भाजणं-कापणं जपा.

थोरामोठ्यांचं सहकार्य लाभेल

सिंह : सप्ताह बुद्धिजीवी मंडळींना उत्तमच. आजचा रविवार अचानक धनलाभाचा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना थोरामोठ्यांचं सहकार्य. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठ्या जल्लोषाचा असेल. ता. २२ चा शुक्रवार प्रेमिकांच्या हृद्य गाठीभेटींचा. मात्र प्रवासात पाकीट सांभाळा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींची प्रवासात विचित्र चुकामूक.

सुगंधी झुळकांचा कालखंड

कन्या : बुध-हर्षल योगाची पार्श्‍वभूमी थोडी विचित्र वाटते. घरातील द्वाड लहान मुलं जपा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींनी रस्त्यावरील खड्डे सांभाळावेत. खरेदीत फसवणूक टाळा. उद्याचा सोमवार एकूणच विचित्र अनुभव देणारा. बाकी सप्ताहाचा शेवट घरात मौजमजेचा. ता. २२ चा शुक्रवार वैवाहिक जीवनात सुगंधित झुळकांचा!

बुद्धिचातुर्यातून लाभ

तूळ : सप्ताहात घरातील भावविश्‍व जपा. गैरसमज टाळा. स्त्रीवर्गास भाजण्या-कापण्याचे प्रसंग अस्वस्थ करतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी जास्त काळजी घ्यावी. उद्याचा सोमवार बेरंगाचा. बाकी स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २१ व २२ हे दिवस शुक्रभ्रमणातून छान संगतीचे. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना बुद्धिचातुर्यातून लाभ.

दैवी प्रचितीचा अनुभव

वृश्‍चिक : सप्ताहाचा ट्रॅक ग्रहमानातून थोडा निसरडा राहील. तरुणांनी वाहनं सांभाळावी. श्‍वानदंश जपा. रहदारीत जपा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती टार्गेट होऊ शकतात. बाकी शुभ ग्रहांची लॉबी घरातील भावकोष उत्तम ठेवेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २१ व २२ हे दिवस एकूणच प्रसन्न ठेवतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी प्रचितीचा अनुभव येईल.

नोकरीत लाभ होतील

धनू : तरुणांना ग्रहमान चांगलंच राहील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २१ चा गुरुवार दैवी प्रचितीचा. पुत्रोत्कर्षातून हृद्य राहील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह वैयक्तिक कलागुणांतून प्रकाशात आणणारा. नोकरीत परिस्थितिजन्य लाभ होतील. उद्याचा सोमवार उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सार्वजनिक जीवनातून जपण्याचा. शेजाऱ्यांशी गैरसमज.

नोकरीत अनपेक्षित बढती

मकर : सप्ताहात घरात दादागिरी टाळा. नवपरिणितांनी एकमेकांतील गैरसमज टाळावेत. बाकी सप्ताह शुभ ग्रहांच्या लॉबीतून व्यावसायिक उत्तम घडामोडींचा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना थोरामोठ्यांचं पाठबळ मिळेल. नोकरीत अनपेक्षित बढती. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार विचित्र वादविवादाचा. उत्तराषाढा व्यक्तींना रस्त्यावर बेरंगाचा.

महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल, कुसंगत टाळा

कुंभ : सप्ताहातील शुभ ग्रहांची लॉबी क्रियाशीलच राहील. तरुणांनी अवश्‍य लाभ घ्यावा. मुलाखती द्याच. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट आत्मविश्‍वास वाढवणाराच. एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात जीभ सांभाळावी. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे परिस्थितिजन्य लाभ, मात्र कुसंगत टाळा.

व्यवसायातील येणी वसूल होतील

मीन : सप्ताहाची सुरुवात अनपेक्षित घटनांच्या पार्श्‍वभूमीवर अस्वस्थ करू शकते. एखादी स्त्रीचिंता शक्‍य. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी घरातील मानसिक पर्यावरण जपावंच. बाकी सप्ताहाचा शेवट व्यावसायिक येणी वसूल करून देणारा. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २२ चा शुक्रवार वैयक्तिक सुवार्तांतून जल्लोषाचा. प्रेमिकांचं छान हितगूज होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफ डू प्लेसिसची फिफ्टी, तर विराटने पुन्हा मिळवली ऑरेंज कॅप

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT