साप्ताहिक राशिभविष्य (१ ते ७ ऑगस्ट २०२६)
esakal
मेष : कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. नवीन प्रकल्प हाती घेण्याची संधी मिळू शकते. काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये पुढाकार घेण्याची संधी मिळेल, व्यवसाय विस्तारासाठी योग्य काळ. अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीकडे लक्ष द्या. गुंतवणुकीसाठी विचार करू शकता. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण अनुभवता येतील. कुटुंबातील वातावरणही समाधानकारक राहील.
कर्क : कामाच्या ठिकाणी सुरुवातीला काही कुरबुरी होऊ शकतात, पण वरिष्ठांशी साधलेल्या योग्य संवादामुळे हळूहळू परिस्थिती सुधारेल. संयम ठेवल्यास अडचणी कमी होतील. घरगुती खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे आठवडा आनंदात जाईल, मात्र जोडीदाराच्या भावना समजून घ्या. काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते.
वृषभ : कामाच्या ठिकाणी काही गोष्टींमध्ये धीम्या गतीने प्रगती दिसून येईल, पण तुमची चिकाटी आणि मेहनत यांमुळे वरिष्ठांकडून पाठीवर शाबासकीची थाप पडेल. व्यवसायात मात्र नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संतुलित राहील. उत्पन्न नियमित राहील. कुटुंबाचा भरभक्कम पाठिंबा राहील. जड अन्न टाळा अन्यथा पचनाशी संबंधित विकार डोके वर काढतील.
सिंह : कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्वगुणांमुळे तुमची कामगिरी उठून दिसेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. व्यवसाय विस्तारासाठी अनुकूल वातावरण असेल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा फायदेशीर ठरेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. काही प्रलंबित पैसे मिळू शकतात. संतुलित दिनचर्या ठेवल्यास आरोग्य चांगले राहील. योग्य तेव्हा विश्रांती घेणे आवश्यक आहे.
मिथुन : कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प किंवा जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. पण येणाऱ्या संधी योग्य वेळी जोखणे महत्त्वाचे ठरेल. शिवाय तुमची संवादकौशल्ये आणि बुद्धिमत्ता यांचा योग्य वापर करावा लागेल. आर्थिकदृष्ट्या काही नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होतील किंवा अतिरिक्त कामातून लाभ होण्याची शक्यता आहे. अविवाहितांच्या नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे.
कन्या : या आठवड्यात तुमच्या मेहनतीचा आणि तपशीलवार काम करण्याच्या सवयीचा तुम्हाला लाभ होईल. तुमच्या कामातील अचूकता वरिष्ठांच्या नजरेत भरेल. कामाच्या ठिकाणी प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संतुलित राहील. उत्पन्न आणि खर्च यांमध्ये समतोल राखता येईल. नातेसंबंधांमध्ये स्थैर्य आणि समजूतदारपणा दाखवला, तर आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील.
तूळ : कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत चांगला समन्वय ठेवल्यास कामात यश मिळेल. काही नवीन संधी समोर येऊ शकतात, पण निर्णय घेताना भावनिक आणि व्यावहारिक दृष्टिकोन यांमध्ये योग्य संतुलन राखणे आवश्यक ठरेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. नातेसंबंधांतील ताणतणाव दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहा. कौटुंबिक वातावरण समाधानाचे राहील. जोडीदाराची साथ लाभेल. आरोग्य चांगले राहील.
मकर : कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता वाढेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी हा योग्य काळ आहे. तुमची चिकाटी आणि जबाबदारीची भावना तुम्हाला अपेक्षित यश मिळवून देईल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा आठवडा अनुकूल राहील. आर्थिकदृष्ट्या चांगली आवक राहील. कामाच्या व्यापामुळे जोडीदाराला वेळ देणे कठीण जाऊ शकते. त्याची भरपाई तुम्ही सुसंवाद साधून करू शकता.
वृश्चिक : या आठवड्यात तुमच्या निर्णयक्षमतेची कसोटी लागू शकते. काही गोष्टींमध्ये तुम्हाला खोलवर विचार करून निर्णय घ्यावे लागतील. कामाच्या ठिकाणी गुप्त योजना किंवा रणनीती यशस्वी होऊ शकतात, पण सहकाऱ्यांशी सुसंवाद ठेवा. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मिश्र राहील. मोठे आर्थिक निर्णय घेण्यात सावधगिरी बाळगावी लागेल. जोडीदाराच्या भावना समजून घेऊन अनावश्यक कलह टाळा. इतर नातेसंबंधांमध्येदेखील थोडी ताणतणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
कुंभ : कामाच्या ठिकाणी टीमवर्क आणि नेटवर्किंगमुळे प्रगती साधण्याच्या संधी उपलब्ध होतील. या आठवड्यातली ग्रहस्थिती सामाजिक संबंध वाढवणारी असेल, तिचा योग्य फायदा करून घेतला पाहिजे. व्यवसायातही नवीन संपर्क फायदेशीर ठरतील, त्यामुळे काही अनपेक्षित संधी तुमच्यासमोर येऊ शकतात. उत्पन्न स्थिर राहील, पण अचानक खर्च होण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक आहे.
धनू : कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळू शकते. कामाशी संबंधित प्रवासाचे योग येतील. व्यवसायविस्तारासाठी नवीन योजना आखण्याची संधी उपलब्ध होतील. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला राहील. मात्र, प्रवास किंवा इतर कारणांमुळे खर्च वाढू शकतो. आरोग्य चांगले राहील, पण प्रवासामुळे थकवा जाणवू शकतो. अविवाहितांच्या चांगल्या ओळखी होऊ शकतात. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील.
मीन : या आठवड्यात परिस्थितीमुळे तुमचा कल आध्यात्मिकतेकडे राहील. मनातील विचार आणि भावना यांना योग्य दिशा देणे महत्त्वाचे ठरेल. सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे, पण निर्णय घेताना मात्र वास्तवाचे भान ठेवणे आवश्यक ठरेल. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम राहील, त्यामुळे खर्चाचे नियोजन करणे आवश्यक आहे. कुटुंबीयांशी संबंध चांगले राहतील. थोडाफार मानसिक थकवा जाणवू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.