Weekly Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य (०१ मे २०२२ ते ७ मे २०२२)

ज्योतिष हे शिवस्वरोदय आहे. अर्थातच त्याचा श्‍वासाशी संबंध आहे. कारण माणसाचा पहिला श्‍वास हीच त्याची खरी जन्मवेळ असते! पृथ्वी हा एक श्‍वासच आहे आणि हा श्‍वास सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतो.

श्रीराम भट saptrang@esakal.com

महत्त्वाच्या गाठीभेटी यशस्वी होतील

मेष : सप्ताह नैसर्गिक साथ देणारा नाहीये. रवी-हर्षल युतियोगाची पार्श्‍वभूमी त्याबरोबरच घरगुती मानसिक पर्यावरण सतत बिघडवणारी. भरणी नक्षत्रास ता. १ आणि ५ हे दिवस अनेक प्रकारांतून बेरंग करणारे. बाकी अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ६ व ७ हे दिवस महत्त्वाच्या गाठीभेटी यशस्वी करणारे. विवाहयोग. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना ओळखीतून लाभ.

व्यावसायिक वसुली होईल

वृषभ : कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना अपवादात्मक परिस्थितीतून मोठे लाभ. उद्याचा सोमवार विलक्षण घटनांचा. व्यावसायिक वसुली. तरुणांना ओळखी - मध्यस्थीतून नोकरी. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना रवी-हर्षल युतियोगाची पार्श्‍वभूमी आणि मंगळभ्रमण अकारण वादात ओढेल. राजकीय विरोध. ता. ३ मेचा मंगळवार बाचाबाचीचा.

पोलिसांशी वाद टाळाच

मिथुन : मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह मोठ्या मौजमजेचा. वैयक्तिक सुवार्तांतून जल्लोष. प्रेमिकांचं निर्णायक हितगूज. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना रवी-हर्षल योगातून संमिश्र ग्रहमान राहील. कलाकारांना प्रसिद्धियोग. मात्र, सार्वजनिक जीवनात जपा. जुगारसदृश व्यवहार टाळा. पोलिसांशी हुज्जती टाळा. बाकी शुक्रवार, शनिवार पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे अजब राहतील.

सुवार्ता मिळतील

कर्क : सप्ताहात हर्षलचा विचित्र उच्चदाब राहील. विद्युत उपकरणांपासून जपा. मूर्खांशी संवाद नकोतच. नोकरीत वरिष्ठांचा अहंकार जपा. आजचा रविवार दुखापतींचा. बाकी पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार, शनिवार मोठ्या सुवार्तांतून धन्य करतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहस्थळ. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळवार अग्निभय.

अचानक धनलाभ होईल

सिंह : सप्ताह ग्रहयोगातून उच्चदाबाचाच. सहली - करमणुकीतून बेरंग होऊ शकतो. ता. ३ ते ५ हे दिवस पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना आजूबाजूचं मानसिक पर्यावरण बिघडवणारे. स्त्रीवर्गाशी हुज्जती नकोतच! बाकी सप्ताह कला, छंद वा इतर बौद्धिक उपक्रमांतून उत्तम प्रतिसाद देईल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना अचानक धनलाभ.

शुभग्रहांची साथ लाभेल

कन्या : सप्ताह अनपेक्षित घटनांच्या पार्श्‍वभूमीवर धावपळ करणारा. शेजारीपाजारी दुर्घटना घडतील. बाकी उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना शुभग्रहांचं छान ग्रासकोर्ट राहील. उद्याचा सोमवार आणि सप्ताहाचा शेवट उत्तम सुरावटीचा. हस्त नक्षत्राच्या व्यक्ती व्यावसायिक लाभ उठवतील. थोरामोठ्यांच्या गाठीभेटी.

वाद टाळा, प्रियजनांना सांभाळा

तूळ : सप्ताह ग्रहयोगांतून उच्चदाबाचाच. रवी-हर्षल योगाचं फिल्ड मोठं विचित्र राहील. प्रिय व्यक्तींच्या विचित्र वागण्यातून त्रास. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार स्फोटक. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळवार अग्निभयाचा. गृहिणींनी जपावं. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार आणि ता. ७ चा शनिवार सुवार्तांतून जल्लोषाचा.

सुवर्णालंकार जपा

वृश्‍चिक : सप्ताहात कुपथ्यं पूर्ण टाळा. काहींना पित्तप्रकोप शक्‍य. उत्सव-समारंभातून सुवर्णालंकार जपा. बाकी अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींवर शुभ ग्रहांची मेहेरनजर राहीलच. उद्याचा सोमवार वैयक्तिक मोठ्या सुवार्तांचा, जल्लोषाचा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १ आणि ३ हे दिवस प्रिय व्यक्तींच्या विचित्र वागण्यातून त्रासाचे.

आर्थिक कोंडी सुटेल

धनू : सप्ताह कलावंतांचं नैराश्‍य घालवेल. काहींना अनपेक्षित सन्मान मिळतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींचं वैवाहिक जीवन फळेल-फुलेल. सप्ताहाचा शेवट मोठ्या गोड बातम्यांचा. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींची आर्थिक कोंडी जाईल. मात्र सप्ताहात मित्रांची कुसंगत टाळा. प्रेम प्रकरणात वाहवत जाऊ नका. काहींना लोकापवादातून त्रास.

वरिष्ठांचा मान राखा

मकर : रवी-हर्षल योगातून ग्रहांचं फिल्ड उच्चदाबाचंच राहील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींनी क्रिया-प्रतिक्रियांतून जपावं. नवपरिणितांनी आचारसंहिता पाळावी. घरात वरिष्ठांचा मान राखा. बाकी सप्ताह प्रामाणिक व्यावसायिकांना छानच राहील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींच्या प्राप्तीत विलक्षण वाढ. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी कोर्ट प्रकरणं जपून हाताळावीत.

धनवर्षाव व आनंदोत्सव

कुंभ : रवी-हर्षल योग आणि राशीच्या मंगळाची पार्श्‍वभूमी कोणत्याही शॉर्टकटला बाधकच वाटते. शारीरिक मस्ती टाळा. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार आणि ता. ३ मेचा मंगळवार उच्चदाबाचा. बेसावध राहू नका. गर्दीत जपा. बाकी धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार धनवर्षावाचा आणि सप्ताहाचा शेवट एकूणच आपल्या राशीस घरात आनंदोत्सवाचा.

ग्रहण सुटेल, पुत्रसौख्य लाभेल

मीन : सप्ताहात ग्रहांचं फिल्ड आपणास परस्परविरोधी राहील. अर्थात, शुभ ग्रहांचा अंडरकरंट साथ देईल. सप्ताह चौकार-षटकार मारण्याचा नाहीच. नॉर्मल राहा. सप्ताहाचा शेवट अतिशय शुभपर्यवसायी राहील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचं एखादं ग्रहण सुटेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रसौख्याचा लाभ. रेवती नक्षत्रास परदेशगमन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Valhe News : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Video: बापरे! प्रार्थना बेहरेच्या पायाला गंभीर दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'तुमच्या आशिर्वादाची...'

Viral Video: हत्तीच्या बाळाची टरबूज मागण्याची क्यूट अदा, हृदयस्पर्शी व्हिडिओने जिंकली नेटकऱ्यांची मने

Thane Crime: कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ, धक्कादायक आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT