weekly horoscope 21st april 2024 to 26th april 2024 Sakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य : (२१ एप्रिल २०२४ ते २६ एप्रिल २०२४)

महाभारताच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भगवंतांनी अर्जुनाला अर्थातच धनंजयाला गीता सांगितली.

सकाळ वृत्तसेवा

परदेशी संधी मिळतील

मेष : पौर्णिमेचा सप्ताह अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना शैक्षणिक यशातून बोलेल. काही जणांना परदेशी संधी मिळतील. ता. २४ व २५ हे दिवस अतिशय नावीन्यपूर्ण शुभफळं देतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्षातून धन्यता प्राप्त होईल. सप्ताह वैवाहिक जीवनातून छानच. पती वा पत्नीचा भाग्योदय. मात्र शनिवारी प्रवासात अन्नपाण्यातील संसर्गापासून जपा, व्यसनं सांभाळा.

वास्तू-वाहन खरेदीचा योग

वृषभ : सप्ताहारंभ छान मौजमजेचे योग आणेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक उलाढालीतून लाभ होईल, मोठी वसुली होईल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट वैयक्तिक सुवार्तांतून प्रसन्न ठेवेल. मित्रमंडळींकडून लाभ होतील. उद्याचा सोमवार उंची वस्तूंच्या खरेदीचा. पौर्णिमेजवळ वास्तू किंवा वाहन खरेदीचे योग.

चांगल्या ग्रहयोगाचा फायदा

मिथुन : सप्ताहातील राशींच्या एक्स्चेंजमध्ये आपला शेअर चांगलाच वधारणार आहे. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना ग्रहयोगातून बहारीची फळं अनुभवता येतील. ता. २४ व २५ हे दिवस स्पर्धात्मक गोष्टींतून मॅन ऑफ द मॅच ठरवतील. नोकरी-व्यावसायात परिस्थितीजन्य लाभ होतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचं प्रभाव क्षेत्र घरात आनंदोत्सव साजरा करेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना परिचयोत्तर विवाहयोग येतील.

नोकरीत बढतीची शक्यता

कर्क : पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र उत्तम गाठीभेटी किवा विशिष्ट करारमदार घडवेल. ता. २४ व २५ हे दिवस आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना अनेक माध्यमांतून धनवर्षाव करतील. काहींना राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रांतून भाग्यलक्षणं दिसतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना घरगुती सुवार्ता धन्य करतील. काहींचे नूतन वास्तू प्रवेश होतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना ही पौर्णिमा नोकरीत बढतीची.

वरिष्ठांची कृपा राहील

सिंह : सप्ताहारंभ आणि ता. २३ आणि २४ चे हनुमान जन्मोत्सवाच्या पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र जुन्या गुंतवणुकीतून लॉटरीसारखे लाभ देईल. काहींची मोठी व्यावसायिक वसुली होईल. उद्याचा सोमवार पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठी झगमगाटी फळं देईल. नोकरीत वरिष्ठांची कृपा संपादन कराल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना एकूणच पौर्णिमा चैन, मंगळ आणि मौजमजेची. प्रेमिकांच्या हृद्य गाठीभेटी होतील.

वाद व संसर्ग टाळा

कन्या : सप्ताहारंभ नोकरी-व्यावसायिक पार्श्वभूमीवर मोठी नावीन्यपूर्ण शुभफळं देईल. आजचा रविवार मोठी भाग्यबीजं पेरणारा आहे. चित्रा नक्षत्रास बलवत्तर असा विवाहयोग आहे. कनेक्टिव्हिटीच्या रेंजमध्ये सतत राहा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २४ व २५ हे दिवस अतिशय गतिमान राहतील. नोकरीच्या मुलाखतींसाठी तयार राहाच. मात्र अन्नपाण्यातील संसर्ग टाळा. शनिवारी वाद नकोतच.

सरकारी कामं होतील

तूळ : पौर्णिमेचा सप्ताह बुद्धिजीवी मंडळींना चांगलीच फळं देईल. काही विशिष्ट मोठ्या संधी किंवा प्रस्ताव पुढं येतील. काहींना विशिष्ट सन्मान चकित करतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २४ व २५ हे दिवस मोठी व्यावसायिक वसुली करून देतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र, परदेशात भाग्योदय करणारं. मोठी सरकारी काम होतील. शनिवारी पाकीट जपा.

व्यावसायिक वसुली होईल

वृश्‍चिक : सप्ताहारंभ मोठे भाग्य संकेत देणारा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार मोठ्या जल्लोषाचा. व्यावसायिक नवे पर्याय लाभ देऊन जातील. काहींना पती व पत्नीचा उत्कर्ष धन्यता देईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार व्यावसायिक वसुलीचा, विशिष्ट गुप्तचिंता जाईल. मात्र पौर्णिमेत अन्न, पाण्यातील संसर्गापासून जपा.

मित्रमंडळींकडून लाभ होतील

धनु : पौर्णिमेचा सप्ताह एकूणच आपल्या राशीस मोठी ऊर्जा देईल. उद्याचा सोमवार जीवनातील मोठे प्युअर सीक्वेन्स लावेल. अर्थातच शिक्षण, नोकरी व विवाह आदी माध्यमातून मोठे भाग्योदय. पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २३ ते २५ हे दिवस प्रत्येक वन-डे जिंकून देणारे आहेत. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना मित्रमंडळींकडून लाभ.

वादग्रस्त प्रकरणं मिटतील

मकर : सप्ताह चढ्या क्रमानं शुभ राहील. उद्याचा सोमवार याचीच लक्षणं दाखवेल. व्यावसायिक मंदी पूर्णपणानं जाईल. धनिष्ठा नक्षत्राच्या तरुणांना परदेशी लाभ होतील. उच्च शिक्षणाच्या संधी येतील. व्हिसा मिळेल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक वादग्रस्त प्रकरणं मिटून दिलासा मिळेल. पौर्णिमेजवळ नोकरीत वरिष्ठांकडून उत्तम प्रतिसाद किंवा लाभ होतील. सप्ताहाच्या शेवटी घरातील वृद्धांशी वाद नकोत.

नोकरीच्या मुलाखतीत यश

कुंभ : पौर्णिमेजवळ कलाकारांना मोठा लाभ होईल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्रास ता. २४ व २५ हे दिवस अतिशय झगमगाटी राहतील. विशिष्ट विक्रमांची नोंद करतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा बलवत्तर असे विवाहयोग आणेल. तरुणांना नोकरीच्या मुलाखतींतून यश. नवपरिणितींचे भाग्योदय. ता. २५ एप्रिलचा गुरुवार वैयक्तिक मोठ्या उत्सव समारंभाचा. वास्तुप्रवेश होईल. पुत्रोत्कर्ष.

अनपेक्षित धनलाभाची शक्यता

मीन : सप्ताहारंभ नावीन्यपूर्ण शुभफळं देईल. अनपेक्षित धनलाभ होतील. भागीदारीचे प्रश्‍न सुटतील. सार्वजनिक क्षेत्रातील मंडळींचा सन्मान होईल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सोमवार शुभलक्षणी राहील. नोकरीत बढतीची चाहूल. शेअर बाजारातून लाभ होतील. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र वैयक्तिक छंद वा उपक्रम यशस्वी करून देतील. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्रास वैवाहिक जीवनातून आनंदोत्सव लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

Latest Marathi News Updates : ससून डॉक वाचवा; कोळी बांधवांचा हक्क जपा!

Siddharth Shinde Death: Supreme Court मध्ये चक्कर आली आणि... सिद्धार्थ शिंदेंवर काळाचा घाला | Sakal News

Heavy Rain in Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस; पावसामुळे नव्या खड्ड्यांची भर, मार्ग काढणेही अडचणीचे

SCROLL FOR NEXT