weekly horoscope 23rd june 2024 to 29th june 2024 Sakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य : (२३ जून २०२४ ते २९ जून २०२४)

हे शनी हा ग्रह फलज्योतिषाचा आत्मा असल्यासारखाच आहे. परिस्थितीचा अनुभव घेत जगणारी जी जीवदशा तोच शनी म्हणावा लागेल.

श्रीराम भट

वादग्रस्त मुद्दे संपतील

मेष : राशीचा मंगळ विशिष्ट धडाडीचे निर्णय घेईल. जीवनातील विशिष्ट गुंतागुंतीचे प्रश्‍न सोडवाल. वास्तुविषयक निर्णय घ्याल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या जीवनातील वादग्रस्त मुद्दे संपतील. ता. २६ ते २८ हे दिवस मोठे गतिमान राहतील. ता. २७ चा गुरुवार अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक वसुलीचा ठरेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार जागरणाचा होईल.

गुंडांपासून काळजी घ्या

वृषभ : सप्ताह मस्त धावा काढून देईल. ता. २६ ते २८ हे दिवस प्रत्येक वन-डे जिंकून देणारे. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्ती नोकरीत विशिष्ट कार्यकर्तृत्वातून प्रशंसापात्र होतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील गुरुवारचा दिवस मोठ्या शुभ घटनांतून रोजनिशीत नोंद करेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील वक्रीस्तंभी शनीची पार्श्‍वभूमी सार्वजनिक जीवनातून जपण्याची. गावगुंडापासून जपावे. बाकी सप्ताह व्यावसायिक प्राप्तीचाच असेल.

शैक्षणिक चिंता जातील

मिथुन : सप्ताह बुद्धिजीवी मंडळींना छानच राहील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना विशेषतः स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे मार्ग किंवा पर्याय खुले होतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ विशिष्ट गुप्त चिंता किंवा नुकसानीचं भय घालवेल. ता. २६ ते २८ हे दिवस एकूणच आपल्या राशीस उत्तम फलद्रूप होतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट विशिष्ट यशातून जीवन सार्थकी करणारा. सप्ताह शैक्षणिक चिंता घालवेल.

परदेशात संधी मिळेल

कर्क : सप्ताहातील शनीच्या वक्री/स्तंभी स्थितीचा आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना अनपेक्षित घटनांतून त्रास होऊ शकतो. अपवादात्मक होऊ शकणाऱ्या घटना लक्षात घेता परिस्थितीचं भान ठेवून शिस्तबद्ध आचरण ठेवा. जुगार टाळा. आहारविहारादि पथ्यं पाळाच. बाकी पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींच्या बाबतीत चमत्कार घडतील. नोकरीत कर्तृत्व गाजवाल. काहींना परदेशी संधी.

उद्योजकांना ऊर्जा लाभेल

सिंह : शत्रुत्वाच्या पार्श्‍वभूमीवर जपून राहण्याचा सप्ताह. बाकी सप्ताह स्वतंत्र उद्योजकांना निश्‍चितच ऊर्जा देईल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह व्यावसायिक तेजीचाच राहील. ता. २६ व २७ हे दिवस तरुणांना नोकरी देणारे. मघा नक्षत्राची व्यक्ती सप्ताहारंभ कला, छंद वा विशिष्ट शैक्षणिक स्पर्धा वा उपक्रमांतून विक्रम नोंदवेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना वक्री/स्तंभी शनीची स्थिती कायदेशीर घटकांतून कटकटीची ठरण्याची शक्यता.

नोकरीच्या संधी येतील

कन्या : सप्ताहातली शनी-मंगळाची स्थिती टाइट फिल्डिंग ठेवेल. बाकी सप्ताह तरुणांना छान राहील. मात्र खेळाडूंनी जपावं. ता. २६ ते २८ हे दिवस हस्त नक्षत्राच्या तरुणांना नोकरीच्या संधी आणतील. उत्तरा नक्षत्राच्या तरुणांना सप्ताहारंभ परदेशी भाग्योदयाचा असेल. उद्याचा सोमवार मोठा शुभलक्षणी. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहच्या शेवटी दुखापतींपासून काळजी घ्यावी.

परदेश व्यापारात वाढ होईल

तूळ : सप्ताहातील ग्रहमान बुद्धिमान तरुणांना छानच राहील. थोरामोठ्यांच्या आशीर्वादातून कामे होतील. काहींचा परदेशी व्यापार वृद्धिंगत होईल. सप्ताहाचा आरंभ कायदेशीर कामांतून गती घेईल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे हायसे वाटेल, अर्थात कायमची चिंता जाईल. ता. २५ ते २७ हे दिवस मोठे मजेदार राहतील. पुत्र-पौत्रांच्या चिंता कायमच्या जातील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट वादग्रस्त वसुली करून देणारा.

वास्तुविषयक खरेदी-विक्रीतून लाभ

वृश्‍चिक : वक्री/स्तंभी शनीच्या पार्श्‍वभूमीवर एक प्रकारचे १४४ कलम लागेल. नियमांचं पालन कराच. अर्थातच घरी आणि दारी ! बाकी गुरुभ्रमणातून आत्मविश्‍वास जोपासला जाईलच. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ गुरु प्रचितीच देईल, येणाऱ्या संकटातून वाचाल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकी फलद्रूप होतील. वास्तुविषयक खरेदी-विक्रीतून लाभ. वास्तुकर्ज मिळेल.

सरकारी संस्थांची साथ लाभेल

धनु : सप्ताहात वैयक्तिक कौशल्यातून मोठे लाभ होतील. स्वतंत्र व्यावसायिकांना सप्ताहारंभ, सरकारी माध्यमांतून साथ देणारा. उद्याचा सोमवार मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना मोठ्या धनवर्षावाचा. पती वा पत्नीचा विशिष्ट भाग्योदय होईल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ ते २७ हे दिवस मोठे गतिमान राहतील. प्रेमिकांचे प्रश्‍न सुटतील. तरुणांना नोकरीतील घडामोडी प्रसन्न ठेवतील. मात्र, सप्ताहात उधार-उसनवारीचे व्यवहार जपून करा. जुगार नकोच. चोरी, नुकसानीपासून जपा.

वादग्रस्त येणं वसूल होईल

मकर : सप्ताहात शनिभ्रमणाची स्थिती अधिराज्य करेल. आचारसंहिता पाळावी लागेल. बाकी नोकरी-व्यावसायिक पार्श्वभूमीवर सप्ताह ठीक राहील. व्यावसायिक वादग्रस्त येणं वसूल कराल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ वैयक्तिक छंद वा उपक्रम यशस्वीच करेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींची पुत्रचिंता जाईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट विचित्र खर्चात टाकेल. बेसावधपणा टाळा. हरवाहरवीचे प्रसंग येतील.

विशिष्ट मित्रांचा लाभ होईल

कुंभ : वक्री/स्तंभी शनिभ्रमणाची स्थिती सप्ताहावर अंमल करेल. वादविवाद टाळा. सार्वजनिक जीवन सांभाळा. जुनाट व्याधींकडं लक्ष पुरवा. बाकी सप्ताहात बुध-शुक्रांची जोडगोळी ता. २६ ते २८ या दिवसांत शततारका नक्षत्रास वैयक्तिक प्रामाणिक उपक्रमांतून निश्‍चितच फलदायी होईल. विशिष्ट मित्रसंगतीतून लाभ होतील. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या शेवटी विचित्र गुप्तचिंतेतून त्रास होऊ शकतो.

कुसंगत-व्यसनापासून दूर राहा

मीन : सप्ताहात शुभग्रहांची लॉबी छान ॲक्टिव्ह राहीलच. सप्ताहारंभ मोठा शुभलक्षणी राहील. उद्याचा सोमवार छान. नोकरीविषयक घडामोडी घडवेल. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट सरकारी धोरणातून लाभ होतील. तरुणांना नोकरीच्या छान संधी येतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह एखाद्या न्यायालयीन प्रकरणातून सोडवणूक करेल. मात्र सप्ताहात जुगार टाळा. व्यसनी कुसंगत टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT