
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी तसेच मुंबईतल्या प्रमुख गणेश मंडळांपर्यंत पोहोचण्यासाठी मोफत बससेवा पुरवण्याची राजकीय ‘स्पर्धा’ सुरू झाली आहे. भाविकांना खूश करण्यासाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) तसेच इतर सामाजिक संस्थांनी मोफत बसची घोषणा केल्याने आता या सोयींमध्ये कोण वरचढ ठरते याकडे लक्ष लागले आहे.