weekly horoscope 2nd april 2023 to 8th april 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य (०२ एप्रिल २०२३ ते ०८ एप्रिल २०२३)

पंचमहाभूतांची भावस्पंदनं जपणारे श्रीमद्‌ हनुमान चिरंजीव आहेत. यात सर्व विश्‍वाचं किंवा अखिल ब्रह्मांडाचं गुह्य दडलं आहे, याची बऱ्याच जणांना कल्पना नसेल.

श्रीराम भट saptrang@esakal.com

मौल्यवान चीजवस्तू जपा

मेष : सप्ताहारंभ भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ग्रहमानातून बॅटिंग फिल्डचाच. तरुणांच्या नोकरीविषयक मुलाखतींचा काळ. कोर्ट प्रकरणातून मुक्तता. ता. ४ चा मंगळवार विजयोत्सव साजरा करेल. ता. ५ व ६ चं पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना संमिश्र स्वरूपाचं. वैयक्तिक उत्सव-समारंभ, मात्र मौल्यवान चीजवस्तू जपा. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान होईल.

प्रवासात काळजी घ्या

वृषभ : सप्ताहातील गुरुभ्रमणाचा टप्पा पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात उत्तम बोलेल. मृग नक्षत्राच्या व्यक्ती फॉर्ममध्ये राहतील. कलाकारांना मोठं यश. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात त्वचारोगापासून त्रास देणारा कालखंड. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार घरात मंगलकार्याचा. शनिवारी प्रवासात जपा.

नोकरीत बदलीची शक्यता

मिथुन : पौर्णिमेचा सप्ताह शुभग्रहांची स्पंदनं प्रभावी ठेवेल. सप्ताहाचा आरंभ महत्त्वाच्या कामांतून गती घेणारा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक प्राप्तीतून सप्ताह मोठा विलक्षण असेल. सप्ताहात पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात मुलाबाळांचे भाग्योदय होतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ५ चा बुधवार भाजण्या-कापण्यापासून जपण्याचा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत बदलीचं सावट.

मोठ्या संधी मिळतील

कर्क : पौर्णिमेच्या सप्ताहात शुभग्रहांचंच फिल्ड राहील. अर्थातच, नशिबाची साथ राहील. मात्र, हनुमानावर श्रद्धा ठेवा. सप्ताह पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना सर्व स्तरांवरून मोठ्या संधी देणारा. पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र मोठं सुंदरच. आजूबाजूचं मानसिक पर्यावरण छानच राहील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना गृहप्रवेश.

आर्थिक कोंडी दूर होईल

सिंह : सप्ताहातील राशींच्या एक्‍स्चेंजमध्ये प्रभाव टाकणारी रास राहील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींची सप्ताहाची सुरुवात चौकार-षटकारांचीच. नोकरीत वरिष्ठांवर प्रभाव टाकाल. पूर्वा नक्षत्रास पौर्णिमेचं फिल्ड व्यावसायिक क्षेत्रातली आर्थिक कोंडी घालवणारं. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्षातून धन्यता. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होतील.

धनलाभ होईल व चिंता संपतील

कन्या : उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र कायदेशीर प्रकरणं मिटवेल. वैवाहिक जीवनातून प्रसन्नता राहील. पती वा पत्नीची चिंता जाईल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ गाठीभेटीतून कटकटीचा. भावाबहिणींशी गैरसमज टाळा. बाकी ता. ६ व ७ हे दिवस गुरुवारला धरून गुडफ्रायडेचेच. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ.

नोकरीच्या मुलाखतींमध्ये यश

तूळ : सप्ताहातील पौर्णिमेचं फिल्ड वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर मानसिक पर्यावरण बिघडवणारं. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी आचारसंहिता पाळावी. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यक्तिगत छंद, उपक्रमांतून सप्ताहाचा आरंभ लक्षणीय असा शुभ. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या मुलाखतींतून यश.

ध्येयाकडे वाटचाल करा

वृश्‍चिक : पौर्णिमेचं चंद्रबळ गुरूच्या अधिकारात काम करेल. तरुणांनो, इतर मोहात न पडता ध्येयाकडे वाटचाल करा. ता. ६ व ७ हे दिवस ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शुभग्रहांची रसद पुरवतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना गॉडफादर भेटेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात संसारवेल बहरेल.

नैराश्‍य जाईल, भेटी मिळतील

धनू : सप्ताहातील ग्रहमान संचितातील ठेवी मॅच्युअर करणारं. मूळ नक्षत्राच्या तरुणांचं सप्ताहाच्या आरंभी नोकरीतील नैराश्‍य जाईल. नोकरीत मानांकन मिळेल. पूर्वाषाढा व्यक्तींना पौर्णिमेचं अंगण मोठ्या सुवार्तांतून सुगंधित करेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ७ चा गुडफ्रायडे मोठी सप्रेम भेट देणारा.

उत्सव-प्रदर्शनं गाजवाल

मकर : आपल्या राशीस ख्यालीखुशालीचाच सप्ताह राहील, मात्र कामगारवर्गाशी जपून. ता. ५च्या बुधवारी वाहनं जपा. पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक उलाढालीतून प्रसन्न ठेवणारं. विशिष्ट उत्सव, प्रदर्शनं गाजतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना गुडफ्रायडे विवाहविषयक गाठीभेटींचा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग.

बॅंकांकडून सहकार्य मिळेल

कुंभ : पौर्णिमेचं चंद्रबळ घरातील मानसिक पर्यावरण साडेसातीतही अबाधित ठेवेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यवसायात बँकांकडून सहकार्य मिळेल. सप्ताह प्रेमिकांना अधिक जवळ आणेल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाची सुरुवात विशिष्ट कायदेशीर प्रकरणांतून छायाग्रस्त करेल. बाकी तरुणांना सप्ताह स्पर्धात्मक यशाचाच.

व्यावसायिक बस्तान बसेल

मीन : राशीतील गुरुभ्रमणाचा कृपास्रोत पौर्णिमेजवळ परमावधी गाठेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्ती गुरुवैभव उपभोगतील. गुरुवारची हनुमान जयंती आत्मोत्कर्ष करणारी, व्यावसायिक बस्तान बसेल. सरकारी माध्यमातून लाभ. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना वसुलीतून लाभ. पौर्णिमा प्रेमिकांच्या हृद्य गाठीभेटीची. मात्र, खलनायकापासून जपा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर महिनाभर नो एन्ट्री; काय असतील पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT